संपादक आशिष मुगटकर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
दि.७ रोजी किनवट येथील कलावती मंगल कार्यालयात आयोजित भारतीय जनता पार्टी उत्तर जिल्हा कार्यसमितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी भाजपा उत्तर जिल्ह्याचे कार्यकुशल जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील भोयर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आ.राम पाटील रातोळीकर प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.गजाननजी घुगे, प्रदेश सचिव देविदास भाऊ राठोड, हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर,किनवट विधानसभा नेते डॉ. सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.



यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जिल्हा संयोजक डॉ. प्रसाद डोंगरगावकर यांनी दि.22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम लल्ला च्या मूर्ती प्रतिष्ठापणा या विषयावर संघटनात्मक कार्य हा विषय मांडून दि 22 जानेवारी रोजी होणाऱ्या दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्याचे आणि इतरांना सहभागी करून घेण्याचे उपस्थितांना आवाहन केले.जिल्हा महामंत्री सुहास पाटील डोंगरगाव कर यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे माजी मंत्री तथा आ.जितेंद्र आव्हाड यांनी केलेली प्रभू रामचंद्र यांच्या विषयीची बरगळीच्या निषेधाचा ठराव बैठकीत मांडून तो एक मतांनी निषेध ठराव पारित करून घेतला.सौ. लता फाळके यांनी मोदी सरकारच्या योजणांची उपलब्धी जण सामान्यांन पर्यंत पोहचवा आणि विरोधी पक्षाची खोडसाळ वृत्ती हाणून पाडा असे उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले. प्रवीण गायकवाड यांनी कार्यकुशल जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी केलेली नांदेड उत्तर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य या विषयावर आपले मनोगत व्यक्त करतांना लेटरप्याड आणि व्हिजिटिंग कार्ड पुरता पदाचा वापर न करता समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत मोदी सरकारच्या योजना पोहचवून पंडित दीनदयाळ यांच्या अंत्योदयचा विचार आणि राष्ट्र भक्तीसे खून न खवले खून नही ओ पाणि है!देश भक्तीके काम न आये ओ जवानी नही कुर्बानी है!हा स्यामा प्रकाश मुखर्जी यांचा विचार आणि तुटे दिलसे कोई खडा नही होता और छोटे दिलसे कोई बडा नही होता या भारतरत्न अटल बिहारीं वाजपेई व जहाँ हुये बलिदान मुखर्जी ओ काश्मीर हमारा है या विचारांची मुहूर्त मेढ संसदेत बहुमताने 370 वे कलम रद्द करून अखंड भारताचे स्वप्न पूर्ण केले त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ध्यानी घेऊन समाजाला न्याय देण्याच्या भावनेने पदाचा वापर करावा आणि 2024 च्या महाविजयात नांदेड आणि हिंगोली लोकसभा जिंकण्यासाठी कामाला लागा आणि मोदीजींच्या ह्याट्रीकचे शिल्पकार होण्याचा बहुमान मिळविण्यासाठी आपापल्या बूथवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आणि विविध आघाड्या मोर्चा व प्रकोष्ठ प्रभारिंच्या निवडी घोषित केल्या.प्रदेश सचिव देविदास राठोड यांनी खासदार,आमदार आणि संघटनात्मक भूमिका व समन्वय या विषयी कोणताही संभ्रम न बाळगता नांदेड उत्तर भाजपा जिल्हा संघटन निवडणुकीसाठी सज्य व सक्षम असल्याची भावना व्यक्त केली. रामदास पाटील सोमठाणकर यांनी नमो ऍप आणि कार्यकर्त्यांचे कर्तव्य याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.गजानन घुगे यांनी सरल ऍप व नोम ऍप आणि सरकाच्या लोकोपयोगी योजना व कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवा उद्याचे लोकप्रतिनिधी होणे तुम्हीस कुणीही थांबविणार नाही असे सांगितले.
अध्यक्षीय भाषनात सुधाकर भोयर यांनी बैठकीच्या लक्षनीय उपस्थितीवर समाधान व्यक्त करून अर्धापूर ते किनवट, मुदखेड ते किनवट, हदगांव ते किनवट दीडसे किलोमीटरचा भोगोलिक पल्ला ओलांडून स्वतःच्या आत्मबलाची उपस्थिती हे कार्यकर्त्यातील ऊर्जा संघटनेचे बळ असल्याचे सांगून वयाची सत्तर अंशी वर्ष विचाराने प्रेरित होऊन भाजपा जगणारी माणसं म्हणजे माझी ऊर्जा आहे. ही ताकत नांदेड उत्तर जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक हरणे आता शक्य नाही असा विश्वास व्यक्त केला.जिल्हा कार्य समितीच्या समारोपीय भाषणात आ.राम पाटील रातोलीकर म्हणाले की, कार्यकर्त्यांनी हवेच्या भरोस्यावर न राहता मोदीजीच्या कार्याची हवा मतदार रुपी ट्यूब मध्ये भरायची असेल तर पाईप बणून मोदींची हवा मतदारांपर्यंत पोहचवीने गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसची सत्ता मोदीजीच्या सत्तेपेक्षा किती दुबळी होती.या बाबत महागाईच्या निर्देशांकाचे अनेक दाखले देऊन कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे समारोपीय विचार मांडले. या कार्यक्रमांची सुरवात प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाना पुष्पमाल्या अर्पण करून तसेच मान्यवारांच्या हस्ते धूप व दीप प्रज्वलीत करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा महामंत्री प्रा.किशनराव मिरासे यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. सूर्यवंशी,बालाजी स्वामी,अशोक नेमानिवार,रामराव भालेराव,जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर, शंकर मुतकलवाड,विजया घिसेवाड,ऍड.अविनाश राठोड,सचिव सौ. केतकी चौधरी, भगवान पानेवार,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या राठोड,उपाध्यक्ष सौ. मंजुषा शेटे, प्रियंका सूर्यवंशी,किसान मोर्चा अध्यक्ष सुधाकर पाटील कदम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप राठोड,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास साबळे, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष हुरदुके, मंडळ अध्यक्ष बालाजी पाटील खटिंग (मुदखेड),गणेश पाटील कापसे(भोकर),डॉ.लक्षुमन पाटील इंगोले(अर्धापूर),तातेराव वाकोडे (हदगांव), गजानन चायल(हिमायत नगर),बालाजी आलेवार (किनवट),श्रीकांत घोडेकर(माहूर),पंचायत राज व ग्रामविकास जिल्हाध्यक्ष मनोज कमठे यांच्यासह जिल्हा भरातून सर्व आघाड्या, प्रकोष्ठ,जिल्हा,मंडळ पदाधिकारी व शहर अध्यक्ष,महामंत्री यांच्यासह जिल्हा कार्यसमितीस अपेक्षित सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.