हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
दि.६ रोजी मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांच्या जयंतीनिमित्त तथा पत्रकार दिनानिमित्ताने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शाखा हिमायतनगर जिल्हा नांदेड यांच्यावतीने साजरी करण्यात आली.
हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी हिमायतनगर तालुका अध्यक्ष देवानंद गुंडेकर, शहराध्यक्ष अनिल नाईक, तालुका उपाध्यक्ष प्रशांत राहुल वाढ, महासचिव गणपत नाचारी, पत्रकार धोंडोपंत बनसोडे, प्रकार गंगाधर गायकवाड, यश अकॅडमी चे संचालक शेख हनीफ सर पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणारे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा