मनसे कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकासाठी तयार राहण्याचे आदेश..मनसे नेते दिलीप धोत्रे

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यात पुढे होणाऱ्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश मराठवाडा दौऱ्यावर असलेले मनसे नेते दिलीप बापू धोत्रे व प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे यांनी दिले असल्याची माहिती मुदखेड ता. अध्यक्ष बालाजी पाटील कल्याणे यांनी दिली आहे.



तालुक्यात पुढील होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यां निवडणुकाची तयारी करण्याच्या सूचना भोकर येथे असलेल्या मध्यवर्ती मनसे कार्यालयात एका बैठकीदरम्यान देण्यात आल्या. कारण पुढे होणार असलेल्या निवडणुका मनसे आपल्या स्वबळावर लढणार असल्याने कार्यकर्त्यांनी जनतेसोबत संपर्क वाढवुन जनतेच्या अडीअडचणी जाणून घेवुन काम करण्याच्या सूचना सुध्दा या कार्यक्रमात कार्यंकत्यांना देण्यात आल्या. याचकारणाने तालुक्यात मनसेच्या एंट्रीने पुढील होणाऱ्या निवडणुका रंगतदार होणार असल्याचे दिसुन येत आहे. या कार्यक्रमाला मुदखेड तालुका व भोकर तालुक्यातील पद्अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी जिल्हाअध्यक्ष मोंटीसिंग जहागीरदार,नांदेड शहराध्यक्ष शाफिक शेख,वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड,भोकर तालुका अध्यक्ष साईप्रसाद जटलवार,मुदखेड तालुका अध्यक्ष बालाजी पाटील कल्याणे,भोकर शहराध्यक्ष आकाश गेंटेवार,भोकर महिला तालुका अध्यक्षा पुजाताई बनसोडे,मुदखेड महिला तालुका अध्यक्षा कल्पनाताई देशमुख, मनसे ता उपाध्यक्ष मारोती बोदमवाड ,शहर संघटक बालाजी तेलंगे,मनविसे शहर अध्यक्ष आकाश चमकुरे,शंतनु मुंगल,शंकर मुतकलवाड, भोकर तालुका उपाध्यक्ष सुनील पवार,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष पवन पवार पाटील,विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष राजू पाटिल कवडे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विष्णुपूरी प्रशालेची माजी विद्यार्थीनी दीपा दिगंबर हनवते हीचे सुयश

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

संस्कार-गुणवत्ता-प्रगती या सुत्रीचा परिणाम म्हणूनच जि.प.हा.विष्णुपूरीचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले नैपुण्य सिध्द करीत आहेत. नुकतीच दीपा हनवते या माजी विद्यार्थीनीची निवड पुणे येथील नामांकित कंपनीमध्ये अभियंता म्हणून झाली आहे.

 यानिमित्ताने प्रशालेच्यावतिने तिचा सत्कार व कार्याची नोंद घेतली. मुख्याध्यापक एन.एन.दिग्रसकर यांनी दीपाचा शाल,पुष्पहार व मिठाई खावू घालून सत्कार व कौतुक केले. याप्रसंगी शिवाजी वेदपाठक यांनी इयत्ता दहावीचे महत्त्व पुढे येवू घातलेल्या प्रत्येक नौकरीच्या संधीत किती उपयुक्त आहे,याचे विवेचन केले.यानिमित्ताने पालक दिगंबर हनवते यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम.ए.खदीर यांनी केले.

यासमयी दीपास राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी,कृष्णा बिरादार, उदय हंबर्डे, सौ.उज्ज्वला जाधव,सौ.पंचफुला नाईनवाड, विकास दिग्रसकर,प्रविण सूर्यवंशी, दत्ता केंद्रें,मारोती काकडे,श्रीपाद बोरीकर, पद्माकर देशमुख आणि इयत्ता दहावीचे निवडक विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या.

अठरा पगड जातीच्या मावळयांची " छावा" संघटनेच्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

  रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

 कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवू नये त्या अनुषंगाने आज प्रजासत्ताक दिनानिमित्त अठरा पगड जातीच्या मावळयांची "छावा" संघटने तर्फे  मुदखेड येथील सी.आर.पी.एफ. कॅम्प गेट    जवळ  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात  आले होते.  छावा" संघटनेचे जिल्हा प्रमुख स्वप्नील फुले यांनी तरूणांनी रक्तदान करण्याचे आवाहान केले होते.  या शिबिरात ४० नागरिकांसह  कर्मचारी यांनी रक्तदान केले आहे.



कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राबवित असलेला रक्तदानाचा उपक्रम स्वागतार्ह आहे. आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा पडू नये, रक्तसाठा ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते . यावेळी छावा" संघटनेचे जिल्हा प्रमुख स्वप्नील फुले, पोलीस निरीक्षण महेश  शर्मा साहेब, तालुकाप्रमुख केशव शिंदे पाटील, तालुका संघटक आदित्य घोंगडे, जेष्ठ पत्रकार मनोज कमटे व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात  उपस्थिती होती.

जी. के. इंग्लिश स्कूल मुगट येथे ७३ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहर

मुगट येथील जी. के.  इंग्लिश स्कूल मध्ये ७३ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.स्व. गिरिजाबाई कल्याने स्मृति  प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक मा. श्री. किशनराव पाटील कल्याणे यांच्या हस्ते महात्मा गांधीजीं व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी उपस्थित मान्यवर मंडळी हस्ते सुध्दा प्रतीमा पुजन करण्यात आले. झेंडावंदनाचा मुख्य कार्यक्रम शाळेच्या मैदानात करण्यात आला.

 या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.यशोमती लंगोटे पाटील मॅडम व मुगट येथील विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामपंचायतचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका कु.शिवनंदा कल्याणे, मॅडम व सौ. पल्लवी हाटकर मॅडम यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने राष्ट्रगीत ,प्रार्थना, भारतीय संविधानाचे वाचन व विविध देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमाचे आभार आशिष कल्यानणे सरांनी केले, अशाप्रकारे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.




सूत्रसंचालन ही दुर्मिळ कला कुलकर्णी यांनी पूर्णतः आत्मसात केली आहे -- शिक्षक आमदार विक्रम काळे

  संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

        अभ्यासपूर्ण, बहारदार,कार्यक्रमानुरुप  सूत्रसंचालन करणे ही एक दुर्मिळ कला असून ती राज्य पुरस्कार प्राप्त बहुश्रुत शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी पूर्णतः आत्मसात केली आहे,याचा मला शिक्षक आमदार म्हणून अभिमान वाटतो, असे गौरवउद् गार शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी कुलकर्णी यांच्या सत्कार प्रसंगी काढले. नुकतीच आमदार काळे यांनी गुणवत्तापूर्ण प्रशाला जि.प.हा.विष्णुपूरी येथे सदिच्छा भेट दिली.यासमयी त्यांच्या सोबत शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष साहेबराव हंबर्डे, प्रा.डी.बी.जांभरुनकर,डॉ विक्रम देशमुख,डॉ अशोक मोटे, प्रा.मजरोद्दीन,प्राचार्य शेटकार,यशवंत कांबळे व मुख्याध्यापक एन.एन.दिग्रसकर हे उपस्थित होते.

                      यावेळी अत्यंत अभ्यासपूर्ण, नेटके व बहारदार सूत्रसंचालनामुळे शिक्षक राजेश कुलकर्णी यांचा आमदार काळे यांनी उत्स्फूर्तपणे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि विशेष नोंद घेतली. सूत्रसंचालनाच्या माध्यमातून कुलकर्णी यांनी आमदार काळे यांचा जीवनपट व राजकीय कारकीर्द सुंदर काव्यातून आगळ्यावेगळ्या पध्दतीने सादर केल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वीही अनेक कार्यक्रमाच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळे कुलकर्णी यांचा अधिकारी, पदाधिकारी व राजकीय व्यक्तिंच्यावतीने सन्मान व सत्कार करण्यात आला आहे.

खतांचे वाढलेले दर कमी करुन शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून द्या.

 -------------------------------------------------

केंद्रिय कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर,केंद्रिय खते व रसायन मंत्री मनसुख मंडाविया यांना मुदखेड राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी.

----------------------संपादक आशिष मुगटकर----------------------------------



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

    या वर्षी सर्वत्र चांगल्या पाऊसामुळे जिल्ह्यात पेरणी चांगली झाली आहे. गहू,ज्वारी,हरभरा,ऊस,केळी,पपई व फुलशेती या पिकांना खतांची आवश्यकता असते.अर्धापूर व मुदखेड तालुक्यात केळी,ऊस,पपई व फळबागा असल्याकारणानं खतांचा वापर शेतकऱ्यांना करावा लागतो पण खतांचे दर गेल्या तीन महीन्यात वाढून गगनाला भिडले आहेत.

  १०:२६:२६ या खतांचे दर खरीपात ११७५/-रूपये प्रति ५० कि ग्र एवढे होते ते १३५०/-ईतके झाले आणि सध्या १५००/-रूपये आहे.पोट्यश १०४०/- एवढे होते ते १३५०/- झाले आणि सध्या १७००/-रू.प्रति पोते झाले आहेत, गेल्या महिन्यापासून १०:२६:२६, १२:३२:१६ व १४:३५:१४ डिएपी,पोट्यश या खतांचा तुटवडा झाला आहे.

      ऐन हंगामात शेतकर्यांपूढे नवा गंभीर प्रश्न तयार झाल्यामुळें उत्पादन खर्च वाढण्याची समस्या तयार झाली आहे, सध्या तर डीएपी चा तर पुरवठाच होत नाही झालाच तर त्यासोबत ईतर खते लिंकिंग ने घेण्याची सक्ति केल्यामुळें शेतकर्यांना विनाकारण मोठा भुर्दंड भरावा लागत आहे.म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार सुजित नरहरे यांच्यामार्फत केंद्रिय कृषि मंत्री तथा किसान कल्याणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह केंद्रिय खते व रसायन मंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे दर कमी करण्याची मागणी केली आहे.

यावेळी शहराध्यक्ष महंमद बुराण, तालुका उपाध्यक्ष प्रदीप पाटील ढगे,सोशियल मिडीया अध्यक्ष ऋषिकेश गोंदगे, हनमंत पाटील नटूरे,रामा गुंजकर, पद्माकर बोकेफोड,प्रशांत मुंगल,अंकुश मोरे,भगवान कल्याणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

सेवा सहकारी संस्थेच्या विजयात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली

निवघा,डोणगाव, वासरी या गावांत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली...!!

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. त्यापुर्वी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेनदिवस वाढत असल्याने जिल्हाअधिकारी डॉ.विपीन इटनकर साहेब  यांनी कोरोना नियमावली कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.परंतु या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणीचा विसर मुदखेडला पडला आहे.या नियमांचे पालन तालुक्यात कुठेच होत नाही. मुदखेड तालुक्यात हे नियम केवळ कागदावरच दिसत आहेत. 

तालुक्यातील निवघा,डोणगाव,वासरी या गावात कोरोनाचे नियम पायदळी तुडवत सोसायटी विजय उत्सव मोठ्या संख्येने लोकांच्या उपस्थितीत साजरा केला.  याचे फोटो सोशल मीडिया वर फिरत आहेत.यात मुदखेड तालुक्यातील मा.सभापती प्रतिनिधी व तालुका अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य यांचा या फोटो मध्ये समावेश आहे.



एखाद्या पक्षाच्या जबाबदारी नेतेच जर बेजबाबदार पणे वागत असतील तर कार्यकर्ते, सामान्य माणसाने यांचा काय आदर्श घ्यावा.

याचेच परिणाम दोनच दिवसात दिसले जिल्ह्यात पहिला मुदखेडतालुका आहे ज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले.

पालकमंत्री साहेबांनी या कडे विशेष लक्ष देवून येणाऱ्या काळात तरी अशा घटना घडु नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

प्रत्येकाने कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी केली कोरोनाला रोखता येईल.


दुष्काळी अनुदान यादी बँकेत इंग्रजीत लावल्याने मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना ठरते अडचण.

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या याद्या व आपल्या तहसील अंतर्गत मराठीमध्ये न दाखल करता इंग्रजीत दाखल केलेली आहेत परंतु बहुतांश शेतकरी यांना मराठी देखील सरळ भाषेत वाचता येत नाही अशा अनेक शेतकऱ्याकडून इंग्रजी भाषेत वाचन कशा प्रकारे करता येईल या गोष्टीकडे आपल्याकडून दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांना बँकेत लावलेल्या इंग्रजीतील याद्या वाचन करता न आल्याने संबंधित बँक कर्मचारी यांच्याशी बोलणे करून कृपया आमच्या नाव व रक्कम आम्हाला पाहून द्यावी अशी अनेक शेतकऱ्यांनी विनंती केली होती परंतु संबंधित कर्मचारी यांनी आम्हाला न विचारता आमच्याकडे तहसील मार्फत इंग्रजी भाषेत याद्या प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आपण संबंधित तहसील कार्यालय विचारणा करावी आमचा वेळ वाया घालू नका अशा शब्दात त्यांनी आम्हाला उत्तर दिले हे आम्ही शेतकरी आपणास प्रश्न आहे की संपूर्ण शेतकऱ्यांचे सातबारे मराठी लिखाण आहेत तर अनुदान याद्या ह्या कोणत्या नियमानुसार इंग्रजी भाषेत पाठवले आहेत व आपणास मराठी भाषेत याद्या तयार करण्यास कोणते अडचणी निर्माण झाले आहेत याचा खुलासा कळविण्यात यावा तसेच वरील अनुदान बँकेत मार्फत उचलत असताना बँकेमध्ये बँक खात्यासाठी आमच्याकडून एका व्यक्तीला एक हजार रुपये जमा ठेवावे लागत आहेत बाकी उर्वरित रक्कम लिहून ज्या व्यक्तीला शासनाने दुष्काळी अनुदान म्हणून एक हजार रुपये दिले अशा शेतकरी जर १ हजार एक हजार रुपये खातेदाराच्या नावे जमा करून घेतील तर त्या शेतकऱ्यांच्या आपल्याकडून काय मदत दिली तसेच संबंधित अनुदान उचलण्यासाठी रजिस्टर नोटरी करण्यात सातशे ते एक हजार रुपये लागत आहेत कुणाच्या हाती पैसे लागणार आहेत अशा अनेक प्रकारच्या अडचणी आम्हा शेतकऱ्यांना संबंधित अनुदान वाटप करणार बँक शाखा व संबंधित अनुदान बँकेत जमा करणार तहसील यांच्यामार्फत शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे वरील शेतकऱ्यांच्या समस्या आपण बँक व तहसील कार्यालय निवारण करून पैसे उचलण्यात सोयीस्कर होईल याची दक्षता घ्यावी. असे निवेदन देण्यात आले.

  कालीदास जंगीलवाड, सुशील मुंगल, गिरीश कोत्तावार, रमेश बोडके, अमोल अड, गजानन शेट्टे गणेश देवडे, संतोष चंद्रे, बालाजी पानेवार, बालाजी तांदुलवाले, अंजनवाडी शिवाजी, मारुती काळेवार सूर्यवंशी, सुरेश लक्ष्मण सूर्यवंशी  पुरभाजी मदनवाढ आदी शेतकरी  उपस्थित होते.

आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम पर्याय देणार-प्रा.जांभरूणकर

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणूकांसाठी जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जिल्हास्तरावरून जेष्ठ नेते, माजी मंत्री मा.कमलकिशोर कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मा. हरिहरराव भोसीकर साहेब यांनी पदभार स्वीकारल्यापासून जातीने लक्ष देऊन पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून अहोरात्र काम करत आहेत.

मुदखेड तालुक्यात यापुर्वी पक्ष निरीक्षक पाठवून आढावा बैठक घेऊन व जिल्हास्तरावरील नेत्यांना पाठवून पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत.

काल दि.१२ जाने.रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ता बैठक जिल्हासरचिटणीस प्रा.डी.बी.जांभरूणकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह मुदखेड येथे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेबांचे ८०%समाजकारण व २०%राजकारण समोर ठेवून कार्यकर्त्यांनी काम केलं पाहीजे,आगामी निवडणूकांमध्ये काँग्रेस सोबत आघाडी होईल की नाही याचा विचार न करता आपण आपल्या स्वबळावर सक्षम उमेदवार देऊन जनतेला पर्याय दिला पाहीजे,कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून सर्व सामान्यजनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.काही प्रश्न सुटल नसतील तर ते आमच्यापर्यंत पोहचवावेत ते प्रश्न सोडवण्याची ताकद आपल्या नेत्यांमध्ये पक्षात आहे. प्रश्न निश्चितच सोडवले जातील अशी ग्वाही यावेळी दिली. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी कामाला लागावे अशा सुचना दिल्या.

यावेळी बिलोलीचे कार्याध्यक्ष नागनाथराव खळगे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांनी केले तर आभार संतोष दर्शनवाड यांनी मानले यावेळीं इजळीचे तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदराव पाटील मुंगल,आशिष कल्याणे,हनमंत नटूरे,महमंद बुराण,सोशियल मिडीया अध्यक्ष ऋषिकेश पाटील,जळबाजी हाटकर,शिवाजी पवार, माधव व्यवहारे, शंकर खवास,महंमद अली,शेख सौदागर,महमद ईरफान,एकनाथ तारू, सोनु निखाते,आदी उपस्थित होते.

वाई येथील सी.सी.रस्त्याच्या कामाची गायकवाड यांनी केली पाहणी

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका/ प्रतिनिधी

 तालुक्यातील येथील मौजे वाई हे गावं मुदखेड -भोकर - उमरी या तीन तालुक्यांच्या सांगमावर वसलेले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून विकास कामांपासून वंचित असलेले पण मुदखेड पासून अगदी जवळ आणि केवळ नऊ किलोमीटर वर असलेले गावं.राजकीय महत्वकांगसेतून हरवलेले. या गावास गेली अनेक वर्ष रस्त्याचा त्रास भोगावा लागला खरे,राज्यात भाजपाची सत्ता आली अन या गावावर पकड असलेले भाजपाचे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घालून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डोरली गेट ते थेट ढोल उमरी शिवे पर्यंत चा रस्ता मंजूर करुन घेतला आणि ३कोटी ६८ लक्ष रुपये निधीतून अगदी उत्कृष्ट रस्ता वाई वाशियांना मिळाला. याच बलबुत्यावर वरदडा  तांडा आणि वाई या गावातील जनतेने ग्रामपंचायतीची सत्ता भाजपा प्रणित ग्रामविकास प्यानलाला एक हाती दिली.त्या नंतर या भागाच्या विकासाला खरी सुरवात झाली असे म्हटलेतर वावगे ठरणार नाही.

या अगोदर राष्ट्रीय पेयजल योजनेतून या गावास पाणि पुरवठ्याची महत्व कांगशी योजना मंजूर झाली होती खरी पण रुपये 48लक्ष एवढ्या किंमतीच्या पा. पु. योजनेचा तत्कालीन सरपंच व आश्रयदात्या प्रस्थापित राजकारण्यांनी या योजनेचा चुराडा केला. आज तागायत राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे ही योजना ग्रामपंचायतिकडे हस्तान्तरीत न झाल्याने या विषयात विद्यमान ग्रामपंचायतिच्या सत्ताधा र्यांना लोकांच्या निकडीच्या समस्येवर काम करणे त्रासदायक ठरले आहे.

 विद्यमान सरपंच सौ. शोभा केशव पाटील ढगे यांच्या कुशल कर्तृत्वामुळे टंचाईच्या निधीतून जुन्या विहिरीचे पुनःर जीवन केल्याने वाईकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या संकटावर काही प्रमाणात मात मिळवता आली आहे.

  आ.राम पाटील रातोळीकर यांच्या स्थानिक विकास निधीतून पुरुष आणि महिलांना सार्वजनिक शोच्यालय बांधकाम पूर्ण झाले आहे. जनवारांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गावाच्या दोन्ही दिशांना सार्वजनिक पाणवठे उभारण्यात आली आहेत. ग्रामपंचायत दुरुस्ती अंतर्गत संगणक कक्ष बांधण्यात आले आहे. जि.प. शाळा दुरुस्ती अंतर्गत डिजिटल सांगणकीय फळा बसवून डिजिटल शिक्षण प्रणालीचा वापर गोर गरिबांच्या मुलांकरिता सुरु करण्यात आला आहे. वर्ग खोल्या डिजिटल करुन, टाईल्स फर्शी, रंग रंगोटी साकरण्यात आली आहे.सर्वांना माफक दरात पिण्याचे शुद्ध पाणि मिळावे या हेतूने बौध्द वस्तीत स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे ए.टी. एम.सयंत्र बसविण्यात आले आहे.

सत्ता काळातील दोन वर्ष कोरोना महामारीत गेली न गेली सद्या ग्रामपंचायतिने दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत नुकतेच सिमेंट रस्त्याच्या कामास सुरवात केली आहे. कामाचा दर्जा उत्कृष्ट व्हावा या हेतूने कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आज भाजपाचे मराठवाडा प्रभारी प्रवीण गायकवाड यांनी अचानक कामास भेट देऊन पाहणी करुन  चालू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत काही महत्व पूर्ण सूचना केल्या.

या वेळी सरपंच प्रतिनिधी केशव पाटील ढगे, उपसरपंच प्रतिनिधी गंगाधर कसबे, सेवा स. सो. चे संचालक शंकरराव हनवते, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मारुती गायकवाड,माधव पाटील ढगे, विनायक एडके, भुजंग पाटील वडजे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

जी.के इंग्लिश स्कूल मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ जयंती साजरी

संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहार

 मुगट येथील जी.के इंग्लिश स्कूलमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक श्री किसनराव पाटील कल्याणे तर उपाध्यक्षपदी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ यशोमती लिंगोटे पाटील ह्या होत्या.

येथील विद्यार्थ्यीनी मोठ्या उत्साहात यावेळी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून शाळेत उपस्थित होत्या. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.


गंगाराम कल्याणे, बजरंग जाधव आरोही विठ्ठले, जयराज मुंगल, गणेश देवकर, शिवकन्या जाधव, सानिका लिंगायत, भक्ती सोनटक्के,श्रीजय पवार, श्रध्दा मुंगल, सृष्टी लिंगायत,श्रीजा जोशी,श्रेयश लिंगायत, आराध्या तुप्पेकर,प्राची तुप्पेकर, तेजस्वीनी लिंगायत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवनंदा कल्याणे,तर आभार पल्लवी हाटकर यांनी केले.

सद् गुरु संत श्री.आत्माराम महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न

संपादक आशिष मुगटकर


 मुगट ( वार्ताहर)

मुगट येथील ग्रामदैवत सद् गुरु संत श्री.आत्माराम महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या हर्ष उल्हासात येथील बोधी मठात संपन्न झाला.

संस्थानचे मठाधिपती संत श्री.सिताराम महाराज यांच्या हस्ते सद् गुरु संत श्री आत्माराम महाराज यांच्या समाधी स्थळास दुग्ध अभिषेक , धार्मिक विधी संपन्न करण्यात आली. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता ह.भ.प.भगवान महाराज राजेगोरे शेलगावकर यांचे कीर्तन झाले ठीक १२:०० वाजता भक्तांनी पुष्पवृष्टी करत सद्गुरु संत श्री आत्माराम महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. 

यावेळी मोठ्या प्रमाणात अनेक भक्त मंडळी या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी झाली होती.

या जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात गुरुचे परमशिष्य मानकोजी यांनी दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर १७ व्या शतकात पासून सुरू करण्यात आली ती परंपरा आज सुद्धा २१ व्या शतकात कायम आहे असुन मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते आहे.

या जन्मोत्सव सोहळ्यासाठी शेलगाव राजेगोरे येथील गुरुचे परमशिष्य आनसाची यांची पालखी गुरूच्या भेटीसाठी व जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी पाच दिवस मुगट येथे मुक्कामास येते व हा जन्मोत्सव सोहळा साजरा करून एकादशीचा मुहूर्तावर आपल्या गावी शेलगाव राजेगोरे येथे प्रस्थान करते. ही परंपरा आज सुद्धा १७ व्या शतकापासून अखंडितपणे चालू आहे. या जन्मोत्सव सोहळ्यात शेलगाव राजेगोरे येथील प्रत्येक घरातील एक व्यक्ती या जन्मोत्सव सोहळ्यात उपस्थित असतोच. यावर्षी सुद्धा मोठ्या संख्येने शेलगाव राजेगोरे व परिसरातील अनेक गावातील भक्तमंडळी या जन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित होती. दुपारी १२ वाजता जन्मोत्सव साजरा केल्यानंतर दुपारी दहीहंडी फोडली जाते.

सद् गुरु श्री.आत्माराम महाराज यांच्या भेटीसाठी परमशिष्य आनसाजी (शेलगाव राजेगोरे) येथून गुरूच्या भेटीस येतात ही परंपरा अखंडितपणे शेलगाव येथील भक्तांकडून सुरू आहे. गुरु चरणी अपार श्रद्धा व भक्ति असल्यामुळे गुरूंनी अनेक भक्तांना सद् मार्ग दाखवलेला आहे.गुरुनी भक्तांना अनेक दृष्टांत देले आहेत. भक्ताच्या हाकेला धावून येतात असा अनेक भक्ताचा अनुभव आहे.

यावर्षी सुद्धा जन्मोत्सव सोहळा निमित्य मोठ्या प्रमाणात यात्रा भरली होती. मोठ्या संख्येने अनेक दुकाने या ठिकाणी लावण्यात आली होती. यावेळी मोठ्या हर्ष उल्हासात सद् गुरु संत श्री आत्माराम महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.







नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षक दरबारात आ. विक्रम काळे यांना घातला घेराव

 प्रचलीत नियमानुसार सरसगट अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिल आश्वासन.

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

 आज ३१ डिसेंबर २०२१ रोजी नांदेड येथील स्काऊड गाईड भवन येथे आ. विक्रम काळे यांचा शिक्षक दरबार होता प्रसंगी जिल्ह्यातील प्राथमिक, मध्यमिक,उच्च माध्यमिक ,घोषित, अघोषित अंशतः अनुदानित शिक्षकांनी आमदारांना घेराव घेऊन तुम्ही १५ वर्ष आमदार आहेत आमच्यासाठी काय केलात?नुसते गुळगुळीत आश्वासने देऊ नका अघोषित, घोषित, अंशतः अनुदानित, त्रुटी पूर्तता यांना सरसगट प्रचलीत नियमानुसार अनुदान द्या या मागणीसाठी सर्वच शिक्षकानी आमदारांना घेराव घातला .

यावेळी आमदारांनी मी ही प्रचलित अनुदान मिळून देण्याच्या मतावर ठाम आहे आणि सर्वाना प्रचलीत नियमानुसार अनुदान मिळवून देईल असे आश्वासन दिले खरे पण गेली १५ वर्ष असेच आश्वासन देतात,कृतीत मात्र काहीच नसल्याने सर्वच शिक्षकांचा रोष आमदार काळे साहेबांवर असल्याचे दिसत होते.

पण आत्ता तरी बोलले ते खरे करतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी  प्रा कैलाश खानसोळे ,प्रा सुदर्शन फाजगे,प्रा.गजलवाड सर,प्रा सुरेखा वडजे, प्रा किन्हाळकर सर,प्रा कैलाश जगताप यासह जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक ,उच्च माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकप्रिय बातम्या