मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या याद्या व आपल्या तहसील अंतर्गत मराठीमध्ये न दाखल करता इंग्रजीत दाखल केलेली आहेत परंतु बहुतांश शेतकरी यांना मराठी देखील सरळ भाषेत वाचता येत नाही अशा अनेक शेतकऱ्याकडून इंग्रजी भाषेत वाचन कशा प्रकारे करता येईल या गोष्टीकडे आपल्याकडून दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांना बँकेत लावलेल्या इंग्रजीतील याद्या वाचन करता न आल्याने संबंधित बँक कर्मचारी यांच्याशी बोलणे करून कृपया आमच्या नाव व रक्कम आम्हाला पाहून द्यावी अशी अनेक शेतकऱ्यांनी विनंती केली होती परंतु संबंधित कर्मचारी यांनी आम्हाला न विचारता आमच्याकडे तहसील मार्फत इंग्रजी भाषेत याद्या प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आपण संबंधित तहसील कार्यालय विचारणा करावी आमचा वेळ वाया घालू नका अशा शब्दात त्यांनी आम्हाला उत्तर दिले हे आम्ही शेतकरी आपणास प्रश्न आहे की संपूर्ण शेतकऱ्यांचे सातबारे मराठी लिखाण आहेत तर अनुदान याद्या ह्या कोणत्या नियमानुसार इंग्रजी भाषेत पाठवले आहेत व आपणास मराठी भाषेत याद्या तयार करण्यास कोणते अडचणी निर्माण झाले आहेत याचा खुलासा कळविण्यात यावा तसेच वरील अनुदान बँकेत मार्फत उचलत असताना बँकेमध्ये बँक खात्यासाठी आमच्याकडून एका व्यक्तीला एक हजार रुपये जमा ठेवावे लागत आहेत बाकी उर्वरित रक्कम लिहून ज्या व्यक्तीला शासनाने दुष्काळी अनुदान म्हणून एक हजार रुपये दिले अशा शेतकरी जर १ हजार एक हजार रुपये खातेदाराच्या नावे जमा करून घेतील तर त्या शेतकऱ्यांच्या आपल्याकडून काय मदत दिली तसेच संबंधित अनुदान उचलण्यासाठी रजिस्टर नोटरी करण्यात सातशे ते एक हजार रुपये लागत आहेत कुणाच्या हाती पैसे लागणार आहेत अशा अनेक प्रकारच्या अडचणी आम्हा शेतकऱ्यांना संबंधित अनुदान वाटप करणार बँक शाखा व संबंधित अनुदान बँकेत जमा करणार तहसील यांच्यामार्फत शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे वरील शेतकऱ्यांच्या समस्या आपण बँक व तहसील कार्यालय निवारण करून पैसे उचलण्यात सोयीस्कर होईल याची दक्षता घ्यावी. असे निवेदन देण्यात आले.
कालीदास जंगीलवाड, सुशील मुंगल, गिरीश कोत्तावार, रमेश बोडके, अमोल अड, गजानन शेट्टे गणेश देवडे, संतोष चंद्रे, बालाजी पानेवार, बालाजी तांदुलवाले, अंजनवाडी शिवाजी, मारुती काळेवार सूर्यवंशी, सुरेश लक्ष्मण सूर्यवंशी पुरभाजी मदनवाढ आदी शेतकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा