मुदखेड तालुका / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणूकांसाठी जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जिल्हास्तरावरून जेष्ठ नेते, माजी मंत्री मा.कमलकिशोर कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मा. हरिहरराव भोसीकर साहेब यांनी पदभार स्वीकारल्यापासून जातीने लक्ष देऊन पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून अहोरात्र काम करत आहेत.
मुदखेड तालुक्यात यापुर्वी पक्ष निरीक्षक पाठवून आढावा बैठक घेऊन व जिल्हास्तरावरील नेत्यांना पाठवून पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत.
काल दि.१२ जाने.रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ता बैठक जिल्हासरचिटणीस प्रा.डी.बी.जांभरूणकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह मुदखेड येथे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेबांचे ८०%समाजकारण व २०%राजकारण समोर ठेवून कार्यकर्त्यांनी काम केलं पाहीजे,आगामी निवडणूकांमध्ये काँग्रेस सोबत आघाडी होईल की नाही याचा विचार न करता आपण आपल्या स्वबळावर सक्षम उमेदवार देऊन जनतेला पर्याय दिला पाहीजे,कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून सर्व सामान्यजनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.काही प्रश्न सुटल नसतील तर ते आमच्यापर्यंत पोहचवावेत ते प्रश्न सोडवण्याची ताकद आपल्या नेत्यांमध्ये पक्षात आहे. प्रश्न निश्चितच सोडवले जातील अशी ग्वाही यावेळी दिली. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी कामाला लागावे अशा सुचना दिल्या.
यावेळी बिलोलीचे कार्याध्यक्ष नागनाथराव खळगे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांनी केले तर आभार संतोष दर्शनवाड यांनी मानले यावेळीं इजळीचे तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदराव पाटील मुंगल,आशिष कल्याणे,हनमंत नटूरे,महमंद बुराण,सोशियल मिडीया अध्यक्ष ऋषिकेश पाटील,जळबाजी हाटकर,शिवाजी पवार, माधव व्यवहारे, शंकर खवास,महंमद अली,शेख सौदागर,महमद ईरफान,एकनाथ तारू, सोनु निखाते,आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा