मुगट वार्ताहर
मुगट येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रकसाळे , मार्गदर्शक मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोकमतचे पत्रकार आशिष कल्याणे, देशोन्नतीचे पत्रकार शुभम हाटकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष, मार्गदर्शक, प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी शाळेतील लहान बालकांनी उत्साहात आपले वक्तृत्व कौशल्य दाखवत सुंदर अशी भाषणे, गीते यावेळी सादर केली.
नुकताच शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे यांना नाशिक येथे उत्कृष्ट बालरक्षक कार्य गौरव पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी या जयंती मध्ये ज्या शालेय विद्यार्थ्यांनी चांगली भाषणे केली अशांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
यावेळी शालेय सांस्कृतिक विभागाचे शिक्षक रकसाळेसर, घोरडवारसर,शेवडीकरसर, बाऊसकरसर, खलीखसर,कोकणेसर, लव्हाळेसर, मोरेसर, लोखंडेसर, मंगनाळेसर,शेळगावेसर, जाधवसर, सावंतसर, शिक्षीका येरावार मॅडम, कुलकर्णी मॅडम, सोनाळे मॅडम, सुरेवाड मॅडम तसेच शालेय कर्मचारी अंभोरे, सावंत, सूर्यवंशी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


