मुदखेड तालुका प्रतिनिधी
दि.२६ रोजी येथील भारतीय जनता पार्टी च्या वतीने शासकीय विश्रामगृहात संविधान दिवसाचे औचित्य साधून वर्धापन, भारतीय संविधानाच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुस्प व पुस्प माल्या अर्पण करून, संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.तसेच अतिरेक हल्यात शाहिद झालेल्या हुतात्म्याना दोन मिनिटाचे मौन बाळगून आदरांजली अर्पण करण्यात आली. या नंतर लगेच प्रधानमंत्री मोदी यांच्या मनकी बात कार्यक्रमाचे प्रसारण उपस्थित कार्यकर्त्यांना एल.ई.डी. द्वारे दाखविण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड,जिल्हा सचिव भगवान पानेवार, सौ.केतकी चौधरी, ता.अध्यक्ष बालाजी पाटील खाटिंग,माजी नगरसेवक तथा ओबीसी नेते गोविंद गोपानपल्ले,मनोज कमठे,जि.का.का.सदस्य गोविंदराव पाटील खानसोळे,विठ्ठल पाटील पवार,ता.महामंत्री पुरुषोत्तम चांडक शहराध्यक्ष संजय सोनटक्के,ओबोसी आघाडी जिल्हा महामंत्री श्रीहरी बैनवाड,उपाध्यक्ष संजय चव्हाण, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस पिराजी गाढेकर,युवा मोर्चा ता.अध्यक्ष सतीश पाटील मुंगल,ओबीसी ता.अध्यक्ष गुलाब पाटील सूर्यवंशी, महिला मोर्चा ता.अध्यक्ष सौ. ठाकूर,अल्पसंख्यांक मोर्चा ता.अध्यक्ष हमीद भाई भंगारवाले, ता.उपाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे,माधव वाघमारे, प्रभू पाटील मुंगल,ता. सचिव विश्वंभर पाटील पवार, शहर युमो अध्यक्ष गजानन कमळे, दिनेश शेट्टे, प्रकाश पाटिल सुर्यवंशी,मा, विधान सभा सोशल मिडिया संयोजक प्रभाकर पांचाळ,मा सोशल मिडिया मुदखेड शहर संयोजक सोप्नील चंद्रे,संयोजक वामन गुंठे, माणिक पाटील मुंगल, मारोती मुंगल, गोपीनाथ मुंगल,शिवाजी जाधव,प्रधुन मुंगल,सतिश धोंडीबा मुंगल,संभाजी दंतलवाड,शेटिबा शिंदे, प्रल्हाद वाघमारे, परमेश्वर पवार,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
यावेळी भारतीय संविधान चिरायू होवो!डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो!भारत माताकी जय!वंदे मातरमं!या गोषनांनी संपूर्ण परिसर अगदी दुम दुमून गेला होता.






