नांदेड तालुका अध्यक्षपदी सरदार गुलाबसिंघ पुरनसिंघ यांची निवड.

 (अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नांदेड कडून )


नांदेड जिल्हा प्रतिनिधी

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या नांदेड तालुका अध्यक्षपदी सरदार गुलाबसिंघ पुरनसिंघ यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

गुरुद्वारा मातासाहेब देवांजी मुगट येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सरदार गुलाबसिंघ पुरनसिंघ अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या नांदेड तालुका अध्यक्षपदी निवड केली.

सतयुगी तपस्थान गुरुद्वारा मातासाहेब देवांजी मुगट या ठिकाणी जत्थेदार बाबा तेजासिंघ निहांण सिंघजी बुढ्ढादल यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख मनोज कमटे, जिल्हा महासचिव आशिष कल्याणे, मुदखेड तालुका अध्यक्ष अमोल टेकले सह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

नांदेड तालुका अध्यक्षपदी सरदार गुलाबसिंघ पुरनसिंघ यांची निवड झाल्याबद्दल प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख, जिल्हा अध्यक्ष शुद्धोधन हनवते यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या