श्रीमती सुलनबाई मुंगल यांचे निधन.

 संपादक आशिष मुगटकर

मुगट वार्ताहार

 आपनास कळविण्यात अत्यंत दुःख होते की श्री जर्नाधन दत्तराव मुंगल यांच्या मातोश्री श्रीमती सुलनबाई दत्तराव मुंगल यांचे (वय ८५) दि.३१/१२/२०२३रोजी सकाळी ३ वाजता मुगट येथील राहत्या घरी निधन झाले.

त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार दि.३१/१२/२०२३रोजी दुपारी २वाजता मुगट येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात मुलगा,सुन, नातं,नातु असा परिवार आहे.

जनभावनेचा आदर करून शासन निर्णय घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड प्रतिनिधी( सरदार गुलाब सिंग)

नांदेड येथील शिख समाजाचे शिष्ट मंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन भाटिया समितीच्या शिफारसी लागू न करता सचखंड गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 चा निर्णय कायम ठेवून अधिनियम कलम 11 ला रद्द करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली  गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य गुरमीत सिंग महाजन, मनप्रीत सिंग कुंजीवाले, भागेंद्र सिंग घडीराज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान या शिष्टमंडळाने शिखसमाजाच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या त्यात त्यांनी भाटिया समितीच्या शिफारशी या स्थानिक शिख समाजासाठी अनुकूल नाहीत तसेच भाटिया समितीच्या शिफारशींच्या जागी सध्याच्या सचखंड गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 ला कायम ठेवत अधिनियमाची संशोधित कलम 11 ला रद्द करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे. यावेळी या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शिख समाजाच्या भावनांचा आदर करूनच सरकार योग्य तो निर्णय घेईल असे आश्वासन याप्रसंगी दिले आहे.

सुशासन दिना निमित्त नागरिकांना भाजपा महिला मोर्चा तर्फे प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड वाटप

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि.२६रोजी येथील व्यंकटेशनगर स्थित मंदिराच्या प्रांगणात भारतीय जनता पार्टी मुदखेड शहर महिला मोर्चाच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न श्रध्येय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या 99 व्या जयंती निमित्त सुशासन दिन साजरा करण्यात आला यावेळी नागरिकांना त्यांच्या आजारपणात जो जिकरीने खर्च सोसावा लागत होता. तो पाच लाख रुपयांपर्यंतचा खर्च करण्यासाठी लागणारे आयुष्यमान भारत कार्डचे मोफत वाटप करण्याचे शिबीर घेण्यात  आले.या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपले एकूण ६८ कार्ड काढून घेतले असल्याचे संयोजक सौ. प्रियंका प्रकाश पाटिल सूर्यवंशी यांनी सांगितले.



यावेळी ग्रामीण रुग्णालय मुदखेडचे वैधकीय अधीक्षक डॉ व्रषाली येमेकर मैडम, प्रदीप कांबळे सर,गजानन गोरे सर, डॉ राजेश गुटे सर, संभाजी गायकवाड सर,विनायक सर,बालाजी सर,राजु सर, यांनी तांत्रिक सहाय्य केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक बाबुराव गोपानपल्ले, भाजपा आयुष्यमान भारत अभियान आघाडी ता.अध्यक्ष प्रल्हाद मस्के ता.महामंत्री पुरुषोत्तम चांडक,शहर अध्यक्ष संजय उर्फ पप्पू सोनटक्के,व्यापारी आघाडी ता.अध्यक्ष प्रवीण काचावार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष गजानन कमळे,कानोबा बिस्मिले,स्वप्नील चंद्रे, कौशल्याबाई दुधंबे,मीनाबाई सुर्यवंशी,नागेश साठे,संतोष चिलवंतकर, अभिषेक कुलकर्णी,शिवदास मांजरमकर, शांतनु मुंगल,अदीत्य गऊळकर, प्रकाश पाटिल सुर्यवंशी आदी उपस्तित होते.

मुदखेड शहर महिला मोर्चाच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि.२५ रोजी येथील व्यंकटेश नगर येथे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. प्रियंका प्रकाश सूर्यवंशी यांनी भारतरत्न, माजी पंतप्रधान श्रध्येय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या ९९ व्या जयंती निमित्त सुशासन दिन म्हणून महिला मोर्चाच्या वतीने रांगोळी स्पर्धा घेऊन साजरी केली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री प्रवीण अण्णा गायकवाड,ता.अध्यक्ष बालाजी पाटील खटिंग,पंचायत राज व ग्रामीण विकास आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज कमठे,जेष्ठ नागरिक ग्यानोबा लोकरे पाटील, विठ्ठलराव सूर्यवंशी,शहर अध्यक्ष संजय उर्फ पप्पू सोनटक्के,युवा मोर्चा ता.महामंत्री ज्ञानेश्वर भांगे पाटील रामेश्वर लोकरे, माधव मांजरमकर, संतोष चिलवंतकर आदींची उपस्थिती होती.



या कार्यक्रमात शहर अध्यक्ष प्रियंका सूर्यवंशी, कौशल्याबाई दुधंबे, राधाबाई यरपलवाड, सविता बाई कवळे, अर्चना सूर्यवंशी, सुरेखा लोकरे, शिमा लोकरे, जनाबाई सोनटक्के, वर्षा लोकरे, मिना सूर्यवंशी, मंदा भांगे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सक्रिय सहभाग घेतला होता. याप्रसंगी शालेय विद्यार्थीनींनी सुरेख अशा रांगोळी काढून भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारीं वाजपेयी यांना जयंती निमित्त रांगोळीरुपी आदरांजली अर्पण केली.यावेळी घेण्यात आलेल्या या रांगोळी स्पर्धेचे गुणांकन करून निकाल जाहीर करण्यात आला.

त्यात गुणांनुक्रमे प्रथम श्रावणी सुर्यवंशी,द्वितीय सानिका पवार,तृतीय ईश्वरी हामंद यांनी क्रमांक पटकावला आहे.

 असे कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश पाटील सूर्यवंशी यांनी केले आहे.

अमरनाथ आणि हिमशिखरे एक अद्भूत प्रवासवर्णन पुस्तकाचे आज प्रकाशन

 संपादक आशिष मुगटकर


अमरनाथ आणि हिमशिखरे एक अद्भूत प्रवासवर्णन

जीवनमुक्‍त ज्ञानी जरी झाले पावन ।

तरि देवतीर्थ भजन न सांगिती ॥

भूतळीची तीर्थे पहावी नयनीं ।

असे आर्त मनी विष्णुदासा ॥

तुझियां संगतीचे नित्य सुख घ्यावें ।

सार्थक करावे संसाराचे ॥

ऐसी ही उत्कंठा बहुत माझे पोटी ॥

सौ.मंगला देविदास फुलारी लिखित ‘अमरनाथ आणि हिमशिखरे’ या प्रवास वर्णनात वरील संत नामदेवांनी सांगितलेल्या ‘तीर्थावळीची’ आठवण येते कारण प्रस्तुत प्रवास वर्णनात लेखिकेची अमरनाथला जाण्यासाठी मनात असलेली उत्कंठा, संसारातील अनेक अडी-अडचणी, प्रवासाला निघण्यापूर्वीपासूनची तयारी- यात्रेला जाऊन आलेल्या मित्र-मैत्रिणीची मत-मतांतरे, अमरनाथ येथील वातावरणाची चित्तथरारकता आणि अनिश्‍चितता याबद्दल लेखिकेच्या मनातील घालमेल, भावनिक ओलावा प्रस्तुत वर्णनातून स्पष्टपणे उमटतो. बाबा बर्फाणीच्या वाटेवर लेखिकेने भोले अमरनाथ यांच्या दर्शनाला जाताना, पालखीवाले, घोडेवाले, खेचरवाले यांचे वर्णन करताना, तेथील स्थानिक लोकांना मिळणार्‍या रोजगाराचे वर्णन केले आहे. अमरनाथ गुहेकडे जातानाच्या पहेलगाम ते अमरनाथ गुहा आणि बालताल ते अमरनाथ गुहा येथील मार्ग कशा पद्धतीने निसर्गसौंदर्याची उधळण करतात. तेथील अरूंद रस्ते, खोलदर्‍या, बर्फाने अच्छादलेल्या पर्वतरांगा, हिमनद्या, धबधबे, पालखीवाल्याने वेळोवेळी दिलेल्या धोक्याच्या सूचना, जीव मुठीत घेऊन केलेल्या प्रवासाने श्री अमरनाथ स्वामीच नव्हेतर तेहतीस कोटी देव आठवल्याची कबुली लेखिका देतात. त्यानंतर श्री अमरनाथ स्वामींचे दर्शन झाल्यावर मिळणारी आत्मशांती, दिव्य अनुभव ही लेखिकेने वेगळ्या हातोटीने व्यक्‍त केलेले आहे. या पुस्तकाचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे

“दिल सच्चा कर्म अच्छा

बाकी सब शिव की इच्छा”

अशा अनेक हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेतील म्हणी, वाक्प्रचार, मुहावरे आणि Phrase नी पुस्तक अधिक रंजक झाले आहे. प्रवास करत असता लेखिकेने भारताच्या सैनिकांनी वेळोवेळी केलेली मदत, कर्तव्यपरायणता त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत, प्रस्तुत यात्रा वर्णनात लेखिकेने ईश्वराचे आभार मानलेले आहेतच पण त्या सोबत महादेवाची भक्‍ती करणारे त्यांच्या पूर्वजांचे पण आभार व्यक्‍त केले आहेत. यातूनच लेखिकेची धार्मिकवृत्ती, अगदी मनोभावे श्री महादेवाची केलेली पूजा-अर्चना याचाही उल्लेख आहे. श्री अमरनाथ स्वामीचे दर्शन घेऊन येताना अर्ध्या वाटेवर दिसलेले पती देविदास फुलारी सर थकलेला, घामाघुम चेहरा, खुर्चिवरून घसरल्यामुळे झालेली जखम, याहून पती देवीदास फुलारी विषयीची काळजी पण अतिशय संवेदनशीलच मनाने केली आहे.

प्रेमाचे प्रतिक असलेली श्रीनगर मधील ‘शालिमार वाटिका’ मुघल बादशाहा जहाँगीरने आपली पत्नी नूरजहाँसाठी निर्माण केलेला बगिचा. हे खरे काश्मीरचेच नव्हे तर पृथ्वीचे स्वर्ग आहे. येथील बगिच्याचे दिवान-ए-आम, दिवाण-ए-खास आणि जनाना गार्डन यांचे अतिशय मनोहरी वर्णन लेखिकेने प्रवास वर्णनात केले आहे. नयनरम्य मनमोहित करणारी वाटिका म्हणजे ‘निशात वाटिका’ येथील कारंजे, विविधरंगी फुले, फळे, फेणधवल शुभ्रपाणी, पायऱ्या-पायऱ्याची बाग, वृक्षांच्या दुर्लभ प्रजाती, गगनचुंबी चिनार वृक्ष यांचे वर्णन आढळले.

कालव्याचे शहर म्हणून प्रसिद्ध असणारे इटालितील व्हेनिस शहर, व श्रीकृष्णाची द्वारका याची आठवण आपण केलेल्या दल सरोवराच्या वर्णनावरून येते. दल सरोवरात वस्ती वसलेली आहे. प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी यांनी लिहिलेले बाबा बर्फाणी हे गीत मनाला खूपच भावते. निसर्गरम्य गुलमर्ग आणि गंडोला रोपवे ठिकाण समुद्रसपाटीपासून 13500 फुट उंचीवरील ठिकाणाचे वर्णन केले आहे. लेखिका सौ.मंगला फुलारी यांनी अत्यंत सरळ, साध्या आणि प्रमाण भाषेत लिहिले असल्यामुळे पुस्तकाच्या प्रस्तावनेपासून शेवटपर्यंत संबंध यात्रा आणि यात्रा करत असताना त्याला आलेले अनुभव डोळ्यांसमोर उभे राहतात. लिहण्याची शैलीदेखील अनौपचारिक असल्यामुळे वचकाला कुठलं दडपण येत नाही. कदाचित याच शैलीमुळे यात्रेत अनेक अडचणी आल्या तरी त्यांना वैतागून न जाता त्यांना धीराने तोंड कसे द्यावे याचे छोटेखानी मार्गदर्शन सुद्धा झाले.

माता वैष्णवी देवीच्या रूपाचे, मूर्तीचे दर्शन करत-करत माताराणीच्या मंदिराच्या स्थापत्यशैलीचे वर्णन मनमोहक पद्धतीने केले आहे. लेखिकेने प्रस्तुत प्रवास वर्णन 11 प्रकरणात लिहिले आहे. टिपलेल्या रंगित क्षणचित्रामुळे पुस्तकाला जीवंतपणा आला आहे. सौ.मंगला देवीदास फुलारी लिखित ‘अमरनाथ आणि हिमशिखरे’ प्रवास वर्णन या पुस्तकाचा पुस्तक परिचय, पुस्तकाचे प्रकाशन इसाप प्रकाशनचे श्री दत्ता डांगे यांनी केले आहे. 

पुस्तकाचे मुल्य केवळ 200 रू. आहे. पुस्तकाची मांडणी आणि सजावट विजय चित्तरवाड यांनी केली असून पुस्तकाला न्याय देणारे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी साकारले आहे आणि अक्षर जुळणी दामोदर गुट्टे यांनी केली आहे हे पुस्तक निश्चित वाचनिय झालेले आहे. वाचक निश्चितच भरभरून दाद देतील. पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 26.12.2023 रोजी नियोजन भवन नांदेड येथे होणार आहे. त्यानुषांगाने अभिप्राय.

डॉ.माणिक गाडेकर.

सहशिक्षक

राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड.

मो.8830092902

मुदखेड येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौरा पूर्व आढावा बैठक संपन्न

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि.१३ रोजी येथील शासकीय विश्राम गृहात भारतीय जनता पार्टी भोकर विधानसभा मतदार संघातील १०० सुपर वॉरियरची बैठक नुकतीच सपन्न झाली.

सविस्तर वृत्त असे की, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माजी ऊर्जा मंत्री मा. आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दि.२१ डिसेंबर नांदेड दौऱ्याच्या पूर्व तयारीची बैठक घेण्यात आली.या बैठकीत बूथ सशक्तिकरण कामी नेमलेल्या १०० सुपर वॉवरीय च्या प्रत्यक्ष बूथ निहाय्य कार्य या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली असून कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूक कामाचा गृहपाठ देण्यात आला असून, मेरा बूथ सबसे मजबूत!या उदघोशानी प्रेरित करण्यात आले आहे. या बैठकीस भाजपा भोकर विधानसभा निवडणूक प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल आणि गृह राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, प्रदेश सचिव तथा नांदेड लोकसभा समन्वयक देविदास भाऊ राठोड,भाजपा नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुधाकरजी भोयर,जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड, सुहास पाटील डोंगरगावकर,गजानन तुप्तेवार,लोकसभा विस्तारक ऍड. गंगाप्रसाद एन्नावार,विधानसभा विस्तारक भास्कर डोईबळे,नांदेड दक्षिणचे जिल्हा सचिव सदाशिव अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीसाठी भाजपा ता.अध्यक्ष गणेश पाटील कापसे(भोकर),बालाजी पाटील खटिंग(मुदखेड),डॉ.लक्षुमनराव इंगोले(आरधापूर), यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव लंगडे,विजयाताई घिसेवाड,किशोर पाटील लघळूदकर,शंकर मुतकलवाड,किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील कदम,पंचायत राज व ग्राम विकास आघाडी जिल्हा अध्यक्ष मनोज कमठे, जिल्हा सचिव डॉ.बंडेवार,सौ केतकी चौधरी, राजाभाऊ राजेवार,विठ्ठल पाटील पवार,ओबोसी जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ चटले वार,ओबोसी जिल्हा महामंत्री श्रीहरी बैनवाड, जिल्हा सचिव व्यॅकटी रेग्युलवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुदखेड शहराध्यक्ष संजय उर्फ पप्पू सोनटक्के यांच्या सह ता.महामंत्री पुरुषोत्तम चांडक, सुदाम पाटील खानसोळे,ता.सचिव निळकंठ हामंद,विश्वनाथ पवार,शहर महामंत्री कानोबा बिसमिले,ता. अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष हमीद भाई,ता. युवा मोर्चा अध्यक्ष सतीश पाटील मुंगल,ता. पंचायत राज व ग्रामीण विकास अध्यक्ष प्रभाकर पांचाळ,ता.ओबीसी मोर्चा अध्यक्ष गुलाब सूर्यवंशी,ता.अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष मोहन पाटील कांजाळकर,

ता.अध्यक्ष जेष्ठ नागरिक आघाडी शिवाजी पाटील शिंदे,ता.संस्कृतीक आघाडी अध्यक्ष गोपीचंद हामंद,ता. व्यापारी आघाडी अध्यक्ष प्रवीण काचावार,ता. आयुष्यमान भारत अभियान आघाडी अध्यक्ष प्रल्हाद मस्के, ता.युवा मोर्चा उपाध्यक्ष संभाजी हामंद,ता.युवा मोर्चा महामंत्री ज्ञानेश्वर पाटील भांगे, शहर कोषाध्यक्ष सुभाष यरपलवाड,गोविंद राठोड,उपाध्यक्ष मनोज कांबळे,गोविंद गुड्डमवार, योगेश हळदे ओबोसी शहराध्यक्ष शिवाजी बाचेवाड, युमो शहराध्यक्ष गजानन कमळे यांनी विशेष परिश्रम घेतले.तर या कार्यक्रमात भोकर विधानसभा मतदार संघातील १०० सुपर वॉरियर्सनी उत्सफुर्त प्रतिसाद देऊन सहभाग नोंदविला आहे

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मुदखेड भाजपाची आदरांजली

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी

दि.६ रोेजी येथील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागी असलेल्या नाम फकला वरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्रास पुष्प व पुष्प माल्या अर्पण करून समुदाईक त्रिसरण पंचशील ग्रहण केले व दोन मिनिटांची मौनांजली अर्पण केली.

या वेळी भाजपा नांदेड उत्तरचे जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष शंकर मुतकलवाड,ता.अध्यक्ष बालाजी पाटील खटिंग, जिल्हा चिटणीस भगवान पानेवार,सौ.केतकी चौधरी,पंचायत राज व ग्राम विकास आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज कमठे,माजी नगरसेवक बाबू गोपनपल्ले,ता. महामंत्री पुरुषोत्तम चांडक,ओबीसी जिल्हा सरचिटणीस श्रीहरी बैनवाड,उपाध्यक्ष संजय चव्हाण,शिवसेना शहर प्रमुख सचिन पाटील माने,शंकर पाटील पवार अल्प संख्यान्क आघाडी ता.अध्यक्ष हमीदभाई भंगारवाले,म. कबीर गुलाम दस्तगीर,व्यापारी आघाडी ता.अध्यक्ष प्रवीण काचावार,माजी सैनिक आघाडी ता. अध्यक्ष बालाजी गव्हाणे, युमो ता. अध्यक्ष सतीश पाटील मुंगल,निळकंठ हामंद, शहर महामंत्री कानोबा बिषमिले, युमो शहर अध्यक्ष गजू कमळे, मोहन जाधव, वामन गुंठे,शहर उपाध्यक्ष मनोज कांबळे,शेटीबा शिंदे,सतीश शेम्बोले,यांच्या सह असंख्य कार्यकर्ते या आदरांजली सभेत सहभागी झाले होते.या वेळी जबतक सुरज चाँद रहेगा,बाबासाहेब तुम्हारा नाम रहेगा!अमर रहे!अमर रहे!डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे च्या घोषणानी संपूर्ण परिसर अगदी दुम दुमून गेला होता.

भाजपा च्या मुदखेड तालुका कार्यकारिणीचा विस्तार,पंचवीस प्रमुखांच्या नावाची घोषणा

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि.२ रोजी येथील भारतीय जनता पार्टीचे ता.अध्यक्ष बालाजी पाटील खटिंग यांनी काही दिवसांपूर्वी चौरेचाळीस पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली होती,त्यास जोडून अजून एकदा कार्यकारिणीचा विस्तार केला आहे.

नवीन पंचवीस प्रकोस्ट प्रमुखांच्या नावांची घोषणा समाज माध्यमातून जाहीर केली आहे.या मध्ये भाजपा कामगार आघाडी संयोजक (अध्यक्ष), माधव सयाजी पांचाळ (बारड ), उद्योग आघाडी संयोजक(अध्यक्ष) बालाजी रघुनाथ तेलंगे (गोपाळवाडी), व्यापार आघाडी संयोजक (अध्यक्ष)प्रवीण श्रीराम काचावार (मुदखेड),भटके व विमुक्त आघाडी संयोजक (अध्यक्ष) राधाकिशन मारुती पुरी ( डोंगरगाव), सोशल मीडिया प्रकोस्ट संयोजक (अध्यक्ष) गणपतराव व्यंकटराव पाटील कल्याने(मुगट),माहिती व तंत्रज्ञान आघाडी (IT शेल )संयोजक(अध्यक्ष) बालाजी गोविंदराव पवार (पिंपळकोठा मगरे), आध्यात्मिक आघाडी संयोजक (अध्यक्ष)मोहनराव धोंडीबा पाटील कांजाळकर (वासरी), आयुष्यमान भारत अभियान प्रकोस्ट संयोजक (अध्यक्ष)प्रल्हाद लक्ष्मणराव मस्के (डोनगाव), पंचायत राज व ग्रामीण विकास आघाडी संयोजक (अध्यक्ष)प्रभाकर गोपीनाथराव पांचाळ (मुदखेड), बेटी बचाव बेटी पढाव आघाडी संयोजक (अध्यक्ष) साहेबराव रामा गागलवाड (महाटी), राजस्थान प्रकोष्ट संयोजक (अध्यक्ष)राजेंद्र सिंह अमृतसिंह राजपुरोहित (मुदखेड), माजी सैनिक आघाडी संयोजक (अध्यक्ष) बालाजी गंगाराम गव्हाणे (दरेगाव वाडी), पदवीधर आघाडी संयोजक (अध्यक्ष)भावेश्वर रमेश मुंगल (ईजळी), क्रीडा आघाडी संयोजक(अध्यक्ष)आनंद नारायण कांबळे (बारड), जैन आघाडी संयोजक(अध्यक्ष)सोमे श सुधाकर मांगुळकर (मुदखेड), सांस्कृतिक आघाडी संयोजक (अध्यक्ष)गोपीचंद गोविंदराव हेमके (डोणगाव), ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ता प्रकोष्ट संयोजक (अध्यक्ष)शिवाजीराव संभाजीराव शिंदे,माजी सरपंच (रोही पिंपळगाव), दिव्यांग आघाडी संयोजक (अध्यक्ष)दत्ता महाजी खाणसोळे (वाडी नियमतुलापुर), बुद्धिजीवी आघाडी प्रकोष्ट संयोजक (अध्यक्ष)तुषार विश्वासराव देशमुख (मुदखेड), शिक्षक आघाडी संयोजक(अध्यक्ष) विश्वनाथ रामचंद्र चंदलवाड (मेंडका), वैद्यकीय आघाडी संयोजक (अध्यक्ष) डॉक्टर कृष्णा शिवाजीराव पवार (मुदखेड), विधी व कायदा आघाडी संयोजक (अध्यक्ष) ऍड.कल्याण दत्तात्रय हामंद (डोणगाव), सहकार आघाडी संयोजक (अध्यक्ष) बाबुराव बापूसाहेब देशमुख (चिकाळा), ट्रान्सपोर्ट प्रकोष्ट संयोजक(अध्यक्ष), साईनाथ गंगाधर गिरी (मुदखेड), मच्छीमार प्रकोष्ट  संयोजक (अध्यक्ष) मारुती शंकरराव गोणेवाड (माळकौठा) अस्या विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.



 या निवडीमुळे मुदखेड तालुक्यातील कार्यकर्त्यात नवचैतन्य पसरले असून मुदखेड तालुक्यातील बावण गावे व एक नगरपालिका क्षेत्रात भारतीय जनता पार्टीच्या पस्तीस अध्यक्षांची टीम होऊ घातलेल्या निवडणुकीच्या राजकीय एखाड्यात उतरणार असल्याचे दिसून येत आहे.

या नव निर्वाचित प्रमुखांच्या निवडीचे स्वागत भाजपा नांदेड उत्तर जिल्ह्याचे महामंत्री प्रवीण गायकवाड, सुहास पाटील डोंगरगावकर,जिल्हा सचिव भगवान पानेवार,तुळशीराम चुकेवाड,ता.महामंत्री पुरुषोत्तम चांडक,सुदाम पाटील खानसोळे,शहराध्यक्ष संजय सोनटक्के,गोविंद उर्फ कानोबा बिसमिले, युमो ता.अध्यक्ष सतीश पाटील मुंगल, ओबीसी आघाडी ता. अध्यक्ष गुलाब पाटील सूर्यवंशी, युमो शहराध्यक्ष गजानन कमळे आदींनी स्वागत केले आहे.

लोकप्रिय बातम्या