मुगटला ताप व हृदय विकाराच्या झटक्याने अनेकांनी गमावला जीव

  •  गावात तापीच्या रुग्णात मोठ्या संख्येने दिवसेनदिवस वाढ. 
  • गावातील लोकांची आरोग्य तपासणी करण्याची गरज.


मुगट / वार्ताहार

 मुदखेड तालुक्यातील मुगट येथे गेल्या काही दिवसापासून गावात मोठ्या प्रमाणात ताप, सर्दी, जुलाब, खोकला यांच्या रुग्णांची संख्या गावात दिवसेंदिवस चांगलीच वाढत आहे. गावातील प्रत्येक दोन घराच्या नंतर एका घरातील व्यक्ती या तापीने बीमार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावात सध्या तापीची साथ वाढत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे गावातील लोक शासकीय दवाखान्यात न जाता खाजगी दवाखान्यात दाखवून तापीवर तात्पुरता इलाज केला जात आहे.

 गावातील खाजगी दवाखान्यात रुग्ण धाव घेत आहेत. ताप, सर्दी, खोकला, जुलाब मुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात खाजगी दवाखान्यात गर्दी, गैरसोय व आर्थिक पिळवणूक केली जात आहे. तरी सुद्धा रुग्ण बरे होत नाही.

 कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण शासकीय दवाखान्यात न जाता गावातच खाजगी दवाखान्यात उपचार करत आहेत. ताप ही लोकांची कायमस्वरूपी कमी होत नसल्यामुळे त्यांना या तापीमुळे जीव गमवावा लागत आहे. गावात तापआलेल्या व्यक्ती सुद्धा आपल्याला कोरोना झाला या भीतीमुळे अनेकांना हृदयविकाराच्या झटका येऊन जीव गमावला आहे. 

गावात गेल्या २०दिवसात १०ते १५ लोकांचा मृत्यू ताप व हृदय विकाराच्या झटक्याने झाला आहे. गावात एवढे लोक मृत्युमुखी पडले आहेत व मृत्यू आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागच्या वर्षी कोरोना काळात गावातील लोकांच्या घरोघरी जाऊन आरोग्या तपासणी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सहकार्याने आरोग्य विभागाने केली होती . आता सुध्दा गावातील लोकांच्या हीता साठी,आरोग्यासाठी अशाच घरोघर  तपासणी करण्याची अत्यावश्यक गरज आहे. यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेवून  गावातील अनेक लोकांची कोरोना  चाचणी घेतली तर नक्कीच गावात कोरोनाचे रुग्ण निघण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामपंचायत कडून गावात सेनिटायझर फवारणी तसेच गावकऱ्यांना ताप, सर्दी, जुलाब, खोकला झाल्यास शासकीय दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याचे व कोरोणा चाचणी करण्याचे आवाहन डॉ.संजय कासराळीकर ,ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे यांनी केले आले. 

गावातील लोकांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाने या कडे तात्काळ लक्ष दिलेतर गावातील लोकांचे जीव जाण्यापासून वाचू शकतात.त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे.




ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यावर भर - पालकमंत्री अशोक चव्हाण

 

▪️नवीन जम्बो कोविड केअर सेंटरला आज पासून प्रारंभ
▪️ऑक्सीजनसह इतर यंत्रणेची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

  संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

 दि.१९रोजी नांदेड  जिल्ह्यातील कोविड बाधितांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने जेवढ्या शक्य होतील त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ करीत आहोत. सोळा तालुक्यासह आपल्या जिल्ह्याचा विस्तार मोठया प्रमाणात असला तरी प्रत्येक तालुका पातळीवरील आणि ग्रामीण भागात जिल्ह्यातील बाधितांना आरोग्याच्या सुविधा सुलभ मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाला तत्पर राहण्याला सांगितले असून आजच्या घडीला ऑक्सीजनच्या बाबतीत कोणतीही कमतरता नसल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.


 नांदेड महानगरातील आणि जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधिताची संख्या लक्षात घेवून भक्ती लॉन्स येथे आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देवून जम्बो कोविड सेंटरचे उदघाटन व पाहणी केली.  यावेळी त्यांच्यासमवेत विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती मोहीनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन आदी उपस्थित होते.

 


नांदेड जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील बाधितांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.  प्रत्येक तालुका पातळीवरील कोविड केअर सेंटरसह मालेगाव, अर्धापूर सारख्या गावातील ट्रामा केअर सेंटर येथे कोविड बाधितांसाठी उपचार केंद्र सुरु करीत आम्ही  ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि परिपूर्ण करु असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.  जिल्ह्यातील रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणात असून याचा तुटवडा आहे हे नाकारता येत नाही. राज्यात सर्वत्रच याचा तुटवडा असून शासनातर्फे वितरक आणि उत्पादक यांच्याशी समन्वय साधला जात आहे. जिथे आवश्यकता वाटते आहे त्याठिकाणी कायदेशिर कार्यवाही करुन मार्ग काढीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

 कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वेळेवर जी काही माहिती असेल ती मिळणे आवश्यक असून यासंदर्भात प्रत्येक कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल येथे माहिती केंद्र सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केल्या. या नवीन कोविड केंद्रातील ऑक्सीजन यंत्रणा आणि इतर साहित्य चांगल्या स्थितीत सुरु आहे की नाही यांची खातरजमा त्यांनी स्वत: करुन घेतली. या दोनशे खाटांच्या भव्य कोविड हेल्थ सेंटर येथे सर्व बेड ऑक्सीजन यंत्रणेसह असून आवश्यक तो सर्व स्टाफ ही महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन दिला आहे. सद्यस्थितीत ११२ जणांचा स्टाफ असून तो चार शिफ्टमध्ये कार्यरत राहणार आहे. तसेच चोवीस डॉक्टराचे पथक या जम्बो सेंटरमधील रुग्णांच्या उपचाराचे व्यवस्थापन करेल.  रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधता यावा यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.




कोरोना आजाराचे रेमडेसीवर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवा व साठेबाजांवर कारवाई करा - वसंत सुगावे पाटील

   निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली मागणी.

   संपादक आशिष मुगटकर


 नांदेड / जिल्हा प्रतिनिधी

       नांदेड जिल्ह्यात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा हाहाकार झाला असून यामध्ये जिल्ह्यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर इंजेक्शन अत्यावश्यक असून ते इंजेक्शन बाजारात उपलब्ध नाही असे दाखवून दुकानदार चढ्या भावाने या इंजेक्शनची विक्री करत आहेत. त्यामुळे अशा साठेबाजांवर कारवाई  करून रेमडेसीवर इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करून द्यावे.

 अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे कडे केली आहे.

      नांदेड जिल्ह्यात दिवसाला १००० ते १५०० रुग्णांना कोरोनाची लागण होत आहे. अनेक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आशा रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसीवर इंजेक्शन आवश्यक आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी वाढत आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन दुकानदार अन्न व औषध प्रशासन या विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या इंजेक्शनचा काळा बाजार करत आहेत. यावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही.हे इंजेक्शन वेळेवर मिळाले नसल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 आज अनेक रुग्ण गंभीर असून या रेमडेसीवर इंजेक्शन रुग्णांना सहजरीत्या व माफक दरात उपलब्ध होईल अशी व्यवस्था प्रशासनामार्फत करावी अशीही मागणी करण्यात आली.

  यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसचिव बाळासाहेब भोसीकर, राष्ट्रवादी ग्रंथालय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर, राष्ट्रवादी सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष शादूल होणवडजकार,हणमंत जगदंबे आदी उपस्थित होते.




नागेलिकरांचा विजय हा जनशक्तीचा नव्हे तर धन शक्तीचा आहे- नेते प्रवीण गायकवाड

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

दि.४रोजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच हाती आले असून कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलिकर यांनी जवळचे प्रतिस्पर्धी गांधीजी पवार यांच्या पेक्षा केवळ एका मताने निसटता विजय मिळविला आहे.

या बाबत भाजपा मराठवाडा प्रभारी तथा बॅक निवडणुकीत सहकार विकास पॅनलचे गांधीजी पवार यांच्या संपुर्ण निवडणूकीची कार्य कुशल धुरा सांभाळनारे नेते प्रवीण गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

ते म्हणाले की,"अ"मुदखेड प्राथमिक कृषि पथ पुरवठा सेवा सहकारी संस्था  मतदार संघाची निवडणूक ही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून गनल्या गेली कारण नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उभे होते.त्यांचा पराभव म्हणजे ना.अशोक चव्हाण यांचा पराभव असे चित्र निर्माण करण्यात आले.याचा परिणाम असा झाला की,भाजपाच्या कुशल गनिमी काव्याची चाहुल ना.चव्हाण यांना लागली की,नागेलिकरांचा पराभव निश्चित आहे.या पराभवातून सुटका मिळवीन्यासाठी साम-दाम-दंड-भेद या नितीचा अवलंब करा पण पराभव टाळा असे फरमान ना.अशोक चव्हाण यांनी काढले.

त्याची परिनिती मुदखेड येथिल एका मंगल कार्यालयात सर्व मतदारांना बोलाऊन स्नेह भोजनासह पहिले लक्ष्मी दर्शन घडविले,सदरचे दर्शन तोकडे पडले असा सुर मतदारांनी आवळला.यामुळे अजुन कॉंग्रेसी गोंधळले आणि लगेच प्रत्येक मतदारा समवेत एक जामिनदार ठेऊन पुन्हा एकदा मुदखेड शहरातील दागिन्याच्या दुकानदाराच्या घरी लक्ष्मी दर्शनाचा योग घडऊन आणला.या वेळी जमानत दारापुढे जाहिर करुन दर्शन घडविले असा सुर मतदारांनी आवळला.ही बातमी कळते न कळते चक्क ना.चव्हाण यांना थेट निवडनुक रिंगनात उतरावे लागले थेट लक्ष्मी नगर कारखान्यावर तिसऱ्या लक्ष्मी दर्शनाचा बेत आखल्या गेला आणि येथे महा प्रसादासह तिसऱ्यांदा थेट मतदार निहाय्य एकट्यात लक्ष्मी दर्शन घडविले.महा प्रसादावरही मतदार मौन वृत्त सोडायला तयार नव्हता तेव्हा अखेर चौथ्यांदा मंगल कार्यालयात तिर्थ प्रसादाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी नांदेड येथून कपाळी बट्टू आणि खांद्यावर दस्ती टाकून एक प्रभारी पाठऊन लक्ष्मी दर्शनाची शिग काढण्यात आली.येवढा सगळा अट्टा-पिटा करुन देखील अखेर मतदार निहाय्य ना.चव्हाण यांना भ्रमणध्वनीवर एका- एका मतदारास अळवनी घालावी लागली.

एक सामान्य नागरिक  असणाऱ्या पण कॉंग्रेस सोबत दोन हात करण्याची हिम्मत  बाळगणाऱ्या गांधीजी पवार यांच्या मागे मतदार खंबीर पणे उभा राहिला त्याचा परिणाम कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि ना.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उमेदवाराचा केवळ एका मताने निसटता विजय झाला.

हा गांधीजी पवार यांचा निसटत्या जनशक्तीचा पराभव नाही तर  नागेलिकराच्या रुपाने ना.अशोक चव्हाण यांच्या कॉंग्रेशी धन शक्तीचा केवळ एक मताचा विजय आहे.अशी प्रतिक्रीया मातृभूमी न्युजशी  नेते प्रवीण गायकवाड यांनी बोलताना व्यक्त  केली.






लोकप्रिय बातम्या