निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली मागणी.
नांदेड / जिल्हा प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा हाहाकार झाला असून यामध्ये जिल्ह्यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर इंजेक्शन अत्यावश्यक असून ते इंजेक्शन बाजारात उपलब्ध नाही असे दाखवून दुकानदार चढ्या भावाने या इंजेक्शनची विक्री करत आहेत. त्यामुळे अशा साठेबाजांवर कारवाई करून रेमडेसीवर इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करून द्यावे.
अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे कडे केली आहे.
नांदेड जिल्ह्यात दिवसाला १००० ते १५०० रुग्णांना कोरोनाची लागण होत आहे. अनेक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आशा रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसीवर इंजेक्शन आवश्यक आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी वाढत आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन दुकानदार अन्न व औषध प्रशासन या विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या इंजेक्शनचा काळा बाजार करत आहेत. यावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही.हे इंजेक्शन वेळेवर मिळाले नसल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज अनेक रुग्ण गंभीर असून या रेमडेसीवर इंजेक्शन रुग्णांना सहजरीत्या व माफक दरात उपलब्ध होईल अशी व्यवस्था प्रशासनामार्फत करावी अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसचिव बाळासाहेब भोसीकर, राष्ट्रवादी ग्रंथालय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर, राष्ट्रवादी सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष शादूल होणवडजकार,हणमंत जगदंबे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा