मुगट येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू;तीन महिला जखमी

 संपादक आशिष मुगटकर

मुगट/वार्ताहर

मुदखेड तालुक्यातील मुगट येथे दि९ रोजी सकाळी ९:३० ते१० च्या दरम्यान अवकाळी पाऊस विजेच्या कडकडाटासह पडला  मुगट शिवारातील मुगट रेल्वे स्टेशन जवळ एका शेतात ही वीज पडली. रेल्वे स्टेशन जवळील शेतात लक्ष्मी वर्षेवार व इतर तीन महिलांसोबत आपल्याच शेतात ज्वारी खुडण्याचे काम करत होत्या. अचानक आलेल्या पावसामुळे व विजेच्या कडकडाटा मुळे लक्ष्मी व इतर सोबतच्या तीनही महिला लिंबाच्या झाडाखाली थांबल्या होत्या त्यातील सौ. लक्ष्मी बालाजी वर्षेवार (अंदाजे वय२५) या महिलेच्या अंगावर वीज पडली व त्या जागीच मृत्यू पडल्या.

 त्यांच्या सोबत असणाऱ्या तीन महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्या असून या सर्वांना मुदखेड येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. त्या ठिकाणी नेल्यावर लक्ष्मी वर्षेवार यांना मृत घोषित करण्यात आले असून सोबतच्या तिनी महिलांना नांदेड येथील दवाखान्यात हलविण्यात आलेले आहे.

 जखमी महिला. मध्ये इंदुबाई लोखंडे, रेणुका वर्षेवार, अर्चना मेटकर यांचा समावेश आहे. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या