गोविंदराव नागेलीकर यांनी घेतली मृत महिलेच्या परिवाराची भेट.

संपादक आशिष मुगटकर


मुगट /प्रतिनिधी

दि. १० रोजी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी मुगट येथील वीज पडून मृत्यू पावलेल्या लक्ष्मी बालाजी वर्षेवार यांच्या परिवाराला भेट देऊन सांत्वन केले. या घटनेत जखमी झालेल्या ३ महिलांची सुद्धा त्यांनी विचारपूस केली व त्यांच्या परिवाराला धीर दिला. यावेळी शासनाकडून मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.


यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्रतिनिधी तथा संचालक भिमराव पा कल्याणे,माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिनिधी विलास हाटकर, माजी सभापती प्रतिनिधी शत्रुघ्न गंड्रस, माजी उपसरपंच रमेश पा.कल्याणे, चेअरमन माधवराव पा कल्याणे, उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या