शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करा.

  शिवा संघटना मुदखेड यांची तहसिलदाराकडे निवेदनाद्वारे मागणी.

संपादक आशिष मुगटकर


बारड / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये व निमशासकीय कार्यालयांमध्ये शासनाच्या जीआर नुसार सर्व ठिकाणी क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करा याबाबत सक्तीचे  तहसील प्रशासनाने आदेश देण्या संदर्भात शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश कांचनगिरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दीनेश झांपले यांच्या कडे लेखीनिवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .

क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी जगातील पहिली संसदीय लोकशाही निर्माण करण्याचे कार्य केले असुन वयाच्या ३६वर्षी आयुष्यात सामाजिक समतेचे प्रचंड काम केले या महामानवाची  ८९० वी जयंती अक्षय तृतीयाच्या दिवशी  सर्वत्र साजरी करण्यात येते मुदखेड तालुक्यातील  सर्व शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत शासकिय, निमशासकीय,कार्यालय कोरोना नियमावलीचे पालन करत जयंती साजरी करण्याचे आदेश तहसिल प्रशासनाने द्यावेत अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी निवेदनावर शिवा संघटना तालुका अध्यक्ष प्रकाश कांचनगिरे,कृ. उ. बा. स. संचालक सुरेश शेटे, शिवकुमार देशमुख,विलास कापसे,सचिन चंद्रे,सुधाकर कराळे, नारायण नरडेले,सदाशिव तांडे, राजेश महाशेठे,चंद्रकांत राजेवार,प्रल्हाद गोरगे,मन्मथ राजेवार, बाळू चुंचे,प्रकाश देवठाणकर,बाळू चंद्रे,आशोक नरडेले आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या