मुगट गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणारे सक्शन पंप उध्वस्त करून नष्ट.
मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
दि. १३ रोजी सकाळी नायब तहसिलदार महसूल १ मुगाजी काकडे व नायब तहसीलदार संजय नागमवाड यांना मौजे मुगट येथे गोदावरी नदी पात्रात अवैध रित्या वाळु उपसा करणारे सक्शन मशीन ( वाळू उपसा करणारी बोट) चालू असून काल रात्री पासून उपसा चालू असल्याचे समजले.
सदरील महिती त्यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली असता त्यांनी सदर बोट नष्ट करण्याचे आदेश दिले .
तदनंतर नांदेड तहसिल चे पथक व मुदखेड तहसील चे पथक जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी श्री लतीफ पठाण , व उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे तहसीलदार किरण अंबेकर ,व तहसीलदार दिनेश झांपले नायब तहसिलदार मुगाजी काकडे व नायब तहसीलदार संजय नागमवाड यांच्या नेतृत्वाखाली नांदेड व मुदखेड तहसिल चे पथक मौजे मुगट येथील गोदावरी नदीच्या पात्रात सकाळी १० वाजता पोहोचले या ठिकाणी त्यांनी परवाना धारक जिलेटीन वापर करणाऱ्या व्यक्तीस बोलावून घेऊन स्फोट करवून बोट आहे त्या ठिकाणीच नष्ट करण्यात आली आहे.
सदर कारवाई पूर्णत्वास नेण्याकरिता मंडळ अधिकारी , खुशाल घुगे, चंद्रशेखर सहारे, बालाजी कुऱ्हाडे तलाठी ईश्वर मंडगीलवार , आकाश कांबळे,राहुल चव्हाण,संजय खेडकर प्रवीण होंडे, विकास गलांडे , तलाठी अपर्णा देशपांडे कोतवाल भांगे यानी सहभाग घेतला
महसूल प्रशासन जरी कोव्हीड च्या कामात व्यस्त असले तरी अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर फोजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार श्री किरण अंबेकर व श्री दिनेश झांपले यांनी कळविले आहे..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा