मुगट जिल्हा परिषद शाळेत शंकरराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनिधी 
 दि.२८रोजी मुगट येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री खासदार माननीय अशोकराव चव्हाण ,मा.आमदार अमिताभाभी चव्हाण व युवा आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय डॉ.शंकररावजी चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाकाळाच्या नंतर पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाला या वर्षी पासून सुरूवात करण्यात आली. हे वाटप भोकरमतदार संघातील तीन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत सुरू आहे.

शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले. 


या प्रसंगी मुदखेड भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष, दत्तराव देशमुख, मा.जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील कल्याणे,मा. जिल्हा परिषद सदस्य विलास हाटकर, मुगट ग्रामपंचायतचे सरपंच धोंडीबा वंजे, संचालक माधवराव पाटील कल्याणे, सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन माधवराव पाटील कल्याणे, मुगट ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील मुंगल, तुकाराम हाटकर, देवदत्त हाटकर , बालाजी मुंगल, राजू पाटील मुंगल, राजू गणेशराव कल्याणे, दिगंबरराव कदम, शिवानंद पाटील कल्याणे, साईनाथ पांचाळ, कृष्णा कल्याणे, अवधूत पाटील उपासे, दिगंबरराव कल्याणे वासरीकर, पत्रकार आशिष पाटील कल्याणे ,शाळेतील शिक्षक वृंद आदी मंडळी उपस्थित होती.

धनज - सरेगाव ते बारड मानव विकासची बस सुरू करा.युवा सामाजिक कार्यकर्ते चक्रधर कळणे

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

मुदखेड तालुक्यातील धनज, सरेगाव येथील ५९ते ६० शालेय विद्यार्थ्यांनीना शिक्षणासाठी बारडला  दररोज जावे लागते. त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज जान्या येण्यासाठी शासनाने मानव विकासची बस सेवा सुरू करण्यात यावी.अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे युवा सामाजिक कार्यकर्ते चक्रधर कळणे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

धनज,सरेगाव या गावातील शालेय विद्यार्थीनीना शिक्षणासाठी बारडला दररोज यावे जावे लागत आहे. या ठिकाणी बसची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणीवर मात करत शिक्षण घ्यावे लागत आहे.  या गावांसाठी मानव विकासची बस सुरू करण्यात यावी अशी मागणीसाठी ग्रामस्थांनी लेखी ठराव दिला तर आहे. बारड येथून मानव विकास ची बस जवळ-मुरारपर्यंत येते तीच बस पुढे सरेगाव, धनज पर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे. बस अभावी शालेय विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षणासाठी त्यांना चांगलीच पायपीट  करावी लागत आहे.

धनज , सरेगाव येथील शालेय विद्यार्थीनीच्या शिक्षणासाठी होणारी गैरसोय थांबवावी व मानव विकासची बस शालेय विद्यार्थ्यांनसाठी सुरु करण्याची मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे युवा सामाजिक कार्यकर्ते चक्रधर कळणे यांनी केली आहे.त्यांच्या या मागणीला दोन्ही गावकऱ्यांनी पंचायतचा ठराव देवुन संमती दर्शवली आहे.




अखेर उंचेगांव (बु) ते इरापुर हा रस्ता अतिक्रमण मुक्त

 संपादक आशिष मुगटकर

हदगाव तालुका प्रतिनीधी 

हदगाव तालुक्यातील उंचेगांव(बु) येथील उंचेगांव(बु) ते इरापुर हा पांदन रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षा पासुन रखडलेला या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले होते.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बैलगाडी वाहतुकीसाठी अडचण येत होती. त्यामुळे गावातील काही शेतकऱ्यांनी हदगाव तहसील यांच्या कडे पाठपुरावा केला.त्यामुळे उंचेगांव बु ते इरापुर रस्ता आता अतिक्रमण मुक्त करण्यात आला आहे. हदगांव तालुक्यातील हा रस्ता बऱ्याच दिवसा पासून अतिक्रमित असल्यामुळे शेतकरी वर्गाची अडचण लक्षात घेता हदगांव तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांच्या सहकार्याने खुला करण्यात आला.


 या वेळी  तळणी मंडल अधिकारी स्वाती मॅडम उचेगाव बु चे तलाठी आडे तसच निवघा पोलिस स्टेशन चे पुलीस कर्मी गायकवाड उंचेगांव बु चे . मा सरपंच मा ह देशमुख देवराव देशमुख राजेश्वर देशमुख उपसरपंच पोलीस पाटील आकाश देशमुख मा पोपा रगंराव देशमुख व मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थीत होता . 



नांदेड येथे शिक्षक समन्वय संघाची सहविचार सभा संपन्न

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

दिः १५ जून रविवार रोजी रॉयल ॲकॅडमी, राजर्षी शाहू विद्यालय बाजूस वसंतनगर नांदेड येथे शिक्षक समन्वय संघांने दिः १८ जून २०२५ बुधवार पासुन आझाद मैदान मुंबई येथे 'हुंकार- महाएल्गार'आंदोलन पुकारले असुन त्या संदर्भात मैदानावरील संख्या कशी वाढेल याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली यात संस्थाचालक संघटनेशी संपर्क साधून त्यांना मैदानावर येण्यासाठी प्रयत्न करावेत, प्रत्येकाने आपल्या जवळील शाळा भेटी देऊन शिक्षकांना मैदानावर यावे ही माहिती देणे,प्रत्येक शाळेतील शिक्षक एक ते दोन त्यापेक्षा ज्यास्त शिक्षक आंदोलनात सहभागी होणे गरजेचे आहे.

१८ जून पासून तीव्र आंदोलनाची आवश्यकता, प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी मैदानावर येणाऱ्या शिक्षकांना आर्थिक मदत करावी, समन्वय संघांचे उद्दिष्ट पदापेक्षा टप्पावाढ हेच राहिल,आंदोलनास जाण्याचे नियोजन करून लवकर रिजर्वेशन करून घ्यावे, या विषयावर चर्चा झाली.

 यावेळी मराठवाडा शिक्षक संघटनेने ही आम्ही समन्वय संघाच्या आंदोलन सहभागी होणार असल्याचे सांगितले या प्रसंगी कैलास खानसोळे, संजय घोरबांड, नालंदे बी आर, गोविंद वाघमारे, प्रमोद बेळकोने, दत्ता शिधापूरे, पवार एस एम, शिवाजी बोकारे,देव एस एस,वाठोरे एस एम,केंद्रे ए डी,खान एम ए,अहमद जाकीर एन,कदम एन एम,सुरनर आर जी,कपाळे एम डी,वरवंटे एच बी,पवार एम जे,पवार व्ही पी,मुजावर एस के,देवकते पी एच,झुंबाडे एस बी,फाजगे एस व्ही,चिरवरवार सर,मोरे सर,वाघमारे आर पी,चाभरेकर सर,सूर्यवंशी एस एम,रेड्डी एन व्ही,कोरे एस व्ही,शिंदे जी टी यासह असंख्य शिक्षक उपस्थित होते .

शिक्षकांनी आपल्याला हक्काचा १४ आक्टो २०२४ च्या शासनिर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान मिळायचे असेल तर 'एकट चला हे स्वार्थी धोरण' मोडीत काढून एक संघ राहून शिक्षक समन्वय संघाची ताकद वाढवण्याची गरज आहे यासाठी ज्यास्तीत ज्यास्त संख्येने ना नेता ना पुढारी माझी पगार माझी जबाबदारी समजून आझाद मैदानावर उपस्थित राहणार असे सांगतिले.



मुगट गोदावरी नदीतून अवैध वाळूचा उपसा बंद करून वाळू माफिया कारवाही करा ; सरदार गुलाबसिंघ पुरणसिंघ

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

मुगट गोदावरी नदीतून अवैध वाळूचा उपसा बंद करून वाळू माफिया कारवाही करा ; सरदार गुलाबसिंघ पुरणसिंघ मुगट वार्ताहार मुगट परिसरातील गोदावरी नदीच्या पात्रातून बोटिंग मशीनच्या साह्याने खुलेआमपणे अवैध मार्गाने होणारा वाळूचा उपसा व वाळू माफिया यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदन देऊन सरदार गुलाबसिंघ पुरणसिंघ यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे केली आहे. 

 मुदखेड तालुक्यातील मुगट परिसरातून  गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू माफिया कडून अवैध वाळू उपसा बोटिंग मशीनच्या साह्याने खुलेआम पणे केला जात आहे.त्यामुळे मातासाहब देवाजी गुरुद्वाराच्या मागच्या संरक्षण भिंतीला तडे पडत असुन ती पडण्याची शक्यता आहे. 

तालुक्यातील मुगट, ब्राह्मणवाडा, या भागात चार ते पाच बोटिंग मशीनच्या सहाय्याने वाळूचा उपसा दिवस रात्र केला जात आहे.मुदखेड महसूल कडून धातुरमातुर कारवाई केली जात आहे. 

मुगट परिसरात महसूल प्रशासनाची कारवाई १०ते १२ दिवसा पूर्वीच केली होती.पण त्यात केवळ तीन तराफे हाती लागले होते. कारवाई करुन १०/१२दिवस होताच पुन्हा वाळूचा उपसा वाळू माफिया कडून सुरू केला आहे या भागातुन दररोज १५ ते २० हायवा, टिप्परच्या साहाय्याने मुगट मार्गाने बारड, मुदखेडला,तर ब्राम्हवाडा मार्गने नांदेडहून दुसऱ्या जिल्हात पाठवली जात आहे.

मातासाहब देवाजी या ठिकाणी वाळूचा उपसा सुरू आहे.अशी अनेक वृत्त पत्रात सुध्दा बातमी प्रसिद्ध झाली होती.या ठिकाणच्या वाळू उपसामुळे मागील संरक्षण भिंतीला तडे पडत आहेत.असाच उपसा या ठिकाणी सुरू राहीला तर ती संरक्षणभिंत खचुन पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.संरक्षण भिंत पडलीतर गुरुद्वाराची मोठी नुकसान होऊ शकते. दि.२रोजी मी वाळू माफियांना सांगितले की या ठिकाणचा वाळूचा उपसा बंद करा पण त्यानेच मलाच उलट अरे रावीची भाषा वापरुन मलाच दमदाटी केली. 

मुदखेड तालुक्यातील अवैध मार्गाने होणारा गोदावरी नदीच्या पात्रातील अवैध वाळुचा उपसा तात्काळ थांबवून वाळुमाफियांवर कडक कारवाई करण्यात यावी. शासनाच्या धोरणा प्रमाणे घरकुलासाठी मुदखेड तालुक्यातील गोरगरिबांना वाळू उपलब्ध करून द्यावी. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना दिले आहे.

कामळज येथे शिवराज्यभिषेक दिन साजरा

संपादक आशिष मुगटकर

मुदखेड प्रतिनिधी/ कैलास पाटील 

दिः ६ जून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक , शककर्ते, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ रोजी  शिवस्वराज्यभिषेक करून रयतेचे राज्य निर्माण केले व एक आदर्श राज्यकर्ता म्हणून नावारूपास आले त्याच निमित्त आज कामळज ता मुदखेड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून पुजन तद्नंतर ग्रामपंचायत कार्यालयात  छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवराज्याभिषेक सोहळा गुढी उभारून साजरा केला.

उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा दिल्या. गावातील कु काजल खानसोळे, समीक्षा खानसोळे या विद्यार्थीनी 'गर्जा महाराष्ट्र माझा' महाराष्ट्र गीत गायले व राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

                  यावेळी सरपंच श्रीमती दिपाली मोहन खानसोळे उपसरपंच सदानंद पांचाळ,ग्रामविकास अधिकारी सतिश कदम, ग्रामपंचायत सदस्य दत्तराम खानसोळे, दिगंबर खानसोळे, रुस्तुम खानसोळे यांच्यासह गावातील भिमराव मुकदम, प्रा. कैलाश खानसोळे, संतोष (गुरुजी ) खानसोळे, चक्रधर खानसोळे, मारोती कपाटे, प्रभाकर खानसोळे, माधव खानसोळे, गजानन खानसोळे, निरंजन खानसोळे, ऋषिकेश खानसोळे यासह अनेक गावकरी उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला

ब्रह्माकुमारीज मुदखेड तर्फे जागतीक पर्यावरण दिन संपन्न

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि.५ रोजी मुदखेड शहरातील   ब्रह्माकुमारीज अध्यात्मीक उपसेवाकेंद्र तर्फे जागतीक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. 

ब्रह्माकुमारीज मुदखेड संचालिका ब्रह्माकुमारी पुजा दिदी यांनी वर्तमान काळानुसार पर्यावरण संरक्षणासाठी अती आवश्यक अशी माहिती दिली. पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे असे सांगत, वृक्ष लागवड करण्याचे ही आव्हान केले. तसेच ब्रह्माकुमारीज मुदखेड परिसरात पुजा दिदी यांच्या  मार्गदर्शनाखाली या ईश्वरीय परिवारातील 

भाई बहेन यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले.अश्या प्रकारे जागतीक पर्यावरणदिन उत्साहात साजरा केला .

या कार्यक्रमास विद्यालयातील परिवार, ज्येष्ठ पत्रकार मनोज कमटे, सेवा निवृत प्राचार्य राठोड, सेवा निवृत तहसीलदार बोद्दावार, सेवा निवृत शिक्षक बुचाले, राजाराम नुकुलवार, कुलुपवार, ढगे इत्यादींचा सहभाग होता.

लोकप्रिय बातम्या