मुदखेड तालुका प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील धनज, सरेगाव येथील ५९ते ६० शालेय विद्यार्थ्यांनीना शिक्षणासाठी बारडला दररोज जावे लागते. त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज जान्या येण्यासाठी शासनाने मानव विकासची बस सेवा सुरू करण्यात यावी.अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे युवा सामाजिक कार्यकर्ते चक्रधर कळणे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
धनज,सरेगाव या गावातील शालेय विद्यार्थीनीना शिक्षणासाठी बारडला दररोज यावे जावे लागत आहे. या ठिकाणी बसची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणीवर मात करत शिक्षण घ्यावे लागत आहे. या गावांसाठी मानव विकासची बस सुरू करण्यात यावी अशी मागणीसाठी ग्रामस्थांनी लेखी ठराव दिला तर आहे. बारड येथून मानव विकास ची बस जवळ-मुरारपर्यंत येते तीच बस पुढे सरेगाव, धनज पर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे. बस अभावी शालेय विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षणासाठी त्यांना चांगलीच पायपीट करावी लागत आहे.
धनज , सरेगाव येथील शालेय विद्यार्थीनीच्या शिक्षणासाठी होणारी गैरसोय थांबवावी व मानव विकासची बस शालेय विद्यार्थ्यांनसाठी सुरु करण्याची मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे युवा सामाजिक कार्यकर्ते चक्रधर कळणे यांनी केली आहे.त्यांच्या या मागणीला दोन्ही गावकऱ्यांनी पंचायतचा ठराव देवुन संमती दर्शवली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा