हदगाव तालुका प्रतिनीधी
हदगाव तालुक्यातील उंचेगांव(बु) येथील उंचेगांव(बु) ते इरापुर हा पांदन रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षा पासुन रखडलेला या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले होते.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बैलगाडी वाहतुकीसाठी अडचण येत होती. त्यामुळे गावातील काही शेतकऱ्यांनी हदगाव तहसील यांच्या कडे पाठपुरावा केला.त्यामुळे उंचेगांव बु ते इरापुर रस्ता आता अतिक्रमण मुक्त करण्यात आला आहे. हदगांव तालुक्यातील हा रस्ता बऱ्याच दिवसा पासून अतिक्रमित असल्यामुळे शेतकरी वर्गाची अडचण लक्षात घेता हदगांव तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांच्या सहकार्याने खुला करण्यात आला.
या वेळी तळणी मंडल अधिकारी स्वाती मॅडम उचेगाव बु चे तलाठी आडे तसच निवघा पोलिस स्टेशन चे पुलीस कर्मी गायकवाड उंचेगांव बु चे . मा सरपंच मा ह देशमुख देवराव देशमुख राजेश्वर देशमुख उपसरपंच पोलीस पाटील आकाश देशमुख मा पोपा रगंराव देशमुख व मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थीत होता .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा