नांदेड जिल्हा प्रतिनिधी
दिः १५ जून रविवार रोजी रॉयल ॲकॅडमी, राजर्षी शाहू विद्यालय बाजूस वसंतनगर नांदेड येथे शिक्षक समन्वय संघांने दिः १८ जून २०२५ बुधवार पासुन आझाद मैदान मुंबई येथे 'हुंकार- महाएल्गार'आंदोलन पुकारले असुन त्या संदर्भात मैदानावरील संख्या कशी वाढेल याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली यात संस्थाचालक संघटनेशी संपर्क साधून त्यांना मैदानावर येण्यासाठी प्रयत्न करावेत, प्रत्येकाने आपल्या जवळील शाळा भेटी देऊन शिक्षकांना मैदानावर यावे ही माहिती देणे,प्रत्येक शाळेतील शिक्षक एक ते दोन त्यापेक्षा ज्यास्त शिक्षक आंदोलनात सहभागी होणे गरजेचे आहे.
१८ जून पासून तीव्र आंदोलनाची आवश्यकता, प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी मैदानावर येणाऱ्या शिक्षकांना आर्थिक मदत करावी, समन्वय संघांचे उद्दिष्ट पदापेक्षा टप्पावाढ हेच राहिल,आंदोलनास जाण्याचे नियोजन करून लवकर रिजर्वेशन करून घ्यावे, या विषयावर चर्चा झाली.
यावेळी मराठवाडा शिक्षक संघटनेने ही आम्ही समन्वय संघाच्या आंदोलन सहभागी होणार असल्याचे सांगितले या प्रसंगी कैलास खानसोळे, संजय घोरबांड, नालंदे बी आर, गोविंद वाघमारे, प्रमोद बेळकोने, दत्ता शिधापूरे, पवार एस एम, शिवाजी बोकारे,देव एस एस,वाठोरे एस एम,केंद्रे ए डी,खान एम ए,अहमद जाकीर एन,कदम एन एम,सुरनर आर जी,कपाळे एम डी,वरवंटे एच बी,पवार एम जे,पवार व्ही पी,मुजावर एस के,देवकते पी एच,झुंबाडे एस बी,फाजगे एस व्ही,चिरवरवार सर,मोरे सर,वाघमारे आर पी,चाभरेकर सर,सूर्यवंशी एस एम,रेड्डी एन व्ही,कोरे एस व्ही,शिंदे जी टी यासह असंख्य शिक्षक उपस्थित होते .
शिक्षकांनी आपल्याला हक्काचा १४ आक्टो २०२४ च्या शासनिर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान मिळायचे असेल तर 'एकट चला हे स्वार्थी धोरण' मोडीत काढून एक संघ राहून शिक्षक समन्वय संघाची ताकद वाढवण्याची गरज आहे यासाठी ज्यास्तीत ज्यास्त संख्येने ना नेता ना पुढारी माझी पगार माझी जबाबदारी समजून आझाद मैदानावर उपस्थित राहणार असे सांगतिले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा