मुगटच्या ग्रामसभेतूनच सरपंच, उपसरपंच प्रतिनिधी चे पलायन.

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि. १७ रोजी मुगट येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये  सरपंच कांताबाई वंजे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा ठेवण्यात आली होती. 

ग्रामसभेपूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ग्राम अभियान या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी  दाखवण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी भांडेकर हे उपस्थीत होते.

महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांनसाठी विविध उपक्रमांची माहिती तलाठी सौ. बार्शीकर यांनी दिली.

ग्रामसभेला शांतेत सुरुवात झाली होती.गावातील युवकांनी मागील ग्रामसभेत झालेल्या विविध खर्चाच्या मुद्यावर चर्चा करायला सुरुवात केली.नवीन आलेल्या ग्रामसेविका यांच्या कडे काहीच पुर्वीच्या ग्रामसभेची माहिती नसल्याने थेट उपस्थित सरपंच उपसरपंच व प्रतिनिधी यांना प्रश्न विचारली गेली. प्रश्नास उत्तर देण्यासाठी सरपंच, उपसरपंच याची बारी येताच तेव्हाच पुर्व नियोजित पणे काही युवकांनी ग्रामसभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

याच संधीचा फायदा घेत सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामसभेतून पलायन करुण  घर गाठले.

तरी मोठ्या संख्येने ग्रामस्थ त्याच ठिकाणी ठाण मांडून बसले होते.

नवीन आलेल्या ग्रामसेविका कोकरे यांनी आपला परिचय करून दिला. ग्रामस्थांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या व त्यांच्याशी संवाद साधला.  ग्रामपंचायत विषयी आपल्या लेखी तक्रारी देण्याचे आवाहन त्यांनी केले.

१५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ज्या ३७  मुद्द्यांचा समावेश केला होता ते मुद्दे १७ सप्टेंबरच्या ग्रामसभेत घेण्यात येणार होत पण त्यातील एकाही मुद्द्यावर या ग्रामसभेत चर्चा झाली नाही.

केवळ सरपंच, उपसरपंच यांच्या कडून वेळ काढू पणा करण्यात आला.

  दि.२ ऑक्टोबर२०२५ रोजी या ठिकाणी पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे व वरील ३७ मुद्दे यावर चर्चा करण्यात यावी अशी विनंती नवीन आलेल्या ग्रामसेविकेकडे गावातील युवकांनी  केली.

 यावेळी ग्रामसेविका सौ. कोकरे, चौगुले, बिट जमादार कवठेकर, कदम, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील सारंग मठपती, तंटामुक्ती अध्यक्ष,माजी सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. 

 [व्यवस्थित चाललेल्या ग्रामसभेमध्ये आपला नविन भ्रष्टाचार पुन्हा उघड होईल या भीतीपोटी जाणून बुजून सरपंच, उपसरपंच प्रतिनिधी यांनी ग्रामसभेमध्ये गोंधळ घालून त्या ठिकाणाहून पळून गेले.- संदिप शंकरराव कल्याणे ]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या