नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा १ ते ४ मे असे चार दिवस येलो अलर्ट

 मुख्य संपादक आशिष मुगटकर

▪️काळजी घेण्याचे जिल्हाप्रशासनाचे आवाहन 



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

 दि.३०प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी दुपारी ०१:०० वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज दिनांक ३० एप्रिल २०२३ या  दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट व दिनांक १,२,३ व ४ मे २०२३ चार दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.

दिनांक ३० एप्रिल २०२३ या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच १,२,३ व ४ मे २०२३ या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

दारू दुकाने हटाव कृती समिती कडून आमरण उपोषण

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

धर्माबाद येथील मद्याची दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करण्यासाठी वारंवार शासकीय पातळीवर निवेदने व विनंती अर्ज तसेच गावातील वाढणाऱ्या मद्यपी चा  हौदोस याचे छायाचित्र आणि त्यामुळे बाजारपेठेतील मार्गावर होणारा अडथळा आणि माता भगिनींची होणारी संसाराची राख रांगोळी या व अशा अनेक प्रश्नांवर धर्माबाद येथील समाजसेवक आर्य शिवशंकरजी सुरकुटवार यांनी वारंवार सदरील त्रासाबद्दल व होणाऱ्या अडचणीं विषयी संबंधित कार्यालयात जातीनिशी हजर राहून लेखी निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष चर्चेद्वारे सर्व अडचणी ह्या शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या पण त्यांच्या निवेदनांना व अर्जांना केराचेच टोपली दाखवण्यात आली.

 तेव्हा २७ मार्च रोजी एसडीएम कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असता या सर्व वरील होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी व गावातील विद्यार्थी ह्या दारू दुकानामुळे व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्यामुळे तसेच त्याहीपेक्षा खालच्या दर्जाची नशा करत असल्या कारणास्तव दारू दुकाने हे गावाबाहेर स्थलांतरित झालीच पाहिजेत. त्यावेळेस तिसऱ्या दिवशी उपोषण स्थळी संबंधित अधिकारी व कर्मचारी येऊन आम्ही या दारू दुकानांना नक्कीच गावाबाहेर घालवू असे म्हणून शहराबाहेर स्थलांतर करण्यास  कारवाई करू असे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले व अधिकाऱ्यांच्या शब्दांचा मान राखला पण तब्बल एक महिन्याच्या जवळपास कालावधी होऊनही दारू दुकानांना साधी पत्र नोटीस किंवा कोणतीही दखल सुद्धा घेतल्या गेली नाही. म्हणून १८ मार्चला परत उपोषणाचा इशारा दिला असता तात्पुरत्या स्वरूपात दारू दुकानांना गावाबाहेर स्थलांतर करण्याचे सात दिवसाच्या कालावधी मुद्दतीचे नोटीस बजावण्यात आले व तसेच उपोषण तात्पुरते स्थगित करण्यासाठी आर्य शिवशंकर जी सुरकुटवार यांना पत्र देण्यात आले. दारू दुकाने स्थलांतरित झाले नाही तर परत ३० एप्रिल रोजी सर्व धर्माबाद वासी यांच्या पाठिंब्यावर  नगरपरिषद समोर सकाळी ११ वाजता पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे दारू दुकाने हटाव कृती समिती च्या वतीने बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे असे अधिकृत सूत्रांकडून कळवले आहे.

 तरी सर्व धर्माबाद वासियांना या निवेद्वानाद्वारे अहवान करण्यात येते की या आमरण उपोषणास पाठिंबा देऊन दारू दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा 

वन रँक वन पेंशन मध्ये झालेल्या विसंगती दूर करण्यासाठी खासदार यांच्या मार्फत राष्ट्रपती, प्रधानमंत्री व रक्षामंत्री यांना निवेदन

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



 नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

दि.३० रोजी नांदेड जिल्हाचे खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांना वन रँक वन पेंशन मध्ये झालेल्या विसंगती दूर करने बाबत खासदार यांच्या मार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती, प्रधानमंत्री व रक्षामंत्री यांना निवेदन देण्यात आले .  

नांदेड जिल्ह्यातील वीर नारी वीर माता वयोवृद्ध माजी सैनिक तथा जिल्ह्यातील सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व माजी सैनिक मोठ्या प्रमाणात श्री प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या घरी आज सकाळी ९:०० वाजता उपस्थित होते. सर्व सैनिकाच्या अडी अडचणी बाबत सैनिकावर झालेल्या अन्याया बाबत खासदार साहेबांच्या मार्फत वरील मान्यवरांना पत्र पाठवण्यात आले.

 जेष्ठ नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री रामराव थडगे साहेब, सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे साहेब,श्री ज्ञानेश्वर डुमणे पाटील, श्री बालाजी चुकलवार साहेब, श्री हयूम पठान साहेब,श्री गणेश गव्हाणे साहेब, सह नांदेड जिल्ह्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी,माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

मुगट येथे जयंतीपुर्वी अवैध दारू दुकाने सज्ज !

 संपादक आशिष मुगटकर



मुगट वार्ताहार

मुगट येथे उद्या दि.२८रोजी जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीपुर्वी गावातील अनेक अवैध दारू दुकाने थाटली आहेत.आज गावांत ३०च्यावर दुकाने थाटली असुन त्यातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते.

गावात मुदखेडचे नवीन पोलिस निरीक्षक रुजू झाल्या वर गावातील अनेक ठिकाणी धाड टाकून अल्प प्रमाणात माल जप्त केला तरी गावात व गावातील मुख्य रस्त्यावर खुलेआमपणे अवैध दारू विक्री सुरुच आहे.गावातील नवी आबादी, जिल्हा परिषद शाळे समोर, पानटपरीत,वडरवाड्यात, मुदखेड रस्त्यावरील दुकानात, अनेक गावांतील घरातुन देशी, हातभट्टी, विदेशी ची या भागात विक्री जोमा सुरू आहे.

अनेका वर पोलिसांनी कारवाई करुन सुध्दा गावांत अवैध दारू विक्री ची दुकाने बंद न होता उलट त्यात वाढ होत आहे.

पुन्हा एकदा जयंती निमित्ताने अवैध दारू विक्रीच्या दुकानात मोठ्या प्रमाणात दारुचा साठा करण्यात आला आहे.

पंचनाम्यानुसार पिकविमा रक्कम न दिल्यास १ मे महाराष्ट्र दिनी शेतकरी करणार आत्मदहन !

 मुख्य संपादक आशिष मुगटकर


हदगाव तालुका/ प्रतिनिधी (भगवान देशमुख)

 सन २०२२-२३ आॕक्टोबर महिण्यात व अगोदर झालेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही.त्यामुळे चिंचगव्हाण येथील शेतकरी बालाजी दिगंबर घडबळे,सौ.वर्षा बालाजी घडबळे यांनी विमा कंपनीला रितसर ईमेल पाठवून पिकांच्या नुकसानी बाबत कळविले होते.त्यानंतर सदर पिकविमा कंपनीच्या प्रतिनीधींनी प्रत्यक्ष शेतात येऊन पंचनामा सुद्धा केला व ८०% नुकसान झाल्याचे लिहुन आमच्या सह्या घेऊन सुद्धा विमा कंपनी विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे.

      यामुळे सदर शेतकऱ्याने दिनांक २७ मार्च रोजी माननिय जिल्हाधिकारी नांदेड यांना योग्य ती कार्यवाही करुन मला न्याय मिळवून द्या अन्यथा १ मे २०२३ रोजी मी व माझी पत्नी आत्मदहन करणार असल्याचे कळविले होते.त्या निवेदनाबाबत कोनतेही अश्वासन न मिळाल्याने सदर शेतकरी दांम्पत्याने पुन्हा जिल्हाधिकारी नांदेड यांना दिनांक २४ एप्रिल रोजी स्मरण पत्र दिले, ३० एप्रिल पर्यंत कारवाई करा अन्यथा १ मे महाराष्ट्र दिनी आत्मदहन करणार असल्याचे कळविले.हेच निवेदन नांदेड येथील सदर कंपनीच्या कार्यालयात शेतकरी प्रत्यक्ष गेले असता,त्यांचे निवेदन ब्रँच मॕनेजर शोयब आलम यांनी घेण्यास नकार दिला.व आपण कंन्ज्युमर कोर्टात जाऊ शकता असा सल्ला दिला.प्रत्येक शेतकऱ्यांना कोर्टातच जाऊन विमा घ्यावा लागत असेल तर नुकसान झाल्यावर ७२ तासाच्या आत विमा कंपनीला कळवायचे,नंतर पंचनामा करुन घ्यायचा हा खटाटोप कशासाठी करायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

         एकुनच लोक प्रतिनिधी , प्रशासन व पिक विमा कंपनीच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ यावी यापेक्षा दुर्दैव कोणते असा प्रश्न आता भेडसावत आहे.

      सदर बाबतीत लोकप्रतिनीधी,प्रशासन ,व पिकविमा कंपनीने तात्काळ कारवाई करुन मरणाच्या दारात उभ्या असलेल्या शेतकरी दाम्पत्याला न्याय मिळवुन द्यावा, अशी शेतकरी बालाजी घडबळे,व सौ.वर्षा घडबळे यांनी मागणी केली आहे.

पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतून मिळवला रोजगार..

 मुख्य संपादक आशिष मुगटकर

गायकवाड कुटुंबाला रेशीमशेतीतून रोजगार
आणि कीटकसंगोपन गृहासाठी अनुदान!



सोलापूर जिल्हा प्रतिनिधी 

रेशीम उद्योग हा शेतीवर आधारीत असा कुटीरोद्योग आहे.तुती हे वर्षभर पाला देणारे पीक आहे. एकदा तुतीची लागवड केल्यानंतर ती १२ वर्ष राहते. पुन्हा-पुन्हा तुतीची लागवड करावी लागत नाही. सोलापूर जिल्ह्यात रेशीम शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. पंढरपूर तालुक्यातील गंगुबाई शामराव गायकवाड यांच्या कुटुंबाला रेशीमशेतीतून रोजगार आणि कीटकसंगोपन गृहासाठी अनुदान मिळाले आहे. त्यांच्या कुटुंबावर कसलेही कर्ज नाही, हे विशेष!

श्रीमती गंगुबाई शामराव गायकवाड यांचे गाव पंढरपूर तालुक्यातील सरकोली. गंगूबाई यांच्यासह मुलगा, सून व दोन नातू असे पाच माणसांचे कुटुंब. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून त्यांनी त्यामध्ये ऊस लावलेला होता. पण उसाचे उत्पन्न दीड वर्षातून एकदा मिळत होते. तेही म्हणावे तेवढे नव्हते. एके दिवशी त्यांचा नातू पांडुरंग प्रकाश गायकवाड हा भंडीशेगावमधील त्याच्या मित्राकडे गेला असता, त्याला रेशीम अळ्यांच्या कीटकसंगोपनाची माहिती मिळाली. दरम्यान, त्याने अधिक माहिती घेतली असता, मनरेगा अंतर्गत भंडीशेगाव, भाळवणी गावातील काही शेतकऱ्यांनी तुती लागवड केल्याचे त्यांना समजले. आपल्याच शेतात काम करून शासनाच्या रोजगार हमी योजनेतून मजुरी व अनुदान पण मिळते, हे समजताच गंगुबाई यांच्या नातवाने रेशीम शेती करण्यासाठी आग्रह धरला.

ऐवढ्यावरच न थांबता पांडुरंग गायकवाड यांनी रेशीम अधिकाऱ्यांना भेटून तुतीच्या लागवडीची व मनरेगा अंतर्गत कामाची सविस्तर माहिती घेतली. ही तीन वर्षांची योजना आहे. तीन वर्षांमध्ये ८९५ दिवसांची मजुरी मिळते. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात, याची संपूर्ण माहिती घेतली.

याबाबत गंगुबाई गायकवाड यांच्यावतीने नातू पांडुरंग गायकवाड म्हणाले, सन २०१९-२० मध्ये मनरेगा अंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही प्रति एक एकरमध्ये तुती बागेत रोपाद्वारे ६००० रोपे लावली. त्याची पाहणी करून कामाचा सांकेतांक (वर्क कोड) काढण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायतीमधील रोजगार सेवकाने माझ्याकडून ई-मस्टर कामाची मागणी अर्ज भरून घेतला. त्यामध्ये घरातील पाच लोकांची नावे व त्यांचा बँकेतील खाते क्रमांक मांडून दिला. आम्ही प्रत्येकाचे स्वतंत्र राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक काढले. त्यानंतर माझ्याच शेतात काम करत आम्हा पाच कुटुंब सदस्यांची मजुरी प्रति लाभार्थी प्रती दिन रुपये २५६ प्रमाणे प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा झाली. विशेष म्हणजे आमच्या नावावर कुठलेही पीककर्ज किंवा वैयक्तिक कर्ज नाही, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

त्यानंतर गंगुबाई गायकवाड यांनी कीटक संगोपनगृह बांधले. याबाबत त्या म्हणाल्या, कीटक संगोपनगृह, तुती रोपे नर्सरी, कीटक संगोपन साहित्य, जैविक खते, कुशल बिलाचे मला रक्कम रुपये १,०००१० मिळाले व अकुशल कामाचे रक्कम रुपये १,८०,७०८ असे एकूण रक्कम रुपये २८०७१८ मिळाले. सन २०२२-२३मध्ये आम्ही ८५०अंडीपुंज घेऊन ६८० किलो कोष उत्पादन घेतले. त्यापासून मला रक्कम रुपये ३,६३,५०० मिळाले. त्यानंतर मी शेतीला जोडधंदा देण्यासाठी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी १ गाई व १ म्हैस खरेदी केली. या उद्योगातून माझ्या कुटुंबातील सर्वच लोकांना घरच्या घरी काम मिळालेले आहे. सिल्क व मिल्क या प्रकारे दोन व्यवसाय चालू आहेत. एकूणच गायकवाड कुटुंबाला तुती लागवड, कीटक संगोपन व धागा निर्मितीमधून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.

मुगट येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी 

मुगट येथील पंचशील बुद्ध विहार रात भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 यावेळी पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण जयंती मंडळाचे अध्यक्ष तुकाराम दत्ताजी हाटकर तसेच निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण राहुल सिद्धार्थ हाटकर यांच्या हस्ते सकाळी १०:३० मिनिटांनी करण्यात आले.

 विहारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार मान्यवर मंडळींच्या हस्ते अर्पण करण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने पुरुष, महिला ह्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी पंचशील बुद्ध विहारात एकत्र आले होते.

या वेळी प्रल्हाद तोलाजी हाटकर,गौतम हाटकर,प्रकाश तूपसाखरे,मर्चंट साहेबराव हाटकर,ग्रा.प.सदस्य देवदत्त हाटकर,लक्ष्मण हाटकर,देवराव हाटकर,ॲड.माधव हाटकर, विलास हाटकर, पो.पा.भगवान हाटकर,उत्तम हाटकर,चंद्रमुनी हाटकर,वामन हाटकर,अंबादास हाटकर,चेतक हाटकर,विजय हाटकर,प्रकाश हाटकर,महेश हाटकर,सुरेश हाटकर,रोहित हटकर,माधव हाटकर,भिमा सदावर्ते,विजय हाटकर,सोनु निखाते,करण हाटकर,जय हाटकर, प्रकाश हाटकर,देविदास चिंतले,विशाल हाटकर,प्रवीण हाटकर, दीपक हाटकर ,नितीन हाटकर ,पोपट हाटकर ,अर्जुन हाटकर, सोनू हाटकर ,जितेश हाटकर,प्रशांत हाटकर,रामा हाटकर, नारायण हाटकर, गौतम हाटकर प्रदिप हाटकर सह गावातील प्रतिष्ठित नागरिकांची  उपस्थिती होती.

 गावातील नागरिक, विहार समितीचे सदस्य,जयंती मंडळाचे सदस्य यांची यावेळी उपस्थिती होती.

 गावातील मुख्य रस्त्यावर जयंती निमित्य चेतक भाऊ हाटकर मित्र मंडळाच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.

बोगस शाळांवर होणार कारवाई ; शिक्षण आयुक्तांकडून कारवाईसाठी २५ एप्रिलची मुदत

 मुख्य संपादक आशिष मुगटकर


पुणे प्रतिनिधी 

   अनधिकृत शाळांवर एफआयआर दाखल करणे, दंड आकारणे, शाळा बंद करणे, ही कारवाई करण्यासाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना २५ एप्रिलपर्यंत डेडलाइन ठरवून दिलेली आहे.

यामुळे आता अधिकार्‍यांना संबंधित शाळांवर कारवाई करावी लागणार आहे. राज्यात मागील काही वर्षांमध्ये राज्य शासनाची कोणतीही मान्यता न घेता अनधिकृत शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. या शाळा विद्यार्थ्यांकडून भरमसाट शुल्क वसूल करीत असतात. मागील काही महिन्यांपूर्वी सीबीएसईच्या काही शाळांच्या एनओसी बोगस आढळून आल्या होत्या.

याची शिक्षण आयुक्तांनी गंभीर दखल घेतली होती. राज्यातील शाळांच्या मान्यतांची कागदपत्रे तपासणीचे आदेशही त्यांनी दिले. यात राज्यातील १ हजार ३०० शाळांची कागदपत्रे तपासण्यात आली असून, ८०० शाळांची कागदपत्रे तपासणीची मोहीमही राबविण्यात आली. आता प्रत्यक्ष कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील शाळांना शासनाकडून मान्यता देण्यात आलेले परवानगी प्रमाणपत्र, स्वमान्यता प्रमाणपत्र आदींसह अन्य दस्तऐवजाची वैधता तपासणीसाठी शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती.

या समितीकडून वारंवार विभागीय शिक्षण उपसंचालकांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. शाळांची वैधता प्रमाणपत्रांची तपासणी पूर्ण करून अंतिम अहवाल तयार करून तो शिक्षण आयुक्तालयास सादर करावा लागणार आहे. संबंधित अधिकार्‍यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळांच्या शाळांकडे एनओसी, संलग्नता प्रमाणपत्र नसल्यास शाळांवर आरटीई २००९ अंतर्गत कारवाई करावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांचे समायोजन करणार…

शाळांवरील कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करावे लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत याप्रकरणी दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे शिक्षण आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

मुदखेड रेल्वे स्थानकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी 

मुदखेड रेल्वे स्टेशन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

मुदखेड रेल्वे स्टेशन मध्ये असलेल्या भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार मान्यवर मंडळींच्या हस्ते अर्पण करण्यात आला. व जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी राजू वाघमारे, मीना सर,सिद्धार्थ सरपाते, जावेद, भीमराव खंडेलोटे, राहुल बगाटे,संतोष निखाते, आशिष मुगटकर यांची विशेष उपस्थिती होती.तसेच मुदखेड रेल्वे स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी व प्रवासी जयंती ला उपस्थित होते.  



मोठी दुर्घटना ! सभामंडपावर झाड कोसळून ७ भाविक ठार; ५ गंभीर, ४० जखमी

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



अकोला / प्रतिनिधी 

पारस ( जि. अकोला) : बाबूजी महाराज संस्थानात आयोजित दु:ख निवारण कार्यक्रमासाठी रविवार, ९ एप्रिल रोजी भाविक एकत्र आले होते.

दरम्यान, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटल्याने कडुलिंबाचे झाड सभामंडपावर कोसळले. या मंडपाखाली दबून सात भाविकांचा मृत्यू झाला, ५ गंभीर जखमी तर ४० जण जखमी झाल्याची माहिती आहे.

पारस येथील बाबूजी महाराज संस्थान येथे दर रविवारी जिल्हाभरातील भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी रात्री १० वाजता 'दु:ख निवारण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या तयारीत मंदिराच्या बाजूच्या सभामंडपात भाविक एकत्र आले होते. दरम्यान, सायंकाळी वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटला. या वादळी वाऱ्यामुळे मंदिराच्या बाजूला असलेले कडुलिंबाचे झाड सभामंडपावर कोसळले. त्यामुळे सभामंडप व झाड अंगावर पडल्याने जवळपास ५० जण दबल्याची माहिती समोर येत असून, या घटनेत सात जण ठार झाल्याची माहिती ठाणेदारांनी दिली. यात चार महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटू शकले नाही.

या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमी भाविकांना बाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. बाळापूर पाेलिस घटनास्थळी पाेहाेचले असून, बचावाचे कार्य सुरू आहेत.

टिनपत्रे, सौर पॅनल उडाले!

वादळी वाऱ्यामुळे पारस येथे अनेक घरांवरील टिनपत्रांसह सौर ऊर्जेचे पॅनल उडाले. त्यापाठोपाठ अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने घरातील साहित्य भिजले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

देशव्यापी धरणे आंदोलनात नांदेडचे माजी सैनिक सहभागी

  मुख्य संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर वन रँक वन पेन्शन २च्या विसंगती दूर करण्यासाठी आज दि.३रोजी  देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने नांदेड जिल्हा तील माजी सैनिक या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

या आंदोलना नंतर नांदेडचे जिल्हाधिकारी राऊत यांना शिष्टमंडळाने लेखी निवेदन देण्यात आले .



या प्रसंगी सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा मा. उपनगराध्यक्ष नगरपालिका मुदखेड लक्ष्मण देवदे ज्ञानेश्वर, डूमने शेख हय्यूम पठान, बालाजी चुकलवाड, रामराव थडगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय समोर गणेश गव्हाने यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

 या प्रसंगी मुदखेड तालुक्यातील सर्व माजी सैनिक चंद्रकात तेलंगे, देवराव चौदंते, माधव पवार, बालाजी गव्हाणे,चांद साहेब सुनील चौदंते,देविदास पवार, विकास बल्फेवाड, शेख फारूक प्रभू घोंगडे, सह इतर सैनिक उपस्थित होते.

लोकप्रिय बातम्या