नांदेड जिल्हा प्रतिनिधी
धर्माबाद येथील मद्याची दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करण्यासाठी वारंवार शासकीय पातळीवर निवेदने व विनंती अर्ज तसेच गावातील वाढणाऱ्या मद्यपी चा हौदोस याचे छायाचित्र आणि त्यामुळे बाजारपेठेतील मार्गावर होणारा अडथळा आणि माता भगिनींची होणारी संसाराची राख रांगोळी या व अशा अनेक प्रश्नांवर धर्माबाद येथील समाजसेवक आर्य शिवशंकरजी सुरकुटवार यांनी वारंवार सदरील त्रासाबद्दल व होणाऱ्या अडचणीं विषयी संबंधित कार्यालयात जातीनिशी हजर राहून लेखी निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष चर्चेद्वारे सर्व अडचणी ह्या शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या पण त्यांच्या निवेदनांना व अर्जांना केराचेच टोपली दाखवण्यात आली.
तेव्हा २७ मार्च रोजी एसडीएम कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असता या सर्व वरील होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी व गावातील विद्यार्थी ह्या दारू दुकानामुळे व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्यामुळे तसेच त्याहीपेक्षा खालच्या दर्जाची नशा करत असल्या कारणास्तव दारू दुकाने हे गावाबाहेर स्थलांतरित झालीच पाहिजेत. त्यावेळेस तिसऱ्या दिवशी उपोषण स्थळी संबंधित अधिकारी व कर्मचारी येऊन आम्ही या दारू दुकानांना नक्कीच गावाबाहेर घालवू असे म्हणून शहराबाहेर स्थलांतर करण्यास कारवाई करू असे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले व अधिकाऱ्यांच्या शब्दांचा मान राखला पण तब्बल एक महिन्याच्या जवळपास कालावधी होऊनही दारू दुकानांना साधी पत्र नोटीस किंवा कोणतीही दखल सुद्धा घेतल्या गेली नाही. म्हणून १८ मार्चला परत उपोषणाचा इशारा दिला असता तात्पुरत्या स्वरूपात दारू दुकानांना गावाबाहेर स्थलांतर करण्याचे सात दिवसाच्या कालावधी मुद्दतीचे नोटीस बजावण्यात आले व तसेच उपोषण तात्पुरते स्थगित करण्यासाठी आर्य शिवशंकर जी सुरकुटवार यांना पत्र देण्यात आले. दारू दुकाने स्थलांतरित झाले नाही तर परत ३० एप्रिल रोजी सर्व धर्माबाद वासी यांच्या पाठिंब्यावर नगरपरिषद समोर सकाळी ११ वाजता पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे दारू दुकाने हटाव कृती समिती च्या वतीने बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे असे अधिकृत सूत्रांकडून कळवले आहे.
तरी सर्व धर्माबाद वासियांना या निवेद्वानाद्वारे अहवान करण्यात येते की या आमरण उपोषणास पाठिंबा देऊन दारू दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा