माळकौठा येथील अखंड हरिनाम सप्ताह रद्द .

 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे माळकौठा ग्रामस्थांच्यावतीने निर्माण


संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका/ प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 

दि.२८/०२/२०२१ ते ७/०३/२०२१ पर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताहा चालनार होता. परंतु राज्यात व जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित हा अखंड हरिनाम सप्ताह यावेळी रद्द करण्यात आला आहे असे गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.

 परिसरातील सर्व सदभक्त मंडळींनी यावेळीच्या  रद्द करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची नोंद घ्यावी असे आवाहन  माळकौठा ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले.






बारड येथील महावितरण वसाहतीला घरघर लाईनमनच्या निवासस्थानाची बखाल अवस्था

 संपादक आशिष मुगटकर

दुरावस्था :- मुदखेड तालुक्यातील बारड येथील महावितरण वसाहतीची बखाल दुरावस्था झालेली आहे.

बारड/ प्रतिनिधी

बारड येथील महावितरण कार्यालय वसाहत पन्नास वर्षा पूर्वीची असल्याने या ठिकाणी महावितरण वसाहातीला  घरघर लागली असल्याने लाईनच्या निवासस्थानाची अवस्था बखाल बनल्याने लाईनला राहण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

तालुक्यातील बारड महावितरण कार्यालया अंतर्गत  बारड सर्कल मधील विस गावाचा कारभार चालवला जातो त्यामुळे कामाचा व्याप मोठ्या प्रमाणावर असल्याने लाईमन स्टाँप साठी याठिकाणी वसाहत निर्मिती करण्यात आली होती परंतु अनेक वर्षापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या लाईमन निवासस्थाने आजच्या स्थितीत बकाल अवस्थेत असुन निवासी घराच्या खिडक्या, पत्रे, भिंतीला भेगा पडल्याअसुन ईमारत खिळखिळी ला आली असल्याने आठ निवासस्थाना पैकी चार निवासस्थानात धोका पतकरत कर्मचारी राहत आहेत तर चार घरे बंद अवस्थेत आहेत बदलत्यावातावरणा मुळे कधी काय घटना घडेल याची राहणाऱ्याना चिंता सतावत आहे.

महावितरण कंपनीचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याने वसाहत परिसरात अस्वच्छता असल्याने अनेक समस्या उदभवत असून साप, विंचवाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने याचा त्रास परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत आहे.

महावितरण कार्यालयाचे कार्यक्षत्र मोठे असल्याने कामदारी बजावण्यासाठी लाईमन कर्मचाऱ्यांना अपडावून करण्याची वेळ आली आहे. रात्री बेरात्री दीवटी असल्याने अनेक वेळा धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

लाईमन कर्मचारी यांच्या कामाचा वाढता ताण लक्षात घेता राहण्यासाठी घरे आवश्यक आहेत परंतु याठिकाणी घराची बकाल अवस्था झाल्यामुळे निवासी लाईनम नसल्याने अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहे याठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवासस्थानाची व्यवस्था करून देण्यात यावी तसेच बकाल झालेल्या वसाहतीला पुनर निर्माण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थान कडून करण्यात येत आहे.

बारड महावितरण वसाहत ही फार जुनी असून कार्यालय निर्मिती बरोबरच  कर्मचारी निवासी घराची निर्मिती झाली आहे सध्या याठिकाणी आठ घरे असून चारे घरे बंद अवस्थेत आहेत

- आर.व्ही. धकाते कनिष्ठ अभियंता बारड ता.मुदखेड 

मुदखेडात कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाई

नगरपालिका व पोलीस प्रशासन एकवटले





मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद

 मुदखेडात कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाई करण्यात येत असून यासाठी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन एकवटले असून कोरोना संकट वाढत असताना कोरोना नियमावलीचे पालन नकरता बेभान फिरणाऱ्या नागरिकांनवर दंडात्मक कारवाई चा बडगा प्रशासना कडून उपसण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांनी कोरोना संकटापासून वाचण्यासाठी कोरोना नियमाचे पालन काटेकोर पणे मोहीम राबविण्यात यावी असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर मुदखेड नगरपरिषदचे मुख्यअधिकारी रामराजे कापरे  पोलीस निरक्षक महेश शर्मा यांनी कोरोना नियमवलीचे उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करत दोनशे रुपया पर्यंत चा दंड थोटावला आहे.तसेच कोरोना नियमाचे पालन करत मास्क, सँनिटायझर, वापर करण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी बिनामास्क पणे बिनधास्त फिरणाऱ्या चाळीस जनांवर कारवाई करत आठ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

यावेळी मोहीमेसाठी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले,राजेंद्र वठाने,पोलीस कर्मचारी रवी लोहले,शेख मकसूद, सुनर मुंडे,रामेश्वर वाघमारे, गंगाधर भिसे, अनंत कुलकर्णी, मिसहाब सिध्दीकी,दीपक पवार आदी सह कर्मचाऱ्यांनी कामगिरी बजावली

निवघा येथे अखंड शिवनाम सप्ताह

 ब्रह्मा कुमारी पुजा बहन यांचे प्रवचन 


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील निवघा येथे अखंड शिवनाम  सप्ताह सुरू आहे. दर वर्षी प्रमाणे लिंगायत समाज सेवा मंडळाच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने हा सप्ताह साजरा केला जातो. 

दि.  २१  रोजी प्रजापिता  ब्रम्हा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्र मुदखेड च्या संचालीका पुजा बहेन   यांनी आपल्या प्रवचनात   प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांचे कार्या  ची माहिती  सांगितली, परमात्माचे वर्तमान काळात चालू  महत्वपूर्ण कार्य व ब्रह्माकुमारीज़ या संस्थेमधे दिले जाणारे ध्यानात   व्यवहार उपयुक्त  ध्यान असुन  ते आत्मसात करावे.  जीवन जगण्याची कला मिळाली तर सात्विक व्यवहाराची संबंधात मधुरता येईल .  जीवन  सुखमय  करण्यात मदत होते असे ब्रम्हा कुमारी पुजा बहेन यांनी सांगितले. 

  संयोजक समितीचे  नारायण  नरडले  यांनी आभार व्यक्त करून सत्कार केला. 

रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर सुद्धा शिवनाम सप्ताह निमित्ताने निवघेकर घेतात हे एक लोकोपयोगी कार्य आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार राजकीय धर्मनिरपेक्षतेच्या पलिकडेचे - नेते प्रवीण गायकवाड

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद

 दि.१९ रोजी मुदखेड शहरातील  आस्था निराधार निराश्रीत आश्रमात कु.श्रद्धा बारतोंडे यांच्या हिंदू एकता जाणीव जागृती महिला बचत गटाच्या वतिने शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त विचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 या विचार सभेस भाजपा मराठवाडा प्रभारी प्रवीण गायकवाड,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा अरधापुर नप विरोधी पक्षनेते,विधिज्ञ किशोर देशमुख,मुदखेड नपा गटनेते तथा कॉंग्रेस शहराध्यक्ष माधव पाटिल कदम,माजी नगराध्यक्ष सुनिल शेटे,कृषि ऊ.बा.समिती मुदखेडचे संचालक सुरेश शेटे,मधुकर हौसरे,नगर सेवक इमरान मच्छीवाले,माजी नगर सेवक कैलास गोडसे,जनान बंदी आंदोलनाचे नेते डॉ.किरण देशमुख,शिवसेना शहर प्रमुख सचिन माने,डॉ.लासोनकर,डॉ.संदीप पचलींग,नितीन गोडसे,भाजपचे अमोल अबादार,अमोल अडकीने,कालिदास जंगीलवड,राहूल कोठेवाड,शिवा एडके,अभिजीत नातेवाड,सचिन टेकले आदी उपस्थित होते.


यावेळी माधव कदम,डॉ.किरण देशमुख,प्रवीण गायकवाड,कैलास गोडसे यांचे शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर समायोचीत भाषणे झाली.

या वेळी बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले की,शिवाजी राजांच्या विचार आणि कार्याला शब्दांच्या श्रंखलेत गुंफने एक मोठे आव्हान आहे.राजांचे विचार आणि कार्य शब्दांच्या पलीकडे होते.राजांचा इतिहास उलघडतांना केवळ अफजल खानाचा वध,युद्ध,शस्त्र,आणि इस्लाम या संज्ञे पुरते महाराजांची मर्यादा नव्हती तर राजे एक कुशल प्रशासक,शास्त्रज्ञ,स्थापत्य अभियंते अशारुपात वारंवार आढळून येतात.राजांची धर्मनिरपेक्षता ही सद्याच्या राजकीय धर्मनिरपेक्षते सारखी नव्हती तर विचारांनी प्रेरित झालेली होती.राजांचे आजोबा मालोजी राजे भोसले इस्लामिक सुफी संत शहा शरिफ यांच्या विचारांनी प्रेरित झाले होते.त्यांनी स्वत:च्या मुलांची नांवे शहाजी आणि शरिफजी असे ठेऊन भोसले घराण्याची वैचारिक प्रगल्भता प्रत्यक्षात उतरऊन खर्या धर्मनिरपेक्ष विचारांची उभारणी केली.तोच सामाजिक समतेचा विचार राजांनी स्व कर्तुत्वाने हिंदवी स्वराज्यात आवलंबीला यातून राजांचे विचार सद्याच्या राजकीय धर्मनिरपेक्षतेच्या पलिकडले होते असे दिसून येते प्रतिपादन केले.

यावेळी मान्यवरांकडून राजांच्या प्रतिमेचे पुष्प,दीप,धुप पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक राम अबादार यानी केले तर सुत्र संचलन आणि आभार 

सुकृत भोसकर यांनी केले.विचार सभेचे लागलीच अनाथ विद्यार्थ्याच्या मिस्ठान्न भोजन दान पंगतीत रुपांतर झाले आणि शिवजयंती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





मुगट येथील सराफा दुकानातून ४ ग्राम सोनं घेऊन चोर पसार

 चोरांच्या सोबत चा एक लागला हाती

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

दि.२०रोजी मुगट येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या सराफा दुकानातून ४० ग्राम सोन्याची चोरीची घटना दुपारी १२च्या सुमारास घडली आहे.

मुख्य रस्त्यावर असलेल्या श्री हनुमान ज्वेलर्समध्ये दुपारी १२ च्या सुमारास गिऱ्हाईक म्हणून तीन व्यक्ती गाडीवर आले होते. त्यातील दोन व्यक्तींनी देवीसाठी मंगळसूत्र पाहिजे असे सांगितले व दुकानदारांनी त्यांना चार ग्राम मंगळसूत्र त्यांना दाखवले त्यातील एकाने गावात जाऊन हे दाखवून आणतो असे सांगितले व त्यांच्या सोबत असलेला एक व्यक्ती दुकानात त्यांनी बसवले व दोघेजण गाडीवर बसून ते मंगळसूत्र दाखवण्यासाठी गावात गेली. दुकानदारांनी त्या बसलेल्या व्यक्तीला दहा-पंधरा मिनिटांनंतर विचारले तुमची सोबतची माणसें अजून का आली नाहीत? त्या व्यक्तीने असे  सांगितले की मी त्यांना ओळखत नाही  असे सांगून तो पण निसटून जाण्याच्या मार्गावर असतानाच दुकानदारांनी  त्याला पकडून ठेवले. परंतु त्या दोन व्यक्ती बद्दल तो काहीच माहीत नाही असे वारंवार सांगत होता.

 या घटनेची चर्चा गावात होताच अनेक व्यक्ती ही घटना स्थळी पाहण्यासाठी या दुकाना समोर गर्दी केली होती. दुपारी २ पर्यंत या घटनेची चा गुन्हा नोंदवला गेला नाही.

खलिस्तानवादी दहशतवादी म्हणून पकडण्यात आलेला पंजाबी युवक निर्दोष

 संपादक आशिष मुगटकर

पंजाब येथील न्यायालयातून निर्दोष सुटका !



नांदेड जिल्हा/ प्रतिनिधी

नांदेड येथे आठ दिवसांपूर्वी खलिस्तानवादी दहशतवादी म्हणून पकडण्यात आलेला पंजाबी युवक निर्दोष आहे. पंजाब पोलिसांनी कोर्टात रिपोर्ट दाखल करून त्याला सोडून दिले आहे. गुरपिंदरसिंग संतासिंग उर्फ ग्यानी असे या युवकाचे नाव असून पंजाब राज्यातील ता. गुरुसर जिल्हा मुक्तसर येथील तो रहिवाशी आहे. अटकेनंतर न्यायालयात हजर करून प्रवासी रिमांडवर त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.


दि७ फेब्रुवारी रोजी नांदेड येथील शिकारघाट परिसरात पंजाब पोलीस व नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कार्यवाही करत गुरपिंदरसिंग संतासिंग नावाच्या 33 वर्षीय पंजाबी युवकास खलिस्तानी दहशतवादी असल्याच्या संशयातून अटक केली होती. गुरपिंदर सिंग हा पंजाब राज्यातील ता. गुरुसर जिल्हा. मुक्तसर येथील राहिवाशी आहे. खलिस्तान जिंदाबाद संघटनेच्या चार दाहशतवाद्या विरोधात पंजाब येथे बंदी आदेश घालण्यात आलीय. त्यातील एक आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याने पंजाब पोलिसांना गुरपिंदरसिंग संतासिंग हा आमचा साथीदार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पंजाब पोलीस व स्थनिक गुन्हे शाखा नांदेड यांनी संयुक्त कार्यवाही करत गुरपिंदर सिंग याला नांदेड येथे अटक करून प्रवासी रिमांडवर घेऊन पंजाबला रवाना करण्यात आले. परंतु, पंजाब पोलिसांच्या पुढील तपासात गुरपिंदर सिंग हा युवक दोषी न आढळल्यामुळे पंजाब पोलिसांनी स्वतः कोर्टात रिपोर्ट दाखल करून तो निर्दोश असल्याचे सांगितले व त्याला सोडून देण्यात आले. या सर्व घटनेची माहिती नांदेड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व पंजाब येथील आयओ जसविंदर सिंग यांनी दिली.


कोविड -१९ महामारी संपवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे - पोलिस महानिरीक्षक डॉ. टी. शेखर

 संपादक आशिष मुगटकर

लसीकरण :- मुदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात कोवीड लस घेताना सीआरपीएफ चे पोलीस महानिरीक्षक डॉ. टी. शेखर, सोबत डॉक्टर, कर्मचारी.

मुदखेड तालुका प्रतिनिधी/ अतिक अहेमद

 मुदखेड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोवीड लसीकरणाला सुरुवात झाली आहे.  सीआरपीएफ चे सैनिक ही लस टोचून घेत आहेत. आज पोलिस महानिरीक्षक डॉ. टी. शेखर,  यांनी ग्रामीण रुग्णालयात स्वतःला लसीकरण केले.

गेल्या वर्षी २३ मार्चपासून देशात लॉकडाउननंतर कोविड -१९ च्या साथीने देशातील सर्वच ठिकाणी, शहरेमध्ये हिंसक रूप धारण केले होते.कोविड -१९ बचाव  शिल्डचे संरक्षण करण्यासाठी कोविड -१९  साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी देशातील सरकार यानीं आपल्या प्रयत्नांतून कोविड -१९ बचाव  शिल्ड चे  सरकारी दवाखान्यात उपलब्ध करून दिले आहे मालिकेत, कोविड -१९ लसीकरण मागील आठवड्यापासून शहराच्या  ग्रामीण रुग्णालयात  ०४ फेब्रुवारीपासूू न सुरू झाले, तेव्हा ६११ जणांनी त्या लसीसाठी नोंदणी केली शहरातील सीटीसी सीआरपीएफ पोलीस महानिरीक्षक डॉ. टी. शेखर टुडे यांनी आज ग्रामीण रुग्णालयात येऊन कोविड -१९  टाळण्यासाठी लसीकरण केले.

स्थानिक पत्रकारानशी बोलताना देश गेल्या एक वर्षापासून युद्ध -१९ साथीच्या साथीने लढत आहे, पण कोविड -१९  च्या विरूद्ध सरकारी आणि आरोग्य यंत्रणा , प्रशासन यांच्या अथक परिश्रमांनी कोविड -१९ महामारी  टाळण्यासाठी सरकारने कोवीड -शिल्डला उपलब्ध करुन दिले आम्ही सर्व या लसीकरणासाठी पुढ़े येणे काळाची गरज असून  साथीच्या रोगाची प्रादुर्भाव थांबवण्यासाठी  सर्व प्रयत्न केले गेले आहेत आणि शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व आरोग्य टीमचे अभिनंदन करून या कामाचे कौतुक केले आहे, एकूण ६११ जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती ज्यात सीआरपीएफच्या ३०७ अधिकारी व सैनिकांना लसी देण्यात आली होती. त्यादरम्यान, कोरोनाच्या विरुद्ध अग्रभागी कार्य करणाऱ्याचे अभिनंदन केले कारण कोविडमुळे सैनिकांच्या प्रशिक्षणात अडथळा निर्माण झाला होता परंतु ऑनलाईन जवानाना कोर्सच्या कामकाजा विषयी वेळोवेळी ऑनलाईन माहिती देण्यात आली या महिनापासून मैदान वर प्रशिक्षण शुरू केले असल्याचे सांगितले


या वेळी सीटीसी सीआरपीएफ कमांडर लीलाधर महारानिया, सीएमडी डॉक्टर डीके मिश्रा, डॉ. मोहम्मद सरफराज, ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य व्यवस्थापक डॉ दिलीप फुगारे, डॉ कपिल जाधव, डॉ स्मिता सावंत यांच्यासह आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक पत्रकार संजय कोलते, ईश्वर पिन्नलवार,अतिक अहेमद, शेख इरफान, अमोल टेकले अब्दुल रझाक यांची उपस्थिती होती.

खांबाळा सरपंच पदी सौ.मिरा जाधव तर उपसरपंच पदी गोविंदराव भांगे बिनविरोध निवड

 संपादक आशिष मुगटकर

शुभेच्छा :- खांबाळा येथे सरपंच पदी सौ.मिरा गोविंद जाधव, उपसरपंच पदी गोविंदराव भांगे यांची बिनविरोध निवड झाल्याने गावातील मंडळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील खांबाळा येथील सरपंच पदी  सौ. मिरा गोविंदराव जाधव यांची तर उप सरपंच पदी गोविंदराव रामचंद्र भांगे यांची  बिनविरोध निवड झाल्याने गावकर्‍यांकऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

खांबाळा ग्रामपंचायत ही सात सदस्यीय असुन सात पैकी दोन जागा ओबीसी प्रवर्गाकरीता सुटल्या होत्या . त्यापैकी एका जागेवर विरोधी गटाच्या शोभाबाई बन ह्या बिनविरोध निवडून आल्या . तर पुरुषओबीसी ची जागा रिक्तच राहीली . उर्वरीत दोन सर्वसाधरण पुरुष व तीन सर्वसाधरण स्त्री आशा पाच जागेसाठी  कॉंग्रेसच्याच दोन पॅनल मध्ये अटीतटीची निवडणूक झाली . या निवडणूकीत मोतीराम पाटील भांगे यांच्या नविन पॅनलचे सौ . मिरा गोविंदराव जाधव, गोविंदराव रामचंद्र भांगे, संतोष नामदेवराव भांगे, सौ .वर्षा गंगाधर भांगे ,सौ . कमलबाई शिवाजी भांगे या पाचही उमेदवाराचा विजय झाल्याने त्यांच्याच पॅनलमधील  सरपंच पदी सौ .मिरा गोविंदराव जाधव तर उपसरपंच पदी गोविंदराव रामचंद्र भांगे यांची दि. १२ फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड झाली . 

या निवडीसाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून  खानसोळे  यांनी काम पाहीले. त्यांना ग्रामसेवक अजिम मुदखेडकर यांनी मदत केली . पॅनल मधील सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आनण्यासाठी मुदखेड पंचायत समितीचे सभापती मैसाजी दत्तराम भांगे ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेवराव भांगे ,  तंटामुक्ती अध्यक्ष मुकुंदराव भांगे, गांविंदरराव जाधव , गोविंदराव सोळंके , चेअरमन गोविंदराव भांगे , कोंडीबा भांगे , तातेराव भांगे ,संजय भांगे , बापुसाहेब मारोतराव भांगे , किशनराव भांगे , नागोराव भांगे,गणपतराव भांगे, विक्राम भांगे, गंगाधर भांगे , उमाकांत तुपेकर, बळीराम भांगे, व्यंकरराव भांगे, राजू भांगे, भिमराव तुप्पेकर , प्रभू भांगे , परसराम तुपेकर, दिगांबर तुपेकर , नवनाथ तुप्पेकर , विष्णू भांगे ,राजेश पावडे, रावसाहेब भांगे, पिराजी भांगे, रावजी भांगे , माणिका भांगे , यांनी परिश्रम घेतले होते . आज यांच्या सह इतर गावाकऱ्यांनी  ही त्यांची निवडी झाल्या बदल अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

मातृभूमी न्युज कडून नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य पदी निवड बदल हार्दिक शुभेच्छा!!



'जिजाऊ च्या लेकीच्या' हाती मुगट ग्रामपंचायतचा कारभार

 मुगट सरपंच पदी सौ कांताबाई वंजे तर उपसरपंचपदी जिजाबाई  कल्याणे यांची बिनविरोध निवड !

संपादक आशिष मुगटकर

 


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

मुदखेड ‍तालुक्यातील जिल्हा परिषदेचा गट असलेल्या मुगट ग्रामपंचायतीवर जि प सदस्या सौ अरुणाताई कल्याणे यांचे प्रतिनिधी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक भीमराव पाटील कल्याणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनल ने  बहुमताने सत्ता मिळविली असून यामध्ये मुगट च्या सरपंच पदी माळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते धोंडीबा वंजे यांच्या सौभाग्यवती कांताबाई वंजे यांची सरपंच पदी तर उपसरपंचपदी भीमराव पाटील कल्याणे यांच्या मातोश्री श्रीमती जिजाबाई हिरामण पाटील कल्याणे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

सरपंच उपसरपंच निवड प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून मंडळाधिकारी बालाजी कुराडे यांची उपस्थिती होती तर त्यांना ग्राम विकास अधिकारी राजेश्वर भुरे, तलाठी अपर्णा देशपांडे ग्रामपंचायत कर्मचारी अनिल कुलकर्णी, वामन हाटकर, कैलास कल्याणे, चंपतराव कल्याणे, विठ्ठल पवार ,किसन हातागळे आदींनी त्यांना सहकार्य  केले .


यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ गोदावरीबाई बालाजी पाटील मुंगल .ग्रा.प .सदस्य धाराजी बापूराव पाटील पवार शोभाबाई माधवराव पाटील कल्याणे सौ.रेखा राम हाटकर सौ.पल्लवी राहुल हाटकर एकनाथ गोविंदराव कल्याणे  देवदत्त भगवानराव हाटकर तातेराव किसन हातागळे सौ.सविता रामेश्वर तुपेकर संभाजी दत्ता तुपेकर यांची उपस्थिती होती. सदर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच. उपसरपंच . ग्रामपंचायत सदस्य.यांचा ग्रामपंचायत कार्यालय .श्रीकृष्ण माता मंदिर. पंचशील बुद्ध विहार .आदी ठिकाणी सत्कार करण्यात आला

.... राज्याचे माजी मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या पॅनल ला बहुमताने विजय केले त्याबद्दल आपण मुगटच्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आगामी काळात जिल्हा परिषद व शासन स्तरावरील सार्वजनिक लोकहिताच्या योजना गावच्या विकासासाठी प्रभावीपणे राबवू त्यासाठी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य करावे ग्रामस्थांच्या  विश्वासाला आपण तडा जावु देणार नसल्याची ग्वाही या निवड प्रसंगी बोलताना पॅनल प्रमुख भीमराव पाटील कल्याणे यांनी दिली 

यावेळी माधवराव पाटील कल्याणे चंद्रकांत पाटील कल्याणे तुकाराम हाटकर साहेबराव हाटकर  शिवराम पा कल्याणे व्यंकटराव पाटील कल्याणे देवराव हाटकर राहुल हाटकर बालाजी पाटील मुंगल माजी सरपंच नारायण रंगवाळ अंबादास पाटील मुंगल शरद कुलकर्णी रामजी कल्याणे नागोराव गीरे साईनाथ पांचाळ नागोराव पाटील कल्याणे चेअरमन माधवराव पाटील कल्याणे रमेश माळकरी शिवाजी पाटील कल्याणे  पोलीस पाटील भगवानराव हाटकर शिवानंद पाटील कल्याणे नारायण हाटकर बाळू धोंगडे विलास हाटकर शरद पवार धनंजय जोशी चंद्रकांत पाटील पवार अनिल गंगातीरे  दादा कल्याणे नंदू पाटील कल्याणे आनसाजी पाटील कल्याणे उत्तम हातागळे संभाजी हातागळे तुकाराम हातागळे  यांच्यासह अन्य ग्रामस्थांची प्रामुख्याने उपस्थिती होती .

 

मातृभूमी न्युज कडून नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना हार्दिक शुभेच्छा!


प्रशासन आपल्या गावी उपक्रम बारडमध्ये उत्साहात

संपादक आशिष मुगटकर

भेट:-प्रशासन आपल्या गावी या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक विभागाला भेट देऊन चर्चा करताना उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे


बारड/प्रतिनिधी

     मुदखेड तालुक्यातील बारड येथे प्रशासन आपल्या गावी या उपक्रमातून नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी विविध विभागात फेऱ्या माराव्या लागतात. काही कार्यालय तालुका व जिल्हा मुख्यालयी असतात. नागरिकांची कामे मंडळस्तरावरच मार्गी लावण्यासाठी व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

दर शुक्रवारी विविध विभागाचे अधिकारी मंडळस्तरावर पोहोचून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न जाणून घेतील. मुदखेड तालुक्यातील बारड येथे सदरचा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

स्वागत :- मुदखेड चे तहसीलदार दिनेश झांपले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना  ग्रामविकास अधिकारी बारड अनुप श्रीवास्तव.
 

ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, भूमिअभिलेख, तालुका कृषी अधिकारी, महिला व बालविकास, पशुधन विकास, वीज वितरण कंपनी, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी आपल्या विभागाच्या योजनांसह उपस्थित होते. यावेळी विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बारड मंडळातील नागरिकांकडून वेगवेगळ्या समस्यांसाठी आलेल्या अर्जांचा निपटारा करण्यात आला. 


     यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार दिनेश झांपले, सभापती बालाजी सूर्यतळे, गटविकास अधिकारी मारोतराव जाधव, सरपंच प्रभाकर आठवले, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, उपसभापती आनंदराव गादिलवाड, वैद्यकिय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके, नायब तहसीलदार संजय नागमवाड, संजय भोसीकर, ग्रामविकास अधिकारी अनुप श्रीवास्तव, सहाय्यक पोलीस निरीक्षक वानोळे, ग्रामपंचायत सदस्य माणिक लोमटे, विलासराव देशमुख, गजानन कत्रे, इंदूबाई भिमेवार, शेख आस्माबेगम, सोनी सूर्यलाड, प्रदीप देशमुख, संगीता सिरगीरे, राहूल आठवले, मीनाक्षी टिप्परसे, रोहिणी कवळे, मंगल बुरडे, कांता राठोड, सपना पूलकुंटवार, महानंदा देशमुख, कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे शिवकुमार देशमुख आदींची उपस्थिती होती.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष सहकार्य केले.

खुजडा ग्रामपंचायत सरपंच पदी सविता पवार तर उपसरपंच पदी वंदना संजय कुरे यांची बिनविरोध निवड

 संपादक आशिष मुगटकर

जनसेवा ग्रामविकास पॅनलचे खुजड्यात वर्चस्व  









 

      मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

 मुदखेड तालुक्यातील खुजडा ग्रामपंचायती च्या सरपंचपदी सविता पवार उपसरपंच पदी वंदना संजय कुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.मुदखेड शिवसेना तालुका अध्यक्ष संजय पाटील कुरे  यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा ग्रामविकास पॅनल चे खुजडा ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून सात पैकी चार जागेवर विजय मिळवून ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली.

 यावेळी सरपंच, उपसरपंच निवडीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश लाठकर,यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी गलांडे, ग्रामसेवक शंकर चिलेमोड, पोलीस भुक्‍तरे ,शेख यांंनी नियमावली नुसार सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रिया पार पाडली सर्वानुमते सरपंच, उपसरपंच, पदाची निवडणूक बिन विरोधक झाली आहे. सरपंच सविता भीमराव पवार उपसरपंच वंदना संजय पाटील कुरे ,सदस्य विमलबाई रमेश कुरे, मारुती बालाजी चिलमवाड,नुतन सदस्याचा यावेळी सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी मुदखेड शिवसेना तालुका अध्यक्ष संजय पाटील कुरे,बाबाराव कुरे,केशव कुरे,तेजराव कुरे,मारोती मालीपाटील,केशव पुयड,दींगाबर पवार, माधव पवार,राजदूत कुरे आदीसह गावातील नागरिक उपस्थित होते.

पशुवैद्यकीय दवाखाना सांडपाण्याच्या विळख्यात.

 संपादक आशिष मुगटकर


मुगट / प्रतिनिधी
मुदखेट तालुक्यातील मुगट येथे श्रेणी २चा पशुवैद्यकीय दवाखाना असुन या दवाखान्याच्या क्षेत्रात सभोवतालील ५/६गावाचा समावेश आहे.दररोज अनेक गावांतील पशुपालक ह्या ठिकाणी येतात.
 
या दवाखान्याच्या सभोवती मागील काही दिवसांपासून सांडपाणी साचलेले पाहायला मिळत आहे. या सांडपाण्या टाकलेल्या दगडावर पाय ठेवून या दवाखान्यात जावे लागते.गेल्या अनेक दिवसांपासून ह्या सांडपाण्याच्या वाद मिटला नाही.

या पुर्वीच्या ग्रामपंचायत ला हा प्रश्न सोडविता आला नाही.त्यामुळे हे साचलेले सांडपाणी आता पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सभोवती जमा झाले आहे.पशुवैद्यकीय अधिकारी यांनी हा प्रश्न गावातील आहे म्हणून याकडे लक्ष दिले नाही. दिवसेनदिवस हे साचलेले सांडपाणी वाढत आहे . त्यामुळे पशुपालक यांना दगडाचा आधार घेत या दवाखान्यात यावे लागत आहे.




उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते तलाठी सजा कार्यालयाचे मुगटला उद् घाटन.

 संपादक आशिष मुगटकर

    उद् घाटन :- मुगट येथे तलाठी कार्यालयाचे उद् घाटन करताना उपविभागीय अधिकारी खंदारे , सोबत तहसीलदार दिनेश झांपले,नायब तहसीलदार नागमवाड, मंडळ अधिकारी कुराडे, तलाठी श्रीमती देशपांडे 





 मुगट/ प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील मुगट येथे उपविभागीय अधिकारी भोकर राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते तलाठी सजा कार्यालयाचे उद् घाटन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार दिनेश झांपले,नायब तहसीलदार संजय नागमवाड, भोसीकर, जोगदंड मंडळ अधिकारी कुराडे,लाटकर, पठाण, यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंडळ अधिकारी कुराडे यांनी उद् घाटक उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे  व  तहसीलदार झांपले  यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

 यावेळी  तलाठी अपर्णा देशपांडे, यांचा उपविभागीय अधिकारी खंदारे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.शासनाच्या 'सुंदर माझ कार्यालय' या अभियानाच्या माध्यमातून मुगट येथे हे तलाठी सजा कार्यालय सुरू करण्यात आले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना सोईचे झाले असून त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा वाचणार आहे .
 या कार्यक्रमाला तलाठी कल्पना मुंडकर, खेडकर, केंद्रे, हंडे, असोले, बारसीकर, हैबते, मगरे, गलांडे, अव्वल कारकून खानसोळे, गाजीलवाड, गवार गुरू, दराडे, पुरमवाड ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील मुगट चे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

'प्रशासन आपल्या गावी' या उपक्रमाला चांगला प्रतिसाद


कार्ड वाटप :- प्रशासन आपल्या गावी या उपक्रमात रोजगार हमी वाटप करताना तहसीलदार दिनेश झांपले, जिल्हा परिषद सदस्या सौ. अरुणा कल्याणे, गट विकास अधिकारी जाधव, भिमराव कल्यानेे, पिंटू पाटील वासरीकर व जॉब कार्ड स्वीकारताना   सौ. सुशीला सखाराम पवार.

मुगट /प्रतिनिधी

दि.५ रोजी मुदखेड तालुक्यातील मुगट येथे 'प्रशासन आपल्या गावी' हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी भोकर राजेंद्र कंधारे, तहसीलदार दिनेश झांपले, जिल्हा परिषद सदस्या सौ.अरुणा कल्याणे, संचालक भिमराव पा. कल्याणे,पिंटु पाटील वासरीकर, गटविकास अधिकारी जाधव, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार, पोलिस निरीक्षक शर्मा, नायब तहसिलदार नागमवाड महावितरण चे बाहेती यांची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
उपविभागीय अधिकारी साहेब यांनी शासना कडून हा उपक्रम राबविण्या मागचा हेतू, उपक्रमाची माहिती उपस्थित लोकांना सांगितली.


यावेळी जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या प्रतिनिधी, संचालक यांनी आपली मते मांडली.लोकांनी या अभियानात सहभागी होवून आपले प्रश्न, अडचणी मांडुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.असे ते म्हणाले.



उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोजगार हमी चे जाॅब कार्ड, सातबारा, राशन कार्ड, धनादेश, विविध प्रकारचे प्रमाणपत्रे यांचे वाटप करण्यात आले. लोकांनी या मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व आपल्या अडचणी सोडुन घेतल्या.विशेष करून महावितरण,राशन, आधार व आरोग्य या विभागा कडे लोकांची गर्दी जास्त दिसून आली.  महसुल विभाग, भूमी अभिलेख विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग,राशन विभाग, आधार विभाग, बँकेची अधिकारी इत्यादी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नायब तहसीलदार भोसीकर, जोगदंड, मंडळ अधिकारी कुराडे,लाठकर, पठाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, तलाठी देशपांडे,मुंडकर, खेडकर,केंद्रे,हंडे,असोले,बारसीकर,हैबते,मगरे, गलांडे, अव्वल कारकून खानसोळे,गाजीलवाड,गवार गुरू, दराडे,पुरमवाड, कृषी सहायक राम कपाटे, देशपांडे,जमादार शिंदे, महिला, विविध गावातील मंडळी, इत्यादींची या कार्यक्रमाला उपस्थित होते.


लोहार समाज राज्यस्तरीय वधू-वर परिचय व पालक सूचक मेळाव्याचे आयोजन

 संपादक आशिष मुगटकर


बारड/प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड येथे लोहार समाज विकास संस्था नांदेड च्या वतीने लोहार समाज वधू-वर परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.७ रोजी सकाळी ११ वाजता. शीतला मंगल कार्यालय बारड तालुका मुदखेड या ठिकाणी हा मेळावा संपन्न होणार आहे.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. प्रा. साहेबराव पोपळघट सर कार्यक्रमाचे उद् घाटक मा. श्री सदाशिवराव हिवलेकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री गिरीश पोपळघट, मा. श्री दिनेश सोनाळेकर, कॅप्टन मा. श्री विजय कुमार सूर्यवंशी, मा. श्री डॉ. ओम प्रकाश पोपळे, मा. श्री अरविंद थोरात, मा. श्री दत्तकुमार कळसाईत, मा. श्री पी एल भालेराव, मा. श्री. डॉ. सत्यनारायण कोठे, मा. श्री युवराज टाकसाळ, मा. श्री सुभेदार काशिनाथ सूर्यवंशी, मा. श्री मेजर नंदकुमार कळसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून मा.श्री. इंजि. दिलीप बाळसकर मा. श्री विजय रूम साहेब, मा. श्री प्रा. आर.एस. चाफे, मा. श्री मनोहर पिपळाइत, मा. श्री गणेश रावजी शिंदे, मा. श्री माधवराव सूर्यवंशी हे लागणार आहेत

तरी या कार्यक्रमासाठी लोहार समाजातील युवक युवतींना आपल्या मनपसंत जोडीदार निवडण्याची सुवर्णसंधी या उपक्रमात उपक्रमाद्वारे मिळणार आहे तरी समाजातील युवक-युवतींनी व पालकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे नियोजन समितीच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे यावेळी नियोजन समितीमध्ये प्रकाश कौसे (अध्यक्ष), अशोक पोफळे (उपाध्यक्ष), दिलीप पोफळे( सचिव), शंकर पाचमाशे (सहसचिव),साईनाथ पांचाळ मुगटकर (कोषाध्यक्ष), त्रिंबक पोफळे (सहकोषाध्यक्ष), रामदास कळसे (संघटक), राजेश कौसे (सहसंघटक) यांचा समावेश करण्यात आलेला आहे

राज्यातील शिक्षकांचे २९ जानेवारी पासून मुंबई येथील आझाद मैदानावरील राज्यव्यापी आंदोलन सुरू,

 आंदोलनास पाच दिवस झाले तरी शासन घेत नाही दखल

नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्यातील गेली वीस वर्षांपासून होत असलेली पुरोगामी महाराष्ट्रातील विना अनुदानित शिक्षकांची हेळसांड थांबवा दि १३ सप्टेंबर२०१९ नुसार घोषित अनुदान मंजूर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कॉलेजचा २०%व टप्पा वाढ शाळांचा ४०%चा निधी वितरणाचा आदेश मा मंत्री महोदयांनी सभागृहात वारंवार अश्वासित केल्यानुसार  आताच तात्काळ पगार वितरणाचा आदेश काढून पगार सुरू करावा

 मागील वर्षी दि २४फेब्रुवारी२०रोजी ला आर्थिक अधिवेशनात मा अर्थमंत्री महोदयांनी पुरवणी मंजूर केली, तद्नंतर कोविडमुळे निधी वितरण केले नाही.बाकी कुणाचेच महाराष्ट्रात वेतन रोखले नाही पण आमचे मंजूर वेतन रोखून ठेवले.त्रुटी समिती नेमली, त्यानंतर १४/१०/२०च्या कॅबिनेटने १नोव्हेंबर२०२० पासून अनुदान देऊ केले त्यानुसार तपासून घोषित केलेले शाळा,कॉलेज पुन्हा तपासणी लावून आपण बरोबर एक वर्ष बीनपगारी शिक्षकांना झुलवत ठेवल,आधीच सर्व शाळा कॉलेज ह्या तपासून घोषित झालेल्या आहेत, व त्याचंअनुदान सभागृहात मंजूर आहे,तथा २०%वेतन  घेत असलेल्या शाळा पण चालू आहेत व त्यांचं पण ४०%अनुदान मंजूर आहे तसा जीआर मध्ये निधीचे टोकण अर्थ विभागाकडून टाकलेलं असतांना...


कुठल्याही शाळा कॉलेजवर अन्याय होऊ न देता तात्काळ निधी वितरणाचा आदेश काढण्यासाठी तथा अघोषित शाळा कॉलेज निधीसह घोषित करण्यासाठी 

 वरील मागण्यांसंदर्भात शासनाकडून गेली एक वर्षापासून आश्वासन व दिरंगाई शिवाय काहीच मिळत नसल्याने, विना अनुदानित शिक्षक हवालदिल झाला असून लोकडाऊन मध्ये २७ शिक्षक हृदयविकाराने व आत्महत्या करून मरण पावले आहेत तरी या निर्दयी शासनाने न्याय दिला नाही नुसतं अर्थखात शिक्षण खात्याकडे व शिक्षक खात अर्थखात्याकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याचे काम करत आहे यासाठी नाईलाजास्तव कंटाळून पूर्ण महाराष्ट्रातील विना अनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक दि २९ जानेवारी पासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन, आमरण उपोषण सुरू केले असून पाच दिवस झाले जवळपास पाच। हजार शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत तरी शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला असून यासाठी नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक घोषित, अघोषित व अंशतः अनुदानित शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई येथे  झोपीचं सोंग घेणाऱ्या सरकारला जबाब मागन्यासाठी शाळा बंद करून आंदोलनात सहभागी झाले आहेत.  नांदेड जिल्हा शिक्षक समन्वय संघाचे लातुर विभागीय कार्याध्यक्ष प्रा कैलास खानसोळे ,प्रा बाळासाहेब डाखोरे,प्रा नखाते प्रा पालीमकर, प्रा शेरे ,प्रा पांडुरंग बोराडे सह असंख्य शिक्षक आझाद मैदानावर शासनाविरुद्ध लढा देत आहेत

माझं गाव सुंदर गाव कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

 संपादक आशिष मुगटकर

आढावा बैठक :- मुगट येथे 'माझं गाव सुंदर गाव' या अभियानाची आढावा बैठक घेण्यात आली.त्यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना ग्रामविकास अधिकारी राजेश्वर   भुरे

मुगट/प्रतिनिधी

 मुदखेड तालुक्यातील मुगट येथे 'माझं गाव सुंदर गाव' या अभियानात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.त्या निमित्ताने मुगट येथे या कार्यक्रमात आढावा घेण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, शिक्षणासाठी प्रा.प्रशांत दिग्रसकर, गटविकास अधिकारी मुदखेड मारोती जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी भिमराव पाटील, यांची या वेळी प्रमुख उपस्थितीत होती.



ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगीतली.

यावेळी ग्रामपंचायत चे नुतन सदस्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, विस्तार अधिकारी कैलास गायकवाड,इतर शासकीय अधिकारी, गावातील मंडळी, या वेळी उपस्थित होते

लोकप्रिय बातम्या