मुगट सरपंच पदी सौ कांताबाई वंजे तर उपसरपंचपदी जिजाबाई कल्याणे यांची बिनविरोध निवड !
मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेचा गट असलेल्या मुगट ग्रामपंचायतीवर जि प सदस्या सौ अरुणाताई कल्याणे यांचे प्रतिनिधी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक भीमराव पाटील कल्याणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनल ने बहुमताने सत्ता मिळविली असून यामध्ये मुगट च्या सरपंच पदी माळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते धोंडीबा वंजे यांच्या सौभाग्यवती कांताबाई वंजे यांची सरपंच पदी तर उपसरपंचपदी भीमराव पाटील कल्याणे यांच्या मातोश्री श्रीमती जिजाबाई हिरामण पाटील कल्याणे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सरपंच उपसरपंच निवड प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून मंडळाधिकारी बालाजी कुराडे यांची उपस्थिती होती तर त्यांना ग्राम विकास अधिकारी राजेश्वर भुरे, तलाठी अपर्णा देशपांडे ग्रामपंचायत कर्मचारी अनिल कुलकर्णी, वामन हाटकर, कैलास कल्याणे, चंपतराव कल्याणे, विठ्ठल पवार ,किसन हातागळे आदींनी त्यांना सहकार्य केले .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ गोदावरीबाई बालाजी पाटील मुंगल .ग्रा.प .सदस्य धाराजी बापूराव पाटील पवार शोभाबाई माधवराव पाटील कल्याणे सौ.रेखा राम हाटकर सौ.पल्लवी राहुल हाटकर एकनाथ गोविंदराव कल्याणे देवदत्त भगवानराव हाटकर तातेराव किसन हातागळे सौ.सविता रामेश्वर तुपेकर संभाजी दत्ता तुपेकर यांची उपस्थिती होती. सदर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच. उपसरपंच . ग्रामपंचायत सदस्य.यांचा ग्रामपंचायत कार्यालय .श्रीकृष्ण माता मंदिर. पंचशील बुद्ध विहार .आदी ठिकाणी सत्कार करण्यात आला
.... राज्याचे माजी मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या पॅनल ला बहुमताने विजय केले त्याबद्दल आपण मुगटच्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आगामी काळात जिल्हा परिषद व शासन स्तरावरील सार्वजनिक लोकहिताच्या योजना गावच्या विकासासाठी प्रभावीपणे राबवू त्यासाठी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य करावे ग्रामस्थांच्या विश्वासाला आपण तडा जावु देणार नसल्याची ग्वाही या निवड प्रसंगी बोलताना पॅनल प्रमुख भीमराव पाटील कल्याणे यांनी दिली
यावेळी माधवराव पाटील कल्याणे चंद्रकांत पाटील कल्याणे तुकाराम हाटकर साहेबराव हाटकर शिवराम पा कल्याणे व्यंकटराव पाटील कल्याणे देवराव हाटकर राहुल हाटकर बालाजी पाटील मुंगल माजी सरपंच नारायण रंगवाळ अंबादास पाटील मुंगल शरद कुलकर्णी रामजी कल्याणे नागोराव गीरे साईनाथ पांचाळ नागोराव पाटील कल्याणे चेअरमन माधवराव पाटील कल्याणे रमेश माळकरी शिवाजी पाटील कल्याणे पोलीस पाटील भगवानराव हाटकर शिवानंद पाटील कल्याणे नारायण हाटकर बाळू धोंगडे विलास हाटकर शरद पवार धनंजय जोशी चंद्रकांत पाटील पवार अनिल गंगातीरे दादा कल्याणे नंदू पाटील कल्याणे आनसाजी पाटील कल्याणे उत्तम हातागळे संभाजी हातागळे तुकाराम हातागळे यांच्यासह अन्य ग्रामस्थांची प्रामुख्याने उपस्थिती होती .
मातृभूमी न्युज कडून नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना हार्दिक शुभेच्छा!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा