![]() |
| शुभेच्छा :- खांबाळा येथे सरपंच पदी सौ.मिरा गोविंद जाधव, उपसरपंच पदी गोविंदराव भांगे यांची बिनविरोध निवड झाल्याने गावातील मंडळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. |
मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील खांबाळा येथील सरपंच पदी सौ. मिरा गोविंदराव जाधव यांची तर उप सरपंच पदी गोविंदराव रामचंद्र भांगे यांची बिनविरोध निवड झाल्याने गावकर्यांकऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
खांबाळा ग्रामपंचायत ही सात सदस्यीय असुन सात पैकी दोन जागा ओबीसी प्रवर्गाकरीता सुटल्या होत्या . त्यापैकी एका जागेवर विरोधी गटाच्या शोभाबाई बन ह्या बिनविरोध निवडून आल्या . तर पुरुषओबीसी ची जागा रिक्तच राहीली . उर्वरीत दोन सर्वसाधरण पुरुष व तीन सर्वसाधरण स्त्री आशा पाच जागेसाठी कॉंग्रेसच्याच दोन पॅनल मध्ये अटीतटीची निवडणूक झाली . या निवडणूकीत मोतीराम पाटील भांगे यांच्या नविन पॅनलचे सौ . मिरा गोविंदराव जाधव, गोविंदराव रामचंद्र भांगे, संतोष नामदेवराव भांगे, सौ .वर्षा गंगाधर भांगे ,सौ . कमलबाई शिवाजी भांगे या पाचही उमेदवाराचा विजय झाल्याने त्यांच्याच पॅनलमधील सरपंच पदी सौ .मिरा गोविंदराव जाधव तर उपसरपंच पदी गोविंदराव रामचंद्र भांगे यांची दि. १२ फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड झाली .
या निवडीसाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून खानसोळे यांनी काम पाहीले. त्यांना ग्रामसेवक अजिम मुदखेडकर यांनी मदत केली . पॅनल मधील सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आनण्यासाठी मुदखेड पंचायत समितीचे सभापती मैसाजी दत्तराम भांगे ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेवराव भांगे , तंटामुक्ती अध्यक्ष मुकुंदराव भांगे, गांविंदरराव जाधव , गोविंदराव सोळंके , चेअरमन गोविंदराव भांगे , कोंडीबा भांगे , तातेराव भांगे ,संजय भांगे , बापुसाहेब मारोतराव भांगे , किशनराव भांगे , नागोराव भांगे,गणपतराव भांगे, विक्राम भांगे, गंगाधर भांगे , उमाकांत तुपेकर, बळीराम भांगे, व्यंकरराव भांगे, राजू भांगे, भिमराव तुप्पेकर , प्रभू भांगे , परसराम तुपेकर, दिगांबर तुपेकर , नवनाथ तुप्पेकर , विष्णू भांगे ,राजेश पावडे, रावसाहेब भांगे, पिराजी भांगे, रावजी भांगे , माणिका भांगे , यांनी परिश्रम घेतले होते . आज यांच्या सह इतर गावाकऱ्यांनी ही त्यांची निवडी झाल्या बदल अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
मातृभूमी न्युज कडून नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य पदी निवड बदल हार्दिक शुभेच्छा!!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा