एस एस सी क्लासमेंट २०१६-१७ ग्रुप तर्फे २६/११ हल्या दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी

 एस एस सी क्लासमेंट ग्रुप तर्फे २६/११ या  दिनानिमित्त  औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौक,ग्रामपंचायत समोर पेठवडज येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराला ५१ रक्तदान करून आपले सहयोग दिले आहे. या शिबिरामध्ये नांदेड येथील श्री गोळवलकर गुरुजी रक्तपेढी  यांनी सहभाग नोंदवला होता. या शिबिराचे उद्घाटन डॉ गायकवाड सर यांच्या हस्ते झाले. यावेळी एस एस सी क्लासमेंट ग्रुप चे मेंबर उपस्थित होते.

आज कोविड-१९ च्या पादुर्भावामुळे रक्तपेढीमध्ये रक्ताची खूप गरज असून रक्तदाते पुढे येत नाहीत तर अशा शिबीरांच्या माध्यमाने रक्तदान झाल्यास समाजाला खूप मोठी मदत होईल असे मत डॉ गायकवाड  यांनी यावेळी मांडले. दर वर्षी वेगवेगळे उपक्रम करण्याचा माणस या ग्रुप चा आहे  तर या वेळेस आरोग्याला मोठी साथ मिळावी म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करून युवकांना समाजासाठी काहीतरी देणे लागतो या करिता प्रेरित करण्याचे काम नेहमी एस एस सी क्लासमेट करेल अशा विश्वास ग्रुप ने बोलून दाखवला.


यावेळी शहीद पोलिस यांना अभिवादन करण्यात आले.  समाजासाठी हितकरी काम करण्याचे उद्देश असल्याचं बोलून  दाखवून दिलं.  

या शिबिराला यशस्वी करण्याकरिता  शिव चिटकुलवार,अमोल पांढरे,प्रदीप पुटवाड,प्रताप कंधारे,ज्ञानेश्वर सुवर्णकार,वैभव केंद्रे,तुळशीदास डावकोरे,आकाश पूटवाड,संदीप जोगदंड,अरुण पंदीलवाड,गणेश गड्डमवार आदींनी परिश्रम घेतले.

सामाजिक कार्यकर्ते रामा गागलवाड यांचे निधन

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड /तालुका प्रतिनिधी

 मुदखेड तालुक्यातील महाटी येथील दैनीक समिक्षाचे तालूका प्रतिनिधी साहेबराव गागलवाड यांचे वडील तथा महाटी येथील सामाजिक कार्यकर्ते रामा गागलवाड यांचे ता २६ नोहेंबर गुरुवार रोजी  वृद्धापकाळाने  निधन झाले ते ९५ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थीवावर महाटी- येळी पूला जवळ गोदाकाठावर अंत्य संस्कार करण्यात आला.रामा गागलवाड यांनी गावच्या राजकारणांत एक वेगळाच ठसा ऊमटवला होता.अनेक सरपंच आले गेले परंतू पस्तीस वर्ष ग्राम पंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम केले.तब्बल सातवेळा सतत ग्राम पंचायतवर निवडून येन्याचा विक्रम त्यांनी केला.त्यामुळे गावकऱ्यांचे ऋणाबंध नेहमीच त्यांच्या पाठिशी होते.त्यांना दोन मुले व विवाहित मुलगी ऐवढिच अपत्य असले तरी सुना नातू पणतूंनी वाडा भरला.२०११ पासून समाज सेवेचा संकल्प बांधत पत्रकार म्हणून काम करनाऱ्यां  साहेबराव गागलवाड यांनी वडीलांची देखबाल ठेवली.परंतू अखेर त्यांच्या वडीलांची प्राण ज्योत मावळली.गागलवाड यांच्या दुःखात अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांचेसह सर्व तालूका पत्रकार संघ,मित्र मंडळी व स्नेही सामील झाले.

मुगट येथे महात्मा ज्योतिबाराव फुले यांचा स्मृतिदिन साजरा

 संपादक आशिष मुगटकर


मुगट/ प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट येथे दिनांक २८ रोजी सकाळी ११:०० वाजता महात्मा फुले चौक, मुगट येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबाराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी महात्मा ज्योतिबाराव फुले यांच्या कार्याचा परिचय ऍड.माधव हाटकर (अध्यक्ष अभिवक्ता संघ मुदखेड) यांनी दिला.

 यावेळी बालाजी महाराज जाधव,युवा कार्यकर्ते राम पाटील कल्याणे,मयूर कल्याणे,आंबादास हाटकर,अनिल सोळंखे,मंगेश जाधव,शुभम जाधव,वैभव गजले,व्यंकटराव तूप्पेकर,ज्ञानेश्वर गंगातीर,अमोल जाधव,नामदेव धोंगडे,दता कल्याणे,गजानन भाशिंगे,सोनू जरतारे,माधव आढाव,भीमराव सदावर्ते,आनंद भंडारे,गोविंद राऊत,राजेश जाधव,चंपती कल्याने,आदेश कदम आदी गावातील युवकांची मोठ्या प्रमाणावर  यावेळी उपस्थिती होती.

पाटनूर येथील पंचवार्षिक विकासाला प्राधान्य देत सरपंच,ग्रामपंचायत सदस्याचा सन्मान करुन निरोप

 कै.बच्चूराज देशमुख मित्रमंडळाचा उपक्रम


 बारड /प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड पोलीस ठाण्या अंंतर्गत असलेल्या मौजे  पाटणुर नगरित गावातील उत्कृष्ट केलेल्या कार्याची दखल घेत सरपंच, ग्रामविकास अधिकारी  ग्रामपंचायत सदस्य यांना सन्मानित करून निरोप यावेळी देण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या सुरवातीस समाजसेवक कै.बच्चूराज देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला 

यावेळी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी दत्ता महागाडे हे होते तर प्रमुख भा.सा.का.संचालक सुभाषराव देशमुख, आर.टी.कल्याणकर, महेबुब शेख,माजी सरपंच विजयमाला बिराडे,संजय धोंडगे, पंढरीनाथ बिराडे,शिवाजी तांदूळवाड,गणपतराव गुंंडजवाड, शिवाजी देशमुख,समाधान शिंदे ग्रामविकास अधिकारी रवि क्षिरसागर,आदी उपस्थिती होती.

सरपंच, ग्रामपंचायत सदस्याचा ग्रामपंचायतचा जुन्या कार्यकारणीची मुदत संपली असलेल्याने त्यांनी कार्यक्रम आयोजित केला पंचवार्षिक मध्ये केलेल्या कार्याला उजाळा देत केलेल्या विकास कार्याबद्दल गावातील कै.बच्चूराज देशमुख मित्रमंडळा कडून सरपंच, सदस्य,ग्रामसेवक यांचा सहपत्नीक सत्कार करुन सन्मानित करण्यात आले आहे.

समाजसेवक कै.बच्चुराज देशमुख यांनी बहुजन समाजांना एकत्रित करुन ग्रामपंचायत विकास कामात झेप घेतली होती.त्यांच्या कार्याचा यावेळी उजाळा देण्यात आला.तसेच पंचवार्षिक कामाचा लेखाजोखा यावेळी ग्रामस्थ पुढे सरपंच प्रतिनिधी पंढरीनाथ बिराडे यांनी यावेळी सांगितला आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड१९ मध्ये अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या कोरोणा योद्धा आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी मदतनीस  ग्राम रोजगार सेवक व ग्रामपंचायत कर्मचारी,शाळा मुख्याध्यापक यांचा ही यावेळी सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी दीनेश लोणे, बबन काळे  प्रभाकर  बिऱ्हाडे,  डॉ बाळासाहेब बि-हाडे,डॉ हरिदास कोकाटे, जगदिश शर्मा ,देविदास बिऱ्हाडे,शिवाजी राजेश्वर देशमुख,तुकाराम किरकध,बालीराव काळे,गोविंदराव देशमुख,श्रीधर देशमुख,अरविंद देशमुख,नवनाथ मुंडकरी,संभाजी येळणे,भास्कर बि-हाडे,विनोद धोंडगे,भगवान सिंग पाटणुरवाले, चरणसिंग पाटणुरवाले,सुरेश पतंगे,मारोती धाडे,त्रिंबक महाजन,माधव नांदेडकर,गोमाजी येळणे,हरी हुरदुके,सतिश कोकाटे,शैलेष हुरदुके,अनसाजी शिंदे, सह ग्रामस्थ उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिनेश लोणे सुत्रसंचलन बबन काळे,तरआभार डॉ हरीदास कोकाटे यांनी मानले.

पदवीधर मतदानासाठी " धनलक्ष्मीची" मतदारांना आशा

विधानसभा निवडणुकीचा मतदारांवर प्रभाव कायम

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

भोकर मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात व विशिष्ट पक्षाकडून मतदारांवर नोटाचा वर्षाव करण्यात आला होता. त्याच नोटाची आठवण आज सुद्धा मतदारांच्या डोक्यात कायम आहे.

 सध्या महाराष्ट्रात पदवीधर मतदान यांचा प्रचार व सभांचा जोर आहे.तर अनेक ठिकाणी मतदारांना पोलचीट वाटपाचे काम जोरात सुरू आहे. अनेक गावात कार्यकर्ते आपल्या पक्षाचे जाहीरनामे व पोलचीट वाटप करण्याचे काम करत आहेत. गावातील अनेक कार्यकर्त्यांना पोल चीट वाटप करताना मतदारांकडून एकच मागणी होत आहे " काही आहे की नाही" ?? अशी विचारणा मतदारांन कडून वारंवार केली जात आहे.त्यामुळे गावातील पोलचीट वाटप करणारे सामान्य कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत.कोरोनामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार नाही.खाजगी शाळा बंद आहेत.

गेल्या विधानसभे सारखं या पदवीधर मतदानात सुद्धा आपल्याला  "धनलक्ष्मी" मिळणार या आशेने वाट पाहत असतानाचे चित्र आज ग्रामीण भागात पाहवयास मिळत आहे

मुदखेड शहरात दोन सख्ख्या भावाच्या घरी एकाच वेळी चोरी...

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

मुदखेड शहरात शिवाजीनगर भागात घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी दोन सख्ख्या भावाचे घरी दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मुद्देमालासह रक्कम चोरी केल्याची घटना दिनांक २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली आहे.

शहरात शिवाजीनगर जुनी आयटीया कार्यालया पुढे असलेल्या संभाजी दत्तात्रेय पिन्नलवार व शाहजी दत्तात्रेय पिन्नलवार हे दोघेही भाऊ आपल्या कुटुंबासह सासरवाडीला गेले होते घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी दिनांक २४ नोव्हेंबर च्या मध्यरात्री दोन दरवाज्याचे कुलूप तोडून घरामध्ये असलेल्या कपाट फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिने सह नगदी रक्कम चोरी केली असल्याची घटना घडली आहे.

चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश भाले, पांचाळ, यांच्यासह आधी पोलीस कर्मचाऱ्यांनी पिन्नलवार यांच्या घरी चोरी झाल्याचे चौकशी करून अज्ञात चोरट्याच्या विरोधात मुदखेड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

मुदखेड शहरात घराला कुलूप असल्याचे पाहून चोरी करण्याचे घटना सातत्याने घडत असून यापूर्वीसुद्धा माजी नगरसेवक कै. श्याम पांचाळ, प्राध्यापक आनंदा बौनवाड, यांच्यासह आधी नागरिकांच्या घरी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

मुदखेड शहरात सराफा दुकानदाराला लुटण्याचा प्रकार करणाऱ्या दरोडेखोरांना पोलीस निरीक्षक सूनील निकाळजे यांनी आठ दिवसाच्या आत जेल बंद केले असून त्याच प्रमाणे मुदखेड शहरात भुरट्या चोरट्यांच्या शोध घेऊन त्यांना लवकरच जेल बंद करू असे मुदखेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी सांगितले आहे.

मुगट,आमदुरा परिसरातील गोदावरी नदीपात्रात महसूल विभागाची कारवाई

  अवैद्य रेती उत्खनन करणारे तीन तराफे लागले हाती

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

       मुदखेड तालुक्यातील मुगट,आमदुरा परिसरातील गोदावरी नदी पात्रात अवैद्य रित्या रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियावर  महसूल विभागाने धाड टाकून कारवाई केली.त्यात त्यांच्या हाती वाळु काढन्याचे तीन तराफेच हाती लागले.महसुल विभागाने ते तराफे जाळून टाकून नष्ट करण्यात आले.या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळु तराफ्याच्या साहाय्याने काढने चालुच आहे. गोदावरी घाटात एका तराफ्या मार्फत रेती माफिया रेती उत्खनन करत असतानाची माहिती महसूल पथकाला मिळाल्यामुळे ही धडक कारवाई करण्यात आली.

महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कंधारे तहसीलदार दिनेश झांपले यांच्या मार्गदर्शना खाली मंडळ अधिकारी बी.डी. कुराडे,तलाठी खेडकर,घंटापल्ले,मुगट पो.पा. पथकाच्या मार्फत यावेळी धाड टाकण्यात आली. एका तराफ्या च्या साह्याने रेती माफिया नदीपात्रात रेती उत्खनन करताना आढळला  परंतु  तो महसूल पथकाच्या हाती लागला नसून  त्यांनी नदीपात्रात उडी घेऊन  फरार झाल्याची घटना  या ठिकाणी घडली असल्याचे  मंडळ अधिकारी  बी.डी. कुराडे यांनी यावेळी सांगितले 

याआधी महसूल पथकाने चिलपिंपरी गोदाघाट,वासरी, शंखतीर्थ या शिवारातील गोदावरी पात्रातील रेती उत्खनन स्पॉटवर वाळू माफिया यांच्या तराफे बोटींवर कारवाई करून बोटी तराफे उध्वस्त करुन कारवाई करण्यात आली होती परंतु नदीपात्रात या परिसरात उत्खनन होत असल्याने महसूलच्या हाती बडे मासे अद्याप लागले नसल्याने रेती उत्खनन चोरी चुपके सुरूच आहे. यावर महसूल पथक रेती माफीयावर नजर ठेवून असल्याने रेती माफिया वर निश्चितच आळा बसेल असे हमी महसूल पथका कडून यावेळी हमी दिली आहे.आमदुरा, मुगट परिसरात तीन तराफे  हाती लागल्याने या तिने तराफ्यावर  कारवाई करुन जाळून टाकुन नष्ट करण्यात आले आहेत

मुदखेड शहरात हजरत टीपू सुलतान यांची २७० वी जयंती साजरी करण्यात आली

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद

मुदखेड शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुदखेड शहरातील मदीना नगर निहाली रोडवरील टिपू सुलतान चौकात शहरातील तरुणांनी हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करुण जयंती साजरी केली.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी हजरत टीपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, परंतु यावर्षी कोविड -१९  च्या साथीने देशाने सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला, परंतु काही काळानंतर सरकारने नागरिकांना दिलासा  देऊन काही अशी सुट देण्यात आली त्याचं अनुषंगाने , आज मुस्लिम समाजातील तरुणांनी टिपू सुलतान ब्रिगेडचे तालूका  अध्यक्ष सय्यद मुजीब सामाजिक  कार्यकर्ते गफ्फार भाई पारेवाले, साप्ताहिक मुदखेड दर्पण चे संपादक शेख इरफान शेख इमाम, एमआयएम पक्षाचे मोहम्मद मजीद, कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते मुजीब पठाण, अझर मलिक, बबलूभाई जनिमिया, पत्रकार शेख जब्बार आदींची यावेळी उपस्थिती होती .

शेतकऱ्याने अडवलेला रस्ता पोलीस बंदोबस्तात तात्पुरत्या स्वरूपात सुरू

 पोलिस फौजफाटा घेऊन घटना स्थळी दाखल

संपादक आशिष मुगटकर


मुगट/प्रतिनिधी

 मुगट येथील मुगट ते मुगट रेल्वे स्टेशन रस्ता मागील काही दिवसापासून संबंधित शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मावेजा मिळावा यासाठी हा रस्ता बंद केला होता. त्यामुळे या मुगट रेल्वे स्टेशन रस्त्या वरून जाणाऱ्या धनज, खांबाळा, निवघा, सरेगाव  जवळील शेतकरी यांना खूप मोठ्या प्रमाणात हा रस्ता बंद झाल्यामुळे गैरसोय होत होती.निवघा ते नांदेड हि बससेवा सूध्दा बंद होती.रात्रीला मुगट येथे मुक्कामी बस थांबली जात होती. त्यामुळे या शेतकऱ्याने रस्ता बंद केल्याच्या अनेक गावकऱ्यांनी , लोकांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. 

या रस्त्यासाठी आपल्याला योग्य मावेजा मिळावा म्हणून या शेतकऱ्याने न्यायालयात धाव घेतली आहे. या रस्त्या संबंधित प्रकरण हायकोर्टात चालू आहे.

 दिनांक १८ रोजी मुदखेड पोलीस , महसूल विभाग मुदखेड यांनी आपला फौजफाटा घेऊन पोलीस बंदोबस्तात  हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात चालू केला आहे. त्यामुळे जवळील शेतकरी व इतर गावातील प्रवाशांना तात्पुरत्या स्वरूपाचा का होईना दिलासा मिळाला आहे. यावेळी तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार नागमवाड, पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, उपनिरीक्षक भाले, मंडळ अधिकारी बालाजी कुराडे, तलाठी देशपांडे, बीट जमादार शिंदे, पोलीस पाटील भगवान हाटकर सह इतर पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या विना अनुदानित शिक्षकांच्या जीवनाची दीपावली ऐवजी होळी करणाऱ्यांना आमदारांना जागा दाखवा---प्रा.कैलाश खानसोळे

 पदवीधर आमदारांना त्यांची जागा दाखवा---प्रा.कैलाश खानसोळे

            संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्यातील सुमारे ८० हजार शिक्षक हक्काच्या पगारासाठी लढताना आयुष्याची राख रांगोळी करून घेत अनेक शिक्षकांनी स्वतःच्या जीवनयात्रा संपवून घेतल्या तरी राज्यातील शासन , शिक्षक आणि पदवीधर आमदारांनी या शिक्षकांना दिवाळी गोड करू हे  केवळ आश्वासन देऊन विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर  शिक्षकांच्या जीवनाची दिवाळी ऐवजी होळी केली आहे असे मत प्रा.कैलाश खानसोळे व्यक्त केले आहे.

   १३ सप्टेंबर २०१९ चा शासन निर्णय १एप्रिल २०१९ पासून पगार देणे हा असताना, मार्च २० च्या आर्थिक अधिवेशनात १०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करूनही ,१४ऑक्टोबर२० च्या कॅबिनेट मध्ये १ नोव्हेंबर पासून २०%,४०%अनुदान देण्याची घोषणा केली पण शासन आदेश काढण्यासाठी आचारसंहिता हे कारण सांगून शिक्षक ,पदवीधर हिताचा निर्णय घेण्यास निवडणूक आयोग मान्यता देत नाही म्हणून शिक्षक आणि पदवीधर आमदार शिक्षकांची दिशाभूल करीत आहेत.

  शासन एस टी कामगारांना १००कोटी रुपयांची तरतूद करू शकते,विद्यूत कामगारांना निधीं देऊन शकते आणि अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीचा शासन आदेश निघू शकतो यावेळी आचारसंहिता आडवी येत नाही का?

का ?

हे पदवीधर मतदार नाहीत का?

 यासाठी जागो मतदार जागो!!!

  होऊ घातलेल्या पदवीधर मतदार संघात विद्यमान आमदारांना जागा दाखवा !!

 गेली पाच वर्षे युतीच्या शासनाने आणि आता महाआघाडी सरकारने शिक्षकांच्या आयुष्यातील २०वर्षे वाय घातली यासाठी  पदवीधर वा शिक्षक आमदारांनी सुद्धा आपली खुर्ची टिकून राहण्यासाठी केवळ शिक्षकांचा उपयोग करून घेतला आज हेच शिक्षक विद्यार्थ्यांच्या शेतात मोल मजुरी करीत आहेत ,काही निराशेने आत्महत्या करीत आहेत तरी याची दया शासनाला व शिक्षक ,पदवीधर आमदारांना आली नाही ...

  हीच ती वेळ परिवर्तनाची, झालेली चूक सुधारुन घेण्याची यासाठी सुजाण पदवीधर मतदान बंधु भागिनींनो विद्यमान आमदारांना त्याची जागा दाखवून विनानुदानित शिक्षकांची ताकद दाखवा...असे आवाहन प्रा.कैलाश खानसोळे यांनी केले आहे.



मुगट प्रा‌.आ. केंद्रात श्री.धन्वंतरी जयंती साजरी

 संपादक आशिष मुगटकर

जयंती :- मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात श्री.धन्वंतरी देवता जयंती साजरी करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, डॉ.आश्ल़ेषा जाधव, डॉ.बेंदगुंडे व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

मुगट/ प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने श्री. धन्वंतरी देवता जयंती साजरी करण्यात आली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर यांनी श्री. धन्वंतरी देवता यांच्या प्रतिमेचे  पूजन व पुष्पहार अर्पण केला.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना श्री. धन्वंतरी देवता विषयी माहिती व महत्व यावेळी सांगण्यात आले. आपले आरोग्य आपले आरोग्य चांगली राहण्यासाठी नियमित योगासने, प्राणायाम करावेत नित्य जीवनामध्ये वनस्पतीचे किती महत्त्व आहे याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर यांनी केले.

या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्ल़ेषा जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. बेंदगुंडे,श्री. हंबर्डे, श्री रणवीरकर, श्री‌. कराड, मो.खैसर, श्री. मुक्कावार, श्री. शिंदे, श्री. बकवाड, श्रीमती गाडेकर, श्रीमती कुरुडे, नंदे,धनुरे सह आदी आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

दरोडेखोरांना पकडण्यास मुदखेड पोलिसांना यश : दोघांना अटक मोरक्या मात्र फरार

 मुदखेड शहरातील सराफा व्यापाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याच्या प्रकरणांतील


मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

 मुदखेड शहरातील सराफ व्यापारी राघवेंद्र पपितवार वय ३५ हे यांच्या नोकरा सोबत रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करून जात असताना त्यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवत यांचे बॅग व पैसे लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यात मुदखेड पोलिसांना यश मिळाले असल्याने दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती  पोलीस निरीक्षक सूनील निकाळजे यांनी यावेळी दिली आहे.

याप्रकरणी फिर्यादी राघवेंद्र पपितवार यांनी दुकान बंद करत असताना स्वतः पपितवार आणि त्यांचा नोकर शुभम चंद्रे हे दोघेजण सेटर लावत असताना त्याठिकाणी स्प्लेंडर मोटर सायकल वरती तिघे जन आले आणि चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत त्यांची बॅग आणि रोख रक्कम साहित्य,पळविण्याच्या प्रयत्न केला होता परंतु फिर्यादीने आरडाओरडा व प्रतिकार केल्याने ते तिघे जन मोटरसायकल ने पळून गेले या प्रकरणी मुदखेड पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुदखेड पोलिसांनी पराकाष्टा केली असून अवघ्या काही दिवसातच आरोपीं हल्लेखोर दरोडेखोरांना पकडण्यात यश मिळवले आहे या प्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत, पोलीस अधिक्षक निसार तांबोळी,अप्पर पोलीस अधिकारी प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब देशमुख,यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरक्षर सुनील निकाळजे, से.पो.नी.भाले,पो.हे.का.किरण तेलंगे, केशव पांचाळ, चंद्रशेखर मुंडे, विजय आलेवार, रवि लोहाळे,बालाजी कदम,मकसूद, या पोलीस कर्मचारी पथकाकडून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सुचने नुसार तपास करत असताना दिनांक ६/ ११/२०रोजी दोन संशयित इसमाची नावे १) हनमान कोंडीबा पल्लेवाड वय २३वर्षे, राहणार सन्मित्र कॉलनी मुदखेड २) विश्वजित दिगंबर गिरी वय २० वर्ष राहणार बापूसाहेब नगर मुदखेड तालुका मुदखेड यांना ताब्यात घेऊन तपासले असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे गुन्ह्यात वापरलेले रिवाल्वर, चाकू व मोटर सायकल इतर साथीदाराकडे आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

यावरून आरोपींना न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडी पाच दीवस रिमांड घेऊन आरोपीच्या साथीदाराचा शोध घेणे चालू आहे नमूद गुन्हा कट रचून करण्यात आलेला आहे कट प्रमुख यांचे नाव निष्पन्न झाले असून त्यांना लवकरच छडा लावून ताब्यात घेऊन मुदखेड शहरातील अशाप्रकारे घडलेल्या घटनेचा शोध लावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे तर सोबतचा साथीदार फरार मोरक्या ला तपास मोहीम गतीने राबवत लवकरच ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी यावेळी सांगितले आहे.

वासरी येथे ऊस+हरभरा आंतरपिकावरील शेतीशाळा संपन्न

 ऊस विकास कार्यक्रमांतर्गत आंतरपिकावरील शेतीशाळा .

बीज प्रक्रिया :-  वासरी येथे ऊस विकास कार्यक्रमाअंतर्गत ऊस+ हरभरा या आंतर पिकावर  बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षित  पाहताना शेतकरी मित्र, प्रशिक्षक, शेतकरी यावेळी उपस्थित होते

मुगट / प्रतिनिधी

दि.५.रोजी मुदखेड तालुक्यातील वासरी येथे ऊस विकास कार्यक्रमांतर्गत ऊस + हरभरा आंतरपीकाच्या शेतकरी शेतीशाळेस सुरूवात करण्यात आली.

आजच्या शेती शाळेमध्ये शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. शेतीशाळा प्रशिक्षक  राम कपाटे यांनी 'ऊस विकास कार्यक्रम' योजनेची आणि शेतीशाळा आयोजित करण्यामागे असलेले उद्देश याविषयी माहिती दिली. ऊस पिकामध्ये हरभरा आंतरपीक लागवडीचे महत्व सांगून लागवड करण्याची पद्धती  तसेच लागवडीपूर्वी हरभरा बियाणे बीजप्रक्रियाचे फायदे सांगितले. कृषी मित्र विठ्ठल लष्करे यांनी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानंतर निवड केलेल्या शेतकऱ्यांना हरभरा बियाणे व जिवाणू संघ चे वाटप करण्यात आले. शेतीशाळा यशस्वीतेसाठी कृषी मित्र विठ्ठल लष्करे यांनी मेहनत घेतली. या शेतीशाळेस गंगाधर मुतकलवाड, चक्रधर खानसोळे, उकाजी येडे, माधव मुतकलवाड, गणेश उमाटे, बापूजी उमाटे, माधव उमाटे, दत्ता खानसोळे व गावातील शेतकरी उपस्थित होते.

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांचा बारड नगरीत सन्मान

 पोलिस निरीक्षक बदलीनंतर दिला ग्रामस्थांनी निरोप !



बारड/ प्रतिनिधी

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांच बारड नगरीमध्ये सन्मान करण्यात आला असून अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निरोप देऊन सन्मान केला आहे. 

यावेळी  कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पदोन्नत पोलीस उपनिरीक्षक सावंत, पोलीस कर्मचारी दिनेश लोलगे,गजानन डूकरे,यांची बारड पोलीस ठाण्यातुन बद्दली झाली आहे परंतु त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मग तो कोरोना संकटकाळ असो ईतर कर्तव्यही जबाबदारीने पार पाडले असल्याने हे त्यांच्या कार्य शैलीतून  अधिकारी लवकरच जनप्रिय झाले होते त्यांचा गौरव यावेळी पोलीस ठाणे बारड येथे  नागरिकांकडून करण्यात आला आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारड उपसरपंच बाळासाहेब देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्यामराव टेकाळे, संचालक व्यंकटराव कल्याणकर, काँग्रेस करसल्लागार उत्तमराव लोमटे,माजी उपसरपंच प्रताप देशमुख, गोपाळ देशमुख,भाजप विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, दींगाबर टीप्परसे, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग आठवले, पत्रकार नामदेव बिचेवार,संदीप पवार, पत्रकार पिराजी गाडेकर,सुभाष धबधबे, पो.पा.यशवंतराव लोमटे आदी प्रमुख उपस्थितीत होते. 

यावेळी कोरोना योद्धा म्हणून नरबाची संभाजी पवार सेवाभावी संस्थेकडून या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले आहे. बारड युवा मित्र मंडळाकडून यांचा सन्मान करण्यात आला आहे, नवमीलाद मुस्लिम युवा मित्र मंडळ यांच्याकडून कर्तव्यदक्ष अधिकारी यांचा गौरव करण्यात आला आहे.पोलीस पाटील संघटनेकडून निरोप देण्यात आला आहे

यावेळी सरेगाव सरपंच जीवनराव कळणे, दीगांबर यरमाड, व्ही.के.वाघमारे,सरपंच मल्लारि बल्लोड, सरपंच शंकर मुंगल,निवघा सरपंच मारोतराव पवार,पोलीस कर्मचारी अजर ईनामदार,रियाज, पवार,किडे,कदम,कारजंकर,वानोळे,भुरे,मोरे,आदीसह पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ उपस्थितीत होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पवार तर आभार पोलीस जमादार रियाज यांनी मानले.

चिकाळा गावास दत्तक बँक ठरऊन द्या- प्रवीण गायकवाड

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी 

 मुदखेड तालुक्यातील चिकाळा हे गाव पिकं कर्जासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ताराशिंग मार्केट नांदेड या बँकेकडे या पूर्वी दत्तक होती.देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज माफी योजना व उद्धव ठाकरे यांची महात्मा फुले कर्ज माफी योजना जाहिर झाल्या पासुन सदर गाव मुदखेड तालुक्यातिल महसुली क्षेत्रात येणाऱ्या बँकेस जोडण्याची प्रक्रिया लिड बँक व्यवस्थापकानी जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत पुर्ण केली आसून,लिड बँक व्यवस्थापक यांनी दिलेली जबाबदारी स्विकारण्यास बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड यांनी असमर्थता दर्शविली आहे.यामुळे लिड बँक व्यवस्थापकांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मुदखेड यांच्याकडे चिकाळा दत्तक दिल्याचे ऐकिव आहे पण अद्याप पर्यंत महाराष्ट्र बँक व्यवस्थापकाणा लेखी पत्र प्राप्त झाले नाही.परिणामी चिकाळा येथिल शेतकरी आसमानी संकटा बरोबरच प्रशासन आणि बँकेच्या सुलतानी संकटात सापडला आहे.या संकटातून मौजे चिकाळा येथिल शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी प्रशासनाने जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी चिकाळा या गावासाठी दत्तक बँक निश्चीत करण्याची मागणी भाजपा मराठवाडा प्रभारी(दि.वि.आ.) प्रवीण गायकवाड ,कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबुराव देशमुख इंगोले,भाजपा शक्ती प्रमुख दिगांबर देशमुख,सोपानराव देशमुख,बालाजी देशमुख,रावसाहेब देशमुख,बळी बळवंते,भगवान रामराव देशमुख,संजय नागोराव इंगोले,अशोक इंगोले,आंनदा झुंबाड अदिनी केले आहे.

व्यापाऱ्यावरील हल्ला प्रकरणातील दरोडेखोरांना अटक करा!

 मुदखेड शहर व्यापाऱ्यांचे तहसिलदार यांना निवेदन.

निवेदन :- मुदखेड तहसीलदार दिनेश झांपले यांना लेखी निवेदन देताना मुदखेड येथील व्यापारी 


मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

              मुदखेड येथील सराफा व्यापारी राघवेंद्र पवार यांच्यावरील झालेल्या दरोडेखोरांचा हल्ला प्रकरणी आज शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला यानंतर हल्लेखोरांना तात्काळ अटक करून व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मागणीसाठी व्यापार यांच्या वतीने मुदखेड चे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

मुदखेड शहरात ता.३१ रोजी सायंकाळी ७: ४५ वा. म्हणजेच व्यापार पेठ गजबजलेली असताना अज्ञात दरोडेखोरांनी प्रसाद ज्वेलर्सचे सराफा व्यापारी राघवेंद्र पवितवार यांनी आपले सराफी दुकान बंद करून त्याच इमारतीत वरच्या मजल्यावरती असलेल्या घराकडे जात असताना दुकानाच्या ओट्यावरतिच अचानक दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला करून त्यांच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिन्याची व रोख रकमेची असलेली बॅग पळवण्याचा प्रयत्न केला यादरम्यान सराफा व्यापारी राघवेंद्र पवितवार यांनी त्या दरोडेखोरांशी हिमतीने झुंज दिली यामध्ये हे दरोडेखोर ऐवज लंपास करण्यात अयशस्वी झाले परंतु या दरोडेखोरांनी राघवेंद्र पवितवार यांना जीवे मारण्याच्या हेतूने गावठी पिस्तूल कट्टा काढून गोळी झाडण्याचा प्रयत्न करत असताना त्या गावठी पिस्तूलातील काडतूस जमिनीवरती पडले त्यामुळे पिस्तुलातून गोळ्या झाडता आल्या नाहीत सुदैवाने सराफा व्यापारी राघवेंद्र पवितवार हे बालबाल बचावले हा प्रकार चालू असताना समोरच्याच युवा व्यापारी गजानन पडोळे यांनी धाव घेतली असतात हे दरोडेखोर पसार झाले.

मुदखेड शहरामध्ये हे मागील पन्नास वर्षाच्या कालावधीत आज पर्यंत व्यापार्‍यावर हल्ला होण्याचे किंवा व्यापार पेठेत दरोडा घालून लूटमार करण्याचे प्रयत्न कधीही झाले नव्हते आज गुन्हेगारांची मुदखेड शहरात मोठी हिम्मत वाढलेली दिसत आहे. मुदखेड शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो या बाजारपेठ मध्ये लोकांचे मोबाईल लंपास केले जातात तर कोणाचे पाकीट मारले जाते, मुदखेड शहरामध्ये मागील काही दिवसापासून दुचाकी  चोरांचेही प्रमाण वाढले आहे.  घरफोड्यांचे हे प्रमाण वाढलेले आहे.  म्हणजेच मुदखेड शहरामध्ये हे गुन्हेगारांचे वास्तव्य वाढल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. व्यापाऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा देऊन आमचे गुन्हेगारांना पासून संरक्षण करावे.

मुदखेड शहराच्या व्यापार पेठेमध्ये हे आम्ही व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला पोलीस चौकी उभारून दिलेली आहे या ठिकाणी सुरक्षेसाठी पोलीस शिपाई देऊन चौकी चालु करावी आमचा पोलीस प्रशासनावर संपूर्ण विश्वास असून पोलीस प्रशासनाने मुदखेड च्या बाजारपेठेत दुपारी बारा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत पोलीस जवानांची गस्त वाढून आम्हाला सुरक्षा द्यावी व राघवेंद्र पवितवार यांच्यावरती भ्याड हल्ला केलेल्या या अज्ञात दरोडेखोरांचा छडा लावून त्या दरोडेखोरांना जेरबंद करावे जेणेकरून कडक शासन करावे यापुढे बाजारपेठेतील तील व्यापाऱ्यांवरती असे जीवघेणे हल्ले होणार नाहीत व आम्ही सर्व व्यापारी सुरक्षित राहू अशी मागणी एका निवेदना द्वारे करण्यात आली. आम्हा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमच्या भावना लक्षात घेऊन दरोडेखोरांना पकडून शासन करावे बाजारपेठे पोलीस गस्त वाढवून किंवा पोलीस चौकी चालू करून व्यापार पेठेत असलेल्या व्यापाऱ्यांना व व नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनाच्या प्रति जिल्हाधीकारी नांदेड, जिल्हा पोलिस अधिक्षक नांदेड, पालकमंत्री आशोकराव चव्हाण, पोलिस निरिक्षक मुदखेड यांना देण्यात आल्या.

या वेळी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ गणपती मंदिर पासुन पायी तहसिल कार्यालयात जाऊन नायब तहसिलदार जोगदंड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक गंगाधर डांगे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करुन घटनेचा निषेध व्यक्त केला.

तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर बाजार समितीचे संचालक संदिप पाटील गाढे, गटनेते माधव कदम, शंकर राठी, ओम सोनी, प्रविण काचावार, कालिदास जंगीगीलवाड, सदाशिव शहाणे, सुरेश शहाणे, सराफा व्यापारी मुकेश मामीडवार, गजानन कदम,गिरिष कोत्तावार, किशोर पारवेकर, सचिन चंद्रे, राजु आप्पा रायपत्रेवार, संतोष कालानी, ईलियास पठाण, मनिष चक्करवार, गोविंद गोपनपल्ले, पुरुषोत्तम चांडक, निळकंठ पडोळे, ईश्वर पिन्नलवार, इशान चक्करवार, अमोल आडकीणे, रवि शहाणे, संजय गाळगे, पत्रकार शेख जब्बार यांचे सह मुदखेड शहरातील व्यापारी मोठया संख्येने उपस्थीत होते.

नांदेड मराठा समुहाची तालूकास्तरीय पहिली आढावा बैठक संपन्न

 नांदेड मराठा समुहाचा पंचसूत्री कार्यक्रम ;

 'मराठा हिताय, मराठा सुखाय'साठी प्रयत्नशील.



नांदेड जिल्हा/ प्रतिनिधी

दि. १ नोव्हेंबर रोजी हदगाव तालुक्यातील मानवाडी येथील हनुमान मंदिरात नांदेड मराठा समुहाची तालुका स्तरीय पहिली बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली.

शिक्षण, व्यवसाय, नौकरी, शेती आणि तातडीची मदत या पंचसूत्रीच्या माध्यमातून अल्पावधीतच सोशिअल मिडियावर लोकप्रिय झालेल्या 'नांदेड मराठा समुह' या फेसबुक ग्रुपची पहिली आढावा बैठक हदगाव तालुक्यात आयोजित केली होती. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बाळासाहेब देशमुख यांनी केले. श्री कुनाल हंगरगे यांनी समुहाची ध्येय धोरणे समजावून सांगितले. श्री अविनाश गाढे, श्री शिवाजीराव किरकण, श्री अमोल नलावडे, श्री विजय ताठे यांनी समुहाच्या निर्विवाद वाटचालीची माहिती दिली. बैठकीच्या समरोपीय भाषणात समुहाचे मुख्य प्रबंधक श्री संतोष शिंदे पाटील यांनी भविष्यातील समुहाच्या वाटचालीची रुपरेषा मांडली. 

बैठकीत डॉ. श्री लक्ष्मीकांत ठाकरे, राजकुमार भुसारे, दत्तराम माकने, श्री कदम सर, श्री दुधाटे सर, श्री पवार सर ईत्यादींनी मते मांडली. श्री कपील नरवाडे पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित झालेल्या बैठकीत, कोरोना नियमांचे काटेकोर पालन करुन, मानवाडीच्या हनुमान मंदिरात समुहाच्या शेकडो सदस्यांनी समाजाच्या उत्थानासाठी राजकीय जोखड बाजूला सारुन, 'मराठा हिताय, मराठा सुखाय' या कार्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी भुमिका घेतली. सदस्यांचा उत्साह पाहून यानंतरच्या तालूकास्तरीय बैठकीचे आयोजन लवकरच होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.या तालुका स्तरीय बैठकीसाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे उपस्थित राहणाऱ्या मराठा बांधवांचे आभार श्री गोविंद दुगावे यांनी केले.

लोकप्रिय बातम्या