![]() |
| जयंती :- मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात श्री.धन्वंतरी देवता जयंती साजरी करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, डॉ.आश्ल़ेषा जाधव, डॉ.बेंदगुंडे व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. |
मुगट/ प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने श्री. धन्वंतरी देवता जयंती साजरी करण्यात आली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर यांनी श्री. धन्वंतरी देवता यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण केला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना श्री. धन्वंतरी देवता विषयी माहिती व महत्व यावेळी सांगण्यात आले. आपले आरोग्य आपले आरोग्य चांगली राहण्यासाठी नियमित योगासने, प्राणायाम करावेत नित्य जीवनामध्ये वनस्पतीचे किती महत्त्व आहे याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर यांनी केले.
या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्ल़ेषा जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. बेंदगुंडे,श्री. हंबर्डे, श्री रणवीरकर, श्री. कराड, मो.खैसर, श्री. मुक्कावार, श्री. शिंदे, श्री. बकवाड, श्रीमती गाडेकर, श्रीमती कुरुडे, नंदे,धनुरे सह आदी आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा