मुगट येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात

 संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहार

मुगट येथील हनुमान मंदिरा मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.दि.२१पासुन या सप्ताहाला सुरुवात झाली आसुन शेवट दि.२८रोजी महा काकड आरतीने होनार आहे.

या सप्ताहात सकाळी भावमुक्तावली,काकडा भजन, गाथा भजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, रात्री विष्णू सहस्त्रनाम रामरक्षा व आरती ,हरिकिर्तन हे दैनंदिन होणार आहेत.यात सात दिवसांत हरिकिर्तना मध्ये रामायणाचार्य बालाजी महाराज पुणेगावकर,युवा किर्तनकार अरविंद सोनखेडकर, सुधाकर खैरगावकर, विनोदाचार्य बाबू महाराज कुदळेकर, रामायणाचार्य अशोक तळणीकर, भागवताचार्य चैतन्य बापू कागदे, विनोदाचार्य काशिनाथ फुलकळसकर, काल्याचे किर्तन नरसिंग केरुरकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

दि.२८रोजी सकाळी ६वाजता महाकाकड आरती, सकाळी संगीत भजनांचे आयोजन,दुपारी १२ते २ वाजता काल्याचे किर्तन,नगरप्रदक्षिणा व दहीहंडी  होणार आहे. दुपारी ३ वाजता महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

भक्तांनी या महाकाकड आरती, महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मुगट ग्रामवासीयांनी यांनी केले आहे.

"सैनिक हो तुमच्यासाठी " हा कार्यक्रम मुदखेड तहसील मध्ये संपन्न

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्य शासनाने महसूल दिना निमित्त आजी व माजी सैनिका तथा शहीद कुटूंबातील विर पत्नी विर माता यांच्या साठी विशेष योजना चालू केली आहे.

 "सैनिक हो तुमच्या साठी" या योजने अंतर्गत सेवार्थ सैनिक सेवानिवृत्त सैनिक यांचा महसूल विभागातील व तालुका स्थरीय शासकीय कार्यालयातील अडी - अडचणी दूर करण्या साठी व सैनिका साठी शासन स्तरावरील ज्या योजना आहेत त्याची माहिती देण्यासाठी व सैनिकांना सेवानिवृत्तीनंतर कसल्याही प्रकारचे महसूल विभागा अंतर्गत व तालुकास्तरीय इतर शासकीय विभागा अंतर्गत कामे लवकरात लवकर होण्यासाठी वरील योजना चालू केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून मुदखेड तहसील कार्यालया मध्ये तालुका दंडअधिकारी तथा तहसीलदार मुदखेड यांच्या मार्फत सैनिका साठी असणाऱ्या योजना त्यात येणाऱ्या अडचणी इतर शासकीय कार्यालयाच्या कसल्याही प्रकारची सैनिकांना अडचण असल्यास त्याचा निपटारा करण्या साठी आज "सैनिक हो तुमच्या साठी " या कार्यक्रमा च्या माध्यमातून सैनिकांची मुदखेड तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिकांची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे ज्येष्ठ माजी सैनिक प्रभू घोंगडे सैनिक फेडरेशनचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत तेलंगे माजी सैनिक राजाराम हळदे, देवराव चौदंते, सुनील चौदंते, माधव पवार, बालाजी गव्हाणे, चँद साहेब, विकास बलफेवाड, शशिकांत मोडवान,साईनाथ राठोड, देविदास पवार, शेख फारूक, मारुती गुंठे ,विद्याधर तहकीक ,संजय चव्हाण इत्यादी माजी सैनिक वरील कार्यक्रमास उपस्थित होते.

 उपस्थित सर्व सैनिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात 1)सैनिकांच्या निवासस्थाना साठी मुदखेड शहर लगत जागा उपलब्ध करून देणे 2)अमर जवान स्मारका साठी जागा उपल्बध करून देणे 3)तहसील ऑफिस मुदखेड यांचा मार्फत महिन्यातून एक दिवस सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी राखीव ठेवणे.अशा प्रकारचे वरील निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या मार्फत तहसीलदार तहसील कार्यालय मुदखेड येथे देण्यात आले.

वरील कार्यक्रमास नायब तहसीलदार श्री जगताप साहेब मंडळ अधिकारी श्री हयून पठाण साहेब मुदखेड तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते सर्व सैनिकांच्या वतीने सर्वप्रथम नायब तहसीलदार श्री जगताप साहेब यांचा सत्कार करण्यात आला महसूल दिना निमित्त मुदखेड शहराचे मंडळ अधिकारी श्री हयुन पठाण साहेब यांना उत्कृष्ट मंडळ अधिकाऱ्याचा पुरस्कार मिळाल्या बाबत त्यांचाही सर्व सैनिक बांधव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. 

हा कार्यक्रम मंडळ अधीकारी तथा पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा मुदखेड शहराचे मंडळ अधिकारी श्री हयून पठाण साहेब यांच्या मार्गदर्शना खाली महसुल विभागाने घेतला आहे !

लोकप्रिय बातम्या