कोरोनाच्या सावटामुळे रंगहीन रॅली,काही लोक रॅलीत सामील झाले.
मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद
इस्लामी महिन्यांचा तिसरा महिना रब्बी अवलचा 12 वा दिवस, शांततेचे प्रतिक, मानवतेचा मशीहा आणि जगातील बंधुभाव आणि इस्लामचे प्रेषित मोहम्मद साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त जगासह संपूर्ण देश आनंदात साजरा केला जातो. परंतु जगात आणि देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना साथीचा रोग पसरल्यमुळे शहरात ईद-ए-मिलादुनबी उत्सवात रंगहीन असा वातावरण पहावयास मिळाले.
दरवर्षी शहरातील विविध कार्यक्रम ईद-ए-मिलादुन्बी उत्सव समितीद्वारे आयोजित केले जातात, परंतु शहरात या वर्षी शहरातील रब्बी अवल महिना १ ते १२ राब्बी अवल म्हणजेच आजपर्यंत शहरातील इस्लामपुरा भागातील खत्मे कुरान ( पठण), व जिर्क्र. इस्लामपुरा मशिदीचे उपाध्यक्ष जिया इद्रिस यांनी सांगितल के १२ सलग बारा दिवस लहान मुलानी कुरानाचा पठन मध्ये सहभाग न नोंदविला आणी प्रत्येक दिवशी समाजातील विविध लोकांनी जेवनाची व्यवस्था केली गेल की शहरात आज ही रॅली रद्द करण्यात आली, प्रेषित मोहम्मद साहेबांच्या अभिमानाने झालेल्या या रॅलीत इस्लामपूर मशिदीचे धार्मिक गुरु यांच्यासह काही लोकांचा समावेश होता. म्हणजेच अलीम साहब इम्रान रझा, माजी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक करीम खान साब, इम्रान मछीवाले, अध्यक्ष मोहम्मद अहमद सरवर्सब, मोहम्मद अजीज, युसुफ भाई खजसाब, इत्यादी काही मुले या रॅली रेल्वे स्थानकाच्या मदीना नगर, मिलत्त नगर, रेल्वे गेट, ईदगाह समोरुन होत गुजरी मार्ग इस्लामपूरा मशीद ला पहुचली तदनंतर धार्मिक गुरु अलीम इम्रान रझा यांनी प्रेषीत मोहम्मद साहेबांच्या जीवनावर भर टाकला व मुलांनी नाते कलीम वाचली
दरवर्षी प्रमाणे, मोहम्मद साहेबांच्या जन्म दिना वर लहान मुलांत आणी मोठ्या माणसात जास्त आंनद दिसला नसला तरी रॅली शांतपणे आपल्या नियोजीत स्थळी पोहचली पोलीस निरिक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शन मध्ये पोलिस बंदोबस्त चोख होता .



































