![]() |
| मार्गदर्शन शिबिर :- मुदखेड तालुक्यातील वासरी या गावात कृषी विभाग आत्मा व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गट वासरी यांच्यातर्फे गट क्षमता बांधणी व पशु आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. |
मुदखेड/ तालुकाप्रतिनिधी
दि.०२ मुदखेड तालुक्यातील वासरी गावात कृषी विभाग आत्मा व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गट वासरी यांच्यातर्फे गट क्षमता बांधणी व पशु आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
गावातील नागरिक शंकर मुतकलवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात गट क्षमता बांधणी या विषयी तालुका तंत्र व्यवस्थापक मुदखेड श्री व्ही बी गीते तर पशु आरोग्य या विषयी डॉ. कांबळे साहेब पशू विकास अधिकारी पं. स. मुदखेड यांनी मार्गदर्शन केले
कृषी सहाय्यक तथा पेस्ट स्काऊट राम कपाटे यांनी सोयाबीन बीजोत्पादन व साठवण, कीटकनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी, केळीवरील CMV व BBTV रोग, आणि कृषी विभागाच्या विविध योजना तर मन्मथ गवळी यांनी रब्बी हंगाम पूर्वतयारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषी मित्र विठ्ठल लष्करे यांच्याकडून शेतकऱ्यांना जनावरासाठी पशुखाद्य व कॅल्शियम चे वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमात शेतकरी गटांना खतावणी रजिस्टर चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मं. कृ. अ.वाघमारे साहेब , डॉ.चौधरी , शिवानंद खानसोळे सरपंच वासरी , पिंटू पाटील, कृषी मित्र साईनाथ पवार , श्रीराम येडे, गुलाब उमाटे, दिपक कांजाळकर , नरहरी खानसोळे, नरहरी कांजाळकर , दत्ता खानसोळे, साईनाथ उमाटे , दादाराव येडे व गावातील शेतकरी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही बी गीते (आत्मा) तर आभारप्रदर्शन विठ्ठल लष्करे यांनी केले.

खुप सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता 🙏🙏
उत्तर द्याहटवा