मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद
उत्तर प्रदेश राज्यातील हाथरास येथे घटलेली घटना ही सभ्य समाजाला आणि देशाला काळीमा फासणारी आहे. येथील तरुणी मनीषा वाल्मीक प्रकरणी मुदखेड वंचित बहुजन महीला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत शहरात कॅन्डल मार्च सायंकाळी आठ वाजता शहरातील लुबीनी विहार येथुन सुभाष गंज मोढा मार्ग रेल्वे गेट व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागी येऊन मेनबती लाऊन मनिषा वाल्मीक ला भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी नगरसेवक अँड. कमलेश चौदंते यांनी आरोपीना फाशी देण्यात यावे अशी मागणी केली तसेच प्रत्येक भारतीय महीलेला संरक्षण करिता शासनाने शस्त्र परवाने देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक चौदंते यांनी केली आहे.
यावेळी संगीता थोरात, दीपक हाटकर, सखुबाई गायकवाड, अनिता माते, पल्लवी चौदंते, आशाबाई चौदंते, गंगासागर चौदंते, शिल्पा चौदंते, वच्छलाबाई हनुमंते, यांच्या सह बाबासाहेब चौधरी, बाबासाहेब चौदंते, शिवानंद देवके, राहुल आपा चौदंते, निखिल चौदंते, विशनु गायकवाड, सुशील कदम, मुन्ना चौदंते, सुरज कोथली, सुरज चौदंते, प्रदिप मांजरे, अर्जुन धोतरे, यांच्या सह आदिंची उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा