एनसीसी कर्नल रंगराव यांची राजर्षी शाहू विद्यालयात नांदेडला भेट.


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी 

 ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेड चे कर्नल रंगराव यांनी राजर्षी शाहू विद्यालयात सदिच्छा भेट दिली या भेटीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटना संबोधीत करताना म्हणाले की छात्र सैनिकांनी एकता आणि अनुशासन जपले पाहिजे आणि एनसीसी युनिफॉर्म हा परिधान करणे प्रत्येक कॅडेटला अभिमान वाटला पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना आणि स्फूर्ती निर्माण होते असे उदगार याप्रसंगी त्यांनी काढले. शाळेचे मुख्याध्यापक बी.एम .हंगरगे यांनी शाल श्रीफळ देऊन कर्नल एम रंगराव साहेबांचा यथोचित सत्कार केला.बटालियन चे गणेश दत्ता व जसबीर कुमार यांनी राष्ट्रीय छत्र सैनिकांना ड्रिल  व नकाशा वाचन यांचे प्रशिक्षण दिले.

याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक डॉ.पांडुरंग यमलवाड प्रा.सुभाष तिकडे व एनसीसी अधिकारी डॉ.माणिक गाडेकर उपस्थित होते.



मुदखेडच्या माजी सैनिकांनी घेतली राहुल गांधी यांची भेट.

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी 

भारत जोडो यात्रेत श्री राहुल गांधी यांची मुदखेड तालुका  माजी सैनिक यांचे शिष्टमंडळाने  भेट घेऊन व सैनिकाच्या अडचणी बाबत श्री राहुल गांधी यांना अवगत करून निवेदन दिले.

 वन रँक वन पेंशन ही योजना मोदी सरकारने फक्त मंजुरी दिली आहे. त्याची अंमलबजावणी मागील इतक्या वर्षात झालेली नाही व देशातील सरकारी कंपनी खाजगीकरणाच्या नावा खाली काही ठरावीक उद्योगपती यांना विकण्याचा केंद्राचा  कुटीला डाव श्री राहुल गांधी यांनी मोडून काढावा असे निवेदन प्रत्यक्ष श्री राहूल गांधी यांना भेटून मुदखेड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे व राजाराम हळदे यांच्या नेतृत्वात मुदखेड तालुक्यातील २२ बाजी सैनिकांचे शिष्टमंडळ राहूल गांधी यांना भेटून निवेदन दिले आहे . 

 भारत जोडो यात्रे मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री डि पी सावंत साहेब व अमदार अमर भाऊ राजुरकर साहेब यांच्या सुचने वरून मुदखेड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा सैनिक फेडरेशन विभाग मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे यांच्या नेतृत्वात मुदखेड शहरातील २२माजी सैनिक व जिल्ह्यातील इतर सैनिक यांना घेऊन राहुल गांधी यांची भेट घेतली.



या प्रसंगी सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे राजाराम हळदे तालुका अध्यक्ष देवराव चोदंते जेष्ठ माजी सैनिक प्रभु घोंगडे, देवीदास पवार,शशिकांत मोडवान, चंद्रकांत तेलंगे,प्रकाश पिन्नलवार,सुनील चोदंते, साहेबराव वने, विकास बल्फेवाड, बालाजी इबितवार, बालाजी गव्हाने, मारोती गुंठे, शेख फारूख ,रामसिंह राठोड, चाँद साहेब, साईनाथ राठोड आदींची उपस्थिती होती.

लहूजी साळवे यांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया रचला ; कॉ.प्रा.सदाशिव भुयारे

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका/ प्रतिनिधी

मुदखेड येथील शासकीय विश्रामगृहात  विविध सामाजिक संघटनाच्या वतीने  क्रांतीगुरू लहूजी राघोजी साळवे यांच्या २२८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात "लहूजी साळवे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान" या विषयावर प्रमुख वक्ते मनून बोलताना सुप्रसिध्द पुरोगामी विचारवंत तथा राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी चे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ.प्रा.सदाशिव भुयारे यांनी  प्रतिपादन केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष पिराजी गाडेकर हे होते तर प्रमुख सूत्रसंचलन मानव हित लोकशाही पक्षाचे आकाश सोनटक्के यांनी केले.

प्रा. सदाशिव भुयारे पुढे बोलताना असे मन्हाले की क्रांतीगुरू लहूजी साळवे यांच्या जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ येथील अतिशय शूर साळवे नाईक परिवारात झाला. लहूजीचे आजोबा थोरले लहूजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सैनिकाला प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना दांडपट्टा कसब थोरले लहूजी यांनी शिकवले होते.लहूजीचे वडील  राघोजी साळवे यांनी एका जिवंत वाघाला पकडुन पेशव्याच्या दरबारात हजर केले होते.१८१७ च्या ब्रिटिश आणि पेशवे यांच्यातील महत्वपूर्ण खडकी च्या लढाईचे नेतृत्व विर राघोजी साळवे यांनी केले होते. दुसरा बाजीरावाच्या पळकुटेपणामुळे  खडकीच्या लढाईत लहुजीचे वडील राघोजी साळवे यांना वीरमरण आले.त्याचवेळी क्रांतीगुरू लहूजी राघोजी साळवे यांनी" जगेन तर देशासाठी व मरेन तर देशासाठी " अशी शपथ घेतली व मी भारतातला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व भारतीय स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर लग्न करणार नाही अशी शपथ घेतली.

 पेशव्याचे २५००० सैन कोरेगाव भिमा येथे दडून बसल्याची खबर ब्रिटिश अधिकारी लॉर्ड एलिफिंस्टन याला लागताच महार बटालियनचे ५०० सैनिक पाठवून लॉर्ड एलिफिस्टन यांनी पेशव्याच्या २५ हजार सैनाच्या खात्मा केला. व दुसरा बाजीराव पळून गेला. सन १८२२ मध्ये ब्रिटिश विरुद्ध सशत्र लढा उभारण्यासाठी क्रांतीगुरू लहूजी साळवे यांनी पुण्यात गंजपेठेत सैन प्रशिक्षण केंद्र तालीम सुरू केली आणि त्यात वासुदेव बळवंत फडके, तात्या टोपे,बाळ गंगाधर टिळक,क्रांतीबा ज्योतिराव फुले सह शेकडो शसस्त्र क्रांतिकारकांना प्रशिक्षण देऊन भारतीय स्वातंत्र्याच्या लढाई यशस्वी केली मनून लहूजी साळवे यांना भारतीय स्वातंत्र्या लढ्याचा पाया रचला असे संबोधले जाते.

 याशिवाय क्रांती बा ज्योतिराव फुले व क्रांतीआई सावित्रीआई फुले यांनी सण १८४८ मध्ये पुणे येथे देशात  सर्व प्रथम सुरू करण्यात आलेल्या मुलीच्या शाळेला संरक्षण दिले मनून भारतात फुले दाम्पत्य यांनी शैक्षणिक व सामाजिक क्रांती घडवून आणली असे प्रतिपादन कॉ.प्रा.सदाशिव भुयारे यांनी केले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश सोनटक्के, पांडुरंग सूर्यवंशी,माणिक कांबळे,इकबाल कुरेशी,सखाराम बोकेफोड,शैलेश बोकफोड, अजय बोकेफोड,माधव रणखांबे,प्रदीप बोकेफोड,ओमकार कंधारे ,सोनू कंधारे,विशाल कंधारे, यशवंत बस्वंते,विनोद कंधारे,कृष्णा गायकवाड, कृष्णा खंडाळे, चंद्रकांत बोकेफोड ,गजानन गवाले,राजू सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले.

नांदेड भव्यदिव्य रोजगार मेळाव्याचे आज आयोजन

संपादक आशिष मुगटकर



 नांदेड जिल्हा /प्रतिनिधी

      दि. १३ नोव्हेंबर २०२२ रविवार रोजी दुपार २ वाजता सारनाथ बौद्ध विहार ,सावित्रीबाई फुले नगर,श्रावस्ती नगर,नांदेड. या ठिकाणी रोजगार मेळावा व कोरोना योध्दा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस यूनियन व शहीद भगतसिंग ब्रिगेड तर्फे नांदेड जिल्ह्यातिल व शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल मधिल नर्सिंग स्टाफ पॅरामेडिकल स्टाफ,लॅब स्टाफ,मेडिकल स्टाफ, वार्ड बॉय,सफाई कर्मचारी व ईतर खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी, आंगनवाडी सेविका, आशा वर्कर्स यांचा भव्य दिव्य नौकरी, रोजगार मेळावा विशेष उपस्थिती समाज कल्याण अधिकारी औलवार सर यांच्या अध्यक्षतेखालील व राज्यध्यक्ष सतीश सर्वगौडे सर,काॅम्रेड अंकुश माचेवाड,अनिल जायेभाय यांच्या मार्गदर्शनाखाली  कोव्हिड योद्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यात नांदेड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील सर्व आदरनीय संपादक व पत्रकार बंधु, सर्व आदर्श नर्सिंग संघटना अध्यक्ष व पदाधिकारी,नर्सिंग ऑफिसर, नर्सिंग चळवळी मध्ये कार्य करणारे ,नर्सिंग स्टाफ,नर्सिंग शिक्षक,प्राचार्य, रूग्ण हक्क परिषद सदस्य, सामान्य जनता ,समाजसेवक या सर्वांनी कार्यक्रमात येण्याचे जाहिर आवाहन करण्यात येत आहे.



लोकप्रिय बातम्या