५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेड चे कर्नल रंगराव यांनी राजर्षी शाहू विद्यालयात सदिच्छा भेट दिली या भेटीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटना संबोधीत करताना म्हणाले की छात्र सैनिकांनी एकता आणि अनुशासन जपले पाहिजे आणि एनसीसी युनिफॉर्म हा परिधान करणे प्रत्येक कॅडेटला अभिमान वाटला पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना आणि स्फूर्ती निर्माण होते असे उदगार याप्रसंगी त्यांनी काढले. शाळेचे मुख्याध्यापक बी.एम .हंगरगे यांनी शाल श्रीफळ देऊन कर्नल एम रंगराव साहेबांचा यथोचित सत्कार केला.बटालियन चे गणेश दत्ता व जसबीर कुमार यांनी राष्ट्रीय छत्र सैनिकांना ड्रिल व नकाशा वाचन यांचे प्रशिक्षण दिले.
याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक डॉ.पांडुरंग यमलवाड प्रा.सुभाष तिकडे व एनसीसी अधिकारी डॉ.माणिक गाडेकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा