पदवीधर आमदारांना त्यांची जागा दाखवा---प्रा.कैलाश खानसोळे
मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील सुमारे ८० हजार शिक्षक हक्काच्या पगारासाठी लढताना आयुष्याची राख रांगोळी करून घेत अनेक शिक्षकांनी स्वतःच्या जीवनयात्रा संपवून घेतल्या तरी राज्यातील शासन , शिक्षक आणि पदवीधर आमदारांनी या शिक्षकांना दिवाळी गोड करू हे केवळ आश्वासन देऊन विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिक्षकांच्या जीवनाची दिवाळी ऐवजी होळी केली आहे असे मत प्रा.कैलाश खानसोळे व्यक्त केले आहे.
१३ सप्टेंबर २०१९ चा शासन निर्णय १एप्रिल २०१९ पासून पगार देणे हा असताना, मार्च २० च्या आर्थिक अधिवेशनात १०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करूनही ,१४ऑक्टोबर२० च्या कॅबिनेट मध्ये १ नोव्हेंबर पासून २०%,४०%अनुदान देण्याची घोषणा केली पण शासन आदेश काढण्यासाठी आचारसंहिता हे कारण सांगून शिक्षक ,पदवीधर हिताचा निर्णय घेण्यास निवडणूक आयोग मान्यता देत नाही म्हणून शिक्षक आणि पदवीधर आमदार शिक्षकांची दिशाभूल करीत आहेत.
शासन एस टी कामगारांना १००कोटी रुपयांची तरतूद करू शकते,विद्यूत कामगारांना निधीं देऊन शकते आणि अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीचा शासन आदेश निघू शकतो यावेळी आचारसंहिता आडवी येत नाही का?
का ?
हे पदवीधर मतदार नाहीत का?
यासाठी जागो मतदार जागो!!!
होऊ घातलेल्या पदवीधर मतदार संघात विद्यमान आमदारांना जागा दाखवा !!
गेली पाच वर्षे युतीच्या शासनाने आणि आता महाआघाडी सरकारने शिक्षकांच्या आयुष्यातील २०वर्षे वाय घातली यासाठी पदवीधर वा शिक्षक आमदारांनी सुद्धा आपली खुर्ची टिकून राहण्यासाठी केवळ शिक्षकांचा उपयोग करून घेतला आज हेच शिक्षक विद्यार्थ्यांच्या शेतात मोल मजुरी करीत आहेत ,काही निराशेने आत्महत्या करीत आहेत तरी याची दया शासनाला व शिक्षक ,पदवीधर आमदारांना आली नाही ...
हीच ती वेळ परिवर्तनाची, झालेली चूक सुधारुन घेण्याची यासाठी सुजाण पदवीधर मतदान बंधु भागिनींनो विद्यमान आमदारांना त्याची जागा दाखवून विनानुदानित शिक्षकांची ताकद दाखवा...असे आवाहन प्रा.कैलाश खानसोळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा