पोलिस फौजफाटा घेऊन घटना स्थळी दाखल
मुगट/प्रतिनिधी
मुगट येथील मुगट ते मुगट रेल्वे स्टेशन रस्ता मागील काही दिवसापासून संबंधित शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मावेजा मिळावा यासाठी हा रस्ता बंद केला होता. त्यामुळे या मुगट रेल्वे स्टेशन रस्त्या वरून जाणाऱ्या धनज, खांबाळा, निवघा, सरेगाव जवळील शेतकरी यांना खूप मोठ्या प्रमाणात हा रस्ता बंद झाल्यामुळे गैरसोय होत होती.निवघा ते नांदेड हि बससेवा सूध्दा बंद होती.रात्रीला मुगट येथे मुक्कामी बस थांबली जात होती. त्यामुळे या शेतकऱ्याने रस्ता बंद केल्याच्या अनेक गावकऱ्यांनी , लोकांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
या रस्त्यासाठी आपल्याला योग्य मावेजा मिळावा म्हणून या शेतकऱ्याने न्यायालयात धाव घेतली आहे. या रस्त्या संबंधित प्रकरण हायकोर्टात चालू आहे.
दिनांक १८ रोजी मुदखेड पोलीस , महसूल विभाग मुदखेड यांनी आपला फौजफाटा घेऊन पोलीस बंदोबस्तात हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात चालू केला आहे. त्यामुळे जवळील शेतकरी व इतर गावातील प्रवाशांना तात्पुरत्या स्वरूपाचा का होईना दिलासा मिळाला आहे. यावेळी तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार नागमवाड, पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, उपनिरीक्षक भाले, मंडळ अधिकारी बालाजी कुराडे, तलाठी देशपांडे, बीट जमादार शिंदे, पोलीस पाटील भगवान हाटकर सह इतर पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा