अर्धा किलो चिकनचे पैसे मागीतल्याच्या कारणावरून एकाच खुन तर एक जन जखमी

 मुदखेड तालुक्यातील मौजे शिकारघाट/आमदुरा येथील घटना

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा/ प्रतिनिधी 

दि.७ रोजी मुदखेड तालुक्यातील मौजे शिकारघाट /आमदुरा येथे अर्धा किलो चिकन खरेदीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाचा खून तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिकारघाट/आमदुरा  येथील फिर्यादी प्रेमसिंग पि. धरमसिंग रामगडिया वय २१ व्यवसाय चिकनशाँप रा. शिकारघाट/ आमदुरा येथे चिकनशाँपचा व्यवसाय करतात आरोपी गुरुमखसिंघ उर्फ पिंट्या भगतसिंग रामगडिया रा.शिकारघाट आमदुरा, व मित्र दिपक रा.चिखलवाडी नांदेड, या दोघांनी संगनमत करुन दि.७ रोजी फिर्यादी प्रेमसिंग रामगडीया यांच्या कडून अर्धा किलो चिकन खरेदी केले त्यानंतर फिर्यादी ने दिलेल्या चिकनचे पैसे मागितले असता त्यांच्याच सोबत वाद करून शिवगाळ करत थापडा बुक्याने मारहाण केली. घडलेल्या घटने बाबत आई गुरुबच्चनकोर यांनी आरोपीस समजून सांगत असतांना आरोपी गुरुमखसिंघ उर्फ पिंट्या,यांने आपल्या जवळ असलेल्या तलवारीने फिर्यादीची आई गुरुबच्चनकोर यांच्या  डाव्या हाताच्या अंगठ्या जवळ तलवारीने वार करून दुखापत केली.

  घडलेल्या घटने बाबतचा जाब मयत धरमसिंग मोहनसिंघ रामगडीया (वय ४७) शिकारघाट/आमदूरा ता.मुदखेड हे विचारन्या करिता आरोपीच्या घराकडे गेले असता आरोपी गुरुमखसिंघ रामगडीया उर्फ पिंट्या,मित्र दिपक यांच्या मदतीने मयत धरमसिंग यांच्या शरीरावर, गळ्यावर इतर ठिकाणी तलवारी ने सपासपवार करुन त्यात जागीच ठार मारले. 

फिर्यादी प्रेमसिंग रामगडीया यांच्या जबाबा वरुन आरोपी गुरुमखसिंघ रामगडीया उर्फ(पिंट्या) , मित्र दिपक  यांच्या विरुद्ध मुदखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

या  प्रकरणाचा पुढील तपास मुदखेडचे पोलीस निरक्षक महेश शर्मा करित आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या