मतदान गेलं कुठं? गावकरीच वैतागले, महाराष्ट्रातील 'या' गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान

 संपादक आशिष मुगटकर

मातृभूमी न्युज नेटवर्क 

राज्यभर ईव्हीएम मशीनवर विरोधक आक्षेप घेत असताना आता मारकडवाडी येथे ३ डिसेंबर रोजी होणार बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याची मागणी मतदारांनी केली आहे. एकाबाजूला राज्यात झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीचे सर्व नेते EVM मशीनवर आक्षेप घेत आहे.

तर दुसरीकडे माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने आता थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे .

माळशिरस तालुक्यातील या गावात आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते. पण यावेळी विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार याना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिले आहे .

बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव

या निवेदनात मौजे मारकडवाडी मधील चाचणी निवडणूक घेण्यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत अशी मागणी केली आहे . यात गावात यावेळी झालेल्या मतदानात उत्तम जानकर याना केवळ ८४३ मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते याना १००३ मते मिळाल्याचे सांगितले आहे . यापूर्वी झालेल्या २००९ , २०१४ , २०१९ या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे ८० टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत . यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा ३ डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला आहे . यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत अशी मागणी करीत संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचे निवेदन तहसीलदार याना देण्यात आले आहे .


या बॅलेट वरील मतदानासाठी गावात फलक लावून मतदानाप्रमाणे सर्व प्रक्रिया घेतली जाणार आहे . यासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापण्यास दिल्या असून गावातील प्रत्येकाने आपण या निवडणुकीत ज्याला मतदान केले त्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे . वास्तविक या निवडणुकीत मोहिते पाटील व उत्तम जानकर हे दोन कट्टर विरोधक एकत्र आल्याने शरद पवार गटाला १ लाखापेक्षा जास्त मताधिक्याची अपेक्षा होती . मात्र निवडणूक निकाल येताच जानकर हे केवळ १३ हजार मताच्या फरकाने शेवटच्या टप्प्यात विजयी झाले. यामुळे महादेव जानकर समर्थकांना मशीनवर विश्वास नसल्याची भावना तयार झाली आहे . यातच राज्यातील सर्व नेते मशीनवर शंका उपस्थित करू लागले.

विरोधक सहकार्य करणार का?

मारकडवाडी हे राज्यातील पहिले गाव असून ज्या गावाने थेट आता बॅलेट वर मतदान घेण्याचे पाऊल उचलले आहे .आता या मतदान प्रक्रियेत विरोधी भाजपचे मतदार सामील होणार का? असा प्रश्न पडला आहे. या मतदानाचा पुढाकार गावातील एका गटाने घेतल्याने दुसरा गट आता काय भूमिका घेणार हेही मतदानादिवशी पाहायला मिळणार आहे . या मतदान प्रक्रियेस शासन स्तरावरून कर्मचारी पुरवणे अशक्य असल्याने ग्रामस्थांनी प्रसिद्धी माध्यमांकडून हि मतदान प्रक्रिया पार पडायची तयारी ठेवली आहे . यासाठी ३ डिसेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच चार नंतर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे . फेरमतदानाची मागणी संपूर्ण गावाने एकमुखी केली असती तर यातून काहीतरी फलित समोर आले असते . मात्र केवळ कमी मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने केलेल्या या प्रयोगास गावातील विरोधी गट सहकार्य करणार का हेही आता दिसणार आहे.

087 नांदेड दक्षिणची निवडणूक तयारी पूर्ण

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनीधी

 दि. 18 रोजी  16 नांदेड लोकसभा पोट निवडणूक व 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आदेश,साहित्य व इतर सर्व बाबींसाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या भव्य प्रांगणात तयारी पूर्ण झाली असून निवडणूक प्रक्रियेतील कार्यासाठी सुसज्ज झाले आहे. 



नांदेड दक्षिण मतदारसंघात एकूण मतदार 31682 असून मतदान केंद्रांची संख्या 312 एवढी आहे. एकूण नियुक्त केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी 1560 चे आदेश तयार करण्यात आले आहेत.  केंद्रांना 34 झोनमध्ये वितरित करण्यात आले आहेत. या झोनचे एकूण 103 रुट निर्माण करुन तेवढ्याच रुट गाईडची नेमणूक करण्यात आली आहे. आदेश वाटपासाठी 10 टेबल तर मतदान यंत्र, व्हिव्हिपँटसह इतर साहित्य वाटपाचे 31 टेबल करण्यात आले आहेत. या मतदान क्षेत्रात 20 मतदान केंद्रे हे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. ज्यामध्ये केंद्र क्रमांक 19,84,88,90,94,98,102,55,124,129,204,223,255,289,49,147,186,233,114,210 यांचा समावेश आहे. 

या प्रत्येक केंद्रासाठी सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन येथे विशाल व भव्य मंडप उभारुन नियंत्रण करण्यात येत आहे.  याशिवाय सर्व मतदान केंद्रावर वीज,पिण्याचे पाणी,यथायोग्य फर्निचर, दिव्यांगासाठी रँम्पसह आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना नाष्टा, जेवण व चहापाण्याची  व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ०८७ नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी  डॉ .सचिन खल्लाळ, तहसीलदार प्रविण पांडे, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलोलु, संजय नागमवाड यांनी दिली आहे. 

या व्यवस्थापनासाठी पेशकार राजकुमार कोटुरवार, प्रशिक्षण कक्षाचे सदस्य संजय भालके, राजेश कुलकर्णी व विजयकुमार चोथवे , बी.एस.पांडे,मकरंद भालेरावसह सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


भोकर महाविकास आघाडीचे उमेदवार तिरुपती कदम (पप्पु पाटिल) कोंढेकर यांच्या मुगट संवाद बैठकीला उस्फूर्त प्रतिसाद

 संपादक आशिष मुगटकर

मुगट वार्ताहार 

दि.१५ रोजी मुगट येथे सायंकाळी महाविकास आघाडीचे भोकर विधानसभेचे व नांदेड लोकसभेचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ  संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तिरुपती कदम(पप्पु पाटील) कोंडेकर यांचे गावात आगमन होताच अतिषबाजी करण्यात आली. गावातील मुख्य रस्त्याने वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. 

मुगट येथे प्रथमच संवाद बैठक ही सभेसारखी दिसून आली. संवाद बैठक स्थानी मोठ्या संख्येने लोक स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते. 


यावेळी मंचावर पराग साहेब (किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष) तिरुपती (पप्पु पाटील) कदम कोंढेंकर, सुमित पाटील चव्हाण, दादाराव पाटील ढगे, पिंटू पाटील वासरीकर, तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते. मुगट काँग्रेस पक्षाच्या, व पप्पू पाटील मित्र मंडळाच्या वतीने उमेदवार तिरुपती कदम (पप्पु पाटील) कोंढेंकर तसेच लोकसभेचे उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण यांचे प्रतिनिधी म्हणून सुमित पाटील चव्हाण यांचा यावेळी शाळ व पुष्कर घालून सत्कार करण्यात आला. उपस्थित मंचावरील सर्व मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला. यावेळी भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या गावातील अनेक युवकांचा पराग साहेब व दादाराव पाटील ढगे यांच्या हस्ते कांग्रेस मध्ये पक्षप्रवेश यावेळी करण्यात आला. सुरुवातीला दादाराव पाटील ढगे, शंकर मुंगल,पराग साहेब यांनी आपले विचार मांडले. तिरुपती कदम (पप्पु पाटील) कोंढेंकर यांनी आपल्या भाषणात ही लढाई धन शक्ती विरुद्ध जनशक्ती असून यात जनशक्तीचाच विजय होणार हे नक्कीच असे ते म्हणाले.स्थानिक ,सर्व सामान्य शेतकरी पुत्राला आमदार करण्याची हाक उपस्थित लोकांना त्यानी घालताच समोरून "पप्पू पाटील कोंडेकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! भोकर चा भावी आमदार पप्पू पाटील कोंडेकर अशा घोषणा या ठिकाणी बसलेल्या नागरिकांतून देण्यात आला. घोषणांनी काही काळ हा परिसर दुमदुमू लागला होता. या संवाद बैठकीला मुगट येथील नागरिक मोठ्या संख्येने तिरुपती (पप्पू पाटील ) कदम कोंढेंकर यांचे भाषण ऐकण्यासाठी स्वयंस्फूर्तीने विशेष उपस्थित होते. अशोक चव्हाण हे भाजपात गेल्यानंतर गावातील हा काँग्रेसचा पहिला व मोठा कार्यक्रम ठरला आहे. त्यामुळे गावातील काँग्रेसचे मनोबल वाढले असून कार्यकर्ते सुद्धा जोमाने कामाला लागलेले दिसून येत आहे. 

 यावेळी गोपीनाथ पा. मुंगल बालाजी पा. कल्याणे, विश्वनाथ पा. कल्याणे,साईनाथ पा. कल्याणे, अनिल पा. कल्याणे, वसंतराव पा. कल्याणे, दादा पाटील कल्याणे, रोहित पा. कल्याणे,राहुल पा.कल्याणे, गजानन पा. पूयड,श्रीकांत पा. मुंगल,कपिल पा. कल्याणे,शामरावपा.कल्याणे,मृर्ताजीपा.मुंगल,गजानदपा.पुयड,ररमेशपा.कल्याणे,ओम पा.कल्याणे,ज्ञानेश्वर पा.कल्याणे आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष पाटील तर आभार प्रदर्शन स्वप्निल हाटकर यांनी केले.(सोबत फोटो पाठवला आहे)

तिरुपती(पप्पू पाटील)कदम कोंडेकर यांच्या संवाद बैठकीला लोकांचा उदंड प्रतिसाद.

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

भोकर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार तिरुपती (पप्पू पाटील) कदम कोंडेकर यांच्या मुगट येथील संवाद बैठकीला शेकडो लोकांनी हजेरी लावल्यामुळे गावातील काँग्रेस विरुद्धकांची हवाच गुल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांच्या या संवाद बैठकीला लोकांचा उदंड असा प्रतिसाद भोकर मतदारसंघात सुद्धा पाहायला मिळत आहे.


तिरुपती (पप्पू पाटील)कदम कोंडेकर यांच्या भोकर विधानसभेत अनेक गावांमध्ये संवाद बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या बैठका जणू काही विजयी मिरवणुकीच्या स्वरूपात ग्रामीण भागातील अनेक गावा-गावात पाहायला मिळत आहेत. यांच्या या संवाद बैठकीला मोठ्या संख्येने लोक स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आसुन.भाजपा विरोधात रोष व्यक्त करत आहेत. त्यांच्या या संवाद बैठकीला लोकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे विरुद्ध विरोधी पक्षांची पायाखालची वाळू सरकली आहे भाजपाला ही जागा सहज जिंकेल अशी आशा होती परंतु महाविकास आघाडीने सर्वसामान्य कुटुंबातील स्थानिक उमेदवार दिल्यामुळे ही लढाई निर्णयक व प्रतिष्टेची होणार आहे. 

नुकतेच कांग्रेस मधुन भाजपात आलेल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला आपल्याच मतदारसंघात बैठका घेण्यासाठी व्यक्तीची जमवाजमव करावी लागत आहे तर कुठे भाड्याने माणसे सभेसाठी आणावी लागत असल्याची चर्चा खेड्यामध्ये ऐकायला मिळत आहे परंतु पक्षनिष्ट, स्थानिक, युवा, शेतकरी पुत्राच्या संवाद बैठकीला लोकांचा मोठा वाढता पाठिंबा पाहून धक्काच विरोधकांना बसत आहे. 

भोकर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार तिरुपती (पप्पू पाटील) कदम कोंडेकर यांना सर्व सामान्य लोकांचा मिळणारा मोठा पाठिंबा पाहून भोकरची घराणेशाही संपणार असल्याची चित्र सध्या भोकर मतदारसंघात दिसत आहे.

'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान

 संपादक आशिष मुगटकर



मातृभूमी न्युज नेटवर्क

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यभरात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा सुरू आहेत. महायुतीने आणलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची' राज्यभर चर्चा सुरू आहे.

या योजनवरुन भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनी काही दिवसापूर्वी वादग्रस्त विधान केले होते. दरम्यान, आता कोल्हापुरातून आणखी एक या संदर्भात बातमी समोर आली आहे. कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी एका सभेत १५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार, असं वादग्रस्त विधान केले आहे.

भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. महायुतीच्या या योजनेची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीतही ही योजना फायद्याची ठरत आहे. तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील एका सभेत वादग्रस्त विधान केले होते. आता पुन्हा एकदा कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

          करवीर पन्हाळा गगनबावडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ गारीवाडे या गावातील जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे विधान केले. महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव म्हणाल्या, १५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार अस वक्तव्यं केलं आहे. या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नातवाच्या प्रचारासाठी आज्जी निवडणुकीच्या मैदानात.

 संपादक आशिष मुगटकर



मातृभूमी न्यूज नेटवर्क 

बारामती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. महाराष्ट्रात सर्वात चर्चेचा कोणता मतदारसंघ असेल तर तो बारामती विधानसभा मतदारसंघ.

बारामतीत येथे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी थेट लढत आहे. पण, ही लढत आता खूपच भावनिक झाली आहे. शरद पवार यांनी पुतणे अजित पवार यांच्या घरातच घुसखोरी केली नाही तर आता नातवाच्या हितासाठी त्यांच्या पत्नी म्हणजे प्रतिभा पवार यांनाही मैदानात उतरवले आहे. शरद पवार यांच्या पत्नी निवडणूक प्रचारात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. बारामतीत अजित पवार आणि युगेंद्र पवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. युगेंद्र हे अजित पवार यांचेच पुतणे आहेत. अशा स्थितीत या जागेवर अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा थेट पणाला लागली आहे. त्यातच प्रतिभा पवारांना मैदानात उतरवल्यामुळे अजित पवारांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

अशा स्थितीत दोन्ही पक्ष जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. खुद्द शरद पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली असून आता त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही नातवासाठी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे. बारामतीत शरद पवारांनी अजित पवारांना खुले आव्हान दिले आहे. अजित पवार यांनी बारामतीच्या कान्हेरी गावात सभा घेऊन ताकद दाखवत उमेदवारी दाखल केली. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनीही प्रचारसभा सुरू केल्या असून शरद पवार हेदेखील त्यांच्यासोबत दिसत आहेत. बारामतीच्या कान्हेरी गावातही शरद पवारांनी नातवासाठी सभा घेतली. पवार कुटुंबाने कान्हेरी गावातून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. आजोबा, काका, काकू, भाऊ, संपूर्ण पवार कुटुंब युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते.

नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनीधी

दि.१२ रोजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील शिस्तबद्धता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण नागार्जुना पब्लिक स्कुल,कौठा, नांदेड येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. 

      आजच्या प्रशिक्षणामध्ये जवळपास ११०० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटकांवर तसेच ईव्हीएम मशीन (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) व वीव्हीपॅटच्या (VVPAT) वापरावर विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी डॉ खल्लाळ यांनी प्रथम क्षेत्रिय अधिकारी यांना  मौलिक सूचना देवून मार्गदर्शन केले. त्यानंतर मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रियेतील संपूर्ण माहिती देणाऱ्या लोकविधान पोर्टलचे महत्त्व विशद करुन या पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षण स्थळी जागोजागी या पोर्टलचा वापर करण्यासाठी बारकोड लावण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षणपीठावर सुप्रिया टवलारे,उपायुक्त मनपा,मनिषा नरसाळे, सहाय्यक आयुक्त मनपा,प्रविण पांडे,तहसीलदार, नितेशकुमार बोलोलु, नायब तहसीलदार, संजय नागमवाड यांची उपस्थिती होती.


    मुख्य प्रशिक्षक संघरत्न सोनसळे यांनी प्रशिक्षण देतांना असे कथन केले की,  मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, पारदर्शकता, मतदारांची ओळख तपासणी, गुप्त मतदान प्रक्रिया, मतपेटी हाताळणी, तसेच ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत  ईव्हीएम आणि वीव्हीपॅटची कार्यप्रणाली स्पष्ट करून कर्मचाऱ्यांना मशीनच्या सुसज्जतेबाबत दक्ष राहण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी मतदान केंद्रांवरील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तंत्रांचा वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन केले.

मतदानाच्या प्रक्रियेत काटेकोर पालन करणे कसे महत्त्वाचे आहे यावर भर दिला. ईव्हीएम मशीनची सुरक्षित हाताळणी, मशीन प्रमाणपत्र तपासणे, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मतपेट्यांचे सुरक्षित हस्तांतरण यासारख्या विषयांवर त्यांनी प्रशिक्षण दिले.  तसेच मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले.

 मतपेटी आणि ईव्हीएमची सुरक्षित हाताळणी, मतमोजणी प्रक्रिया, आणि मतदानाच्या वेळी शक्य असलेल्या तांत्रिक अडचणींवर मार्गदर्शन केले. ईव्हीएम आणि वीव्हीपॅट वापराचे तंत्र आणि त्यातील तांत्रिक बाबींसाठी कर्मचार्‍यांना विशेष निर्देश दिले, ज्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत सुलभता निर्माण होईल. यावेळी काही मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी आपले कथन केल्यामुळे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कोणत्या समस्या निर्माण होतात आणि उपाय कोणते, हे सर्वांना समजले. प्रशिक्षण दरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रियेत येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत प्रश्न विचारले आणि त्यांना तज्ञांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली.

या प्रशिक्षणमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, ते आता आगामी निवडणुकीसाठी अधिक सज्ज झाले आहेत.यानंतर  एकूण  १५ विविध कक्षामध्ये प्रत्येकी ४० जणांस तंत्रज्ञानाचा अचूक वापर करुन प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षण देण्यात आले.  प्रशिक्षण कंटाळवाणे व पाट्या टाकू होवू नये म्हणून आणि प्रशिक्षणार्थांनी सुध्दा सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी या आधुनिक तंत्राचा वापर सदरील प्रशिक्षणात करण्यात आला आहे. ही प्रक्रिया राबविण्यासाठी शाळेचे संचालक केशव गड्डम यांनी आपल्या संपूर्ण तंत्रज्ञ टिमसह तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी भरीव सहकार्य केले आहे. तंत्रज्ञ म्हणून सुशील माळवतकर, मोईन खान यांनी कार्य केले. प्रत्यक्ष मतदान यंत्र कसे हाताळावे याचे प्रात्यक्षिक मास्टर ट्रेनर मोहन कलंबरकर, धर्मेंद्रसिंग शिलेदार, सचिन राका, गजानन मस्के यांनी दाखवले.या प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन व आभार संजय विश्वनाथ भालके यांनी केले. 

         हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी पेशकार राजकुमार कोटुरवार,नियोजन सहाय्यक बी.एस.पांडे,मकरंद भालेराव, राजेश कुलकर्णी, एस.व्ही.भालके प्रा. डॉ.घनश्याम येळने,डॉ सचिन नरंगले, बालासाहेब कच्छवे, हनुमंत राठोड,जमील शेखसह सर्व नांदेड तहसील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

नांदेड दक्षिणच्या दुसऱ्या प्रशिक्षणात डिजीटल पध्दतीचा पूर्ण वापर करणार - डॉ सचिन खल्लाळ यांचे प्रतिपादन

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनीधी

      दि.१२ व १३ रोजी ०८७ नांदेड दक्षिण मतदारसंघातील द्वितीय प्रशिक्षण  नागार्जुना पब्लिक स्कुल,कौठा,नांदेड येथे आयोजित केले आहे. 

  या दोन दिवसात २२४६ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेणार असून यावेळेस सदरील प्रशिक्षणात पूर्णतः डिजीटल प्रणालीचा प्रथमच उपयोग करण्यात येणार आहे. एकूण १५ विविध कक्षामध्ये प्रत्येकी ४० जणांस तंत्रज्ञानाचा अचूक वापर करुन प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षण दिल्या जाणार आहे,असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी,०८७ नांदेड दक्षिण डॉ सचिन खल्लाळ यांनी केले आहे.

     प्रशिक्षण कंटाळवाणे व पाट्या टाकू होवू नये म्हणून आणि प्रशिक्षणार्थांनी सुध्दा सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी या आधुनिक तंत्राचा वापर सदरील प्रशिक्षणात करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया राबविण्यासाठी शाळेचे संचालक केशव गड्डम यांनी आपल्या संपूर्ण तंत्रज्ञ टिमसह तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी भरीव सहकार्य केले आहे.

          तंत्रज्ञ म्हणून सुशील माळवतकर, मोईन खान कार्य करणार आहेत. प्रशिक्षणाच्या पूर्व संध्येस प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी तहसीलदार प्रविण पांडे,नितेशकुमार बोलोलु, नायब तहसीलदार, सचिन नरंगले,प्रशिक्षण टिम सदस्य संजय भालके,प्रा.राजेश कुलकर्णी व बालासाहेब कच्छवे यांनी भेट देवून पाहणी केली.

लातूरच्या बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक पण कमाल भाव हमीपेक्षा कमीच

 संपादक आशिष मुगटकर



लातुर जिल्हा प्रतिनिधी

         दिवाळी सणाचा उत्साह सुरू असतानाचा बाजाराच सोयाबीनची आवक वाढली असून दोन दिवसांत पंधरा हजार क्विंटलने वाढ झाली आहे. सोमवारी (ता. ४) बाजारात ४९ हजार ११ क्विंटल आवक झाली होती.

आवक वाढली तरी किमान व कमाल भाव स्थिर आहेत. यात हभीभावाने खरेदीसाठी अजून म्हणावा तेवढा वेग आला नसल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे.

मागील तीन वर्षांचा अनुभव लक्षात घेता यंदा सोयाबीनच्या भाववाढीची आशा शेतकऱ्यांना उरली नाही. यामुळे तातडीच्या आर्थिक गरजांसोबत रब्बीच्या पेरणीच्या खर्चासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. मळणी होताच त्याची साठवणूक न करता ते थेट बाजारात विक्रीसाठी आणले जात आहेत.

बाजारात सोयाबीनला काही दिवसापासून कमाल चार हजार ५६५ तर किमान तीन हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. कमाल व किमान भाव स्थिर असून दुसरीकडे जिल्ह्यात १४ केंद्र सुरू होऊनही एकाही केंद्रावर हमीभावाने सोयाबीन खरेदीचा उत्साह नाही. बारदाना व मॉईश्चरची कारणे पुढे केली जात आहे.

गुरुवारी नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारांची प्रथम तपासणी

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनिधी

दि. ४ नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने ०८६ नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी गुरुवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते ५ या कालावधीत कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन, कॅबिनेट हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, परिसर नांदेड येथे खर्च निरीक्षकासमोर आयोजित केली आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे. 

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , १९५१ च्या कलम ७७ नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे असे ०८६ नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध पर्यायांचा उपयोग करावा :- डॉ सचिन खल्लाळ ( निवडणूक निर्णय अधिकारी)

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनीधी

     निवडणूक आयोगाच्यावतीने मतदान प्रक्रिया अधिक सक्षम,प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी विविध असे चार पर्याय निवडणूक आयोगाने दिले असून , त्याचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन डॉ सचिन खल्लाळ ,नांदेड दक्षिणचे निवडणूक अधिकारी यांनी केले आहे. त्या चार पर्यायांची माहिती पुढील प्रमाणे आहे.

  आचारसंहिता नियंत्रण कक्ष हा कक्ष तहसील कार्यालय, नांदेड येथे पहिल्या मजल्यावर स्थित असून पंचायत समितीच्या सभागृहात चोवीस तास या कक्षाचे कार्य अविरतपणे चालू आहे. आचारसंहितेचे काही उल्लंघन आढळल्यास अथवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी या कक्षात प्रत्यक्ष येवून आपली तक्रार नोंदवू शकतात. प्रत्यक्ष येणे अशक्य असल्यास modelcodeofconductofficer@gmail.com या मेल आयडीवर सुध्दा आँनलाईन आपली तक्रार नोंदवू शकतात. 

   *सिव्हिजील सिटिझन अँप* सदरील अँप प्ले-स्टोरवरुन डाऊनलोड करुन यावर आपली आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार नोंदवू शकतात. अत्यंत जलदगतीने व तत्काळ तक्रारीचे निराकरण केले जाते. 

   एस.एस.टी.स्थिर पथक  सदरील पथक नांदेड दक्षिण मतदारसंघात तीन ठिकाणी चोवीस तास नेमून दिलेल्या स्थळी चौकसपणे कार्यरत आहे. डेरला पाटी, नांदेड लोहा रोड,बोंढार तर्फे हवेली-नांदेड-मुदखेड रोड,काकांडी-नांदेड-नायगाव रोड  अशा तीन स्थानी सदरील पथक कार्यरत आहे. दक्षिण नांदेड मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची सदरील पथक अत्यंत बारकाईने तपासणी करतात. प्रमाणापेक्षा जास्त रोकड,मौल्यवान वस्तू आणि आचारसंहिता कायद्याने प्रतिबंधित बाबींची काटेकोरपणे तपासणी केल्या जात आहे. आक्षेपार्ह बाबी जप्त केल्या जातात. 

   एफ.एस.टी.फिरते पथक सदरील पथक चोवीस तास नांदेड दक्षिण मतदार क्षेत्रात फिरत असून यावेळी आचारसंहिता भंग होत असलेल्या बाबींवर कटाक्षाने लक्ष ठेवते. अशा बाबी आढळल्यास त्यावर तात्काळ आचारसंहिता कायद्यानुसार कार्यवाही केली जाते. 

      निवडणूका निरपेक्षपणे व आचारसंहिता भंग न होवू देता पार पाडण्याची मोलाची जबाबदारी या चार मार्गाने केली जात आहे. सर्वांनी या चार मार्गांचा योग्य उपयोग करुन आचारसंहिता भंग न होवू देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी डॉ सचिन खल्लाळ यांनी केले आहे. 



लोकप्रिय बातम्या