नांदेड जिल्हा प्रतिनीधी
दि.१२ व १३ रोजी ०८७ नांदेड दक्षिण मतदारसंघातील द्वितीय प्रशिक्षण नागार्जुना पब्लिक स्कुल,कौठा,नांदेड येथे आयोजित केले आहे.
या दोन दिवसात २२४६ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेणार असून यावेळेस सदरील प्रशिक्षणात पूर्णतः डिजीटल प्रणालीचा प्रथमच उपयोग करण्यात येणार आहे. एकूण १५ विविध कक्षामध्ये प्रत्येकी ४० जणांस तंत्रज्ञानाचा अचूक वापर करुन प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षण दिल्या जाणार आहे,असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी,०८७ नांदेड दक्षिण डॉ सचिन खल्लाळ यांनी केले आहे.
प्रशिक्षण कंटाळवाणे व पाट्या टाकू होवू नये म्हणून आणि प्रशिक्षणार्थांनी सुध्दा सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी या आधुनिक तंत्राचा वापर सदरील प्रशिक्षणात करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया राबविण्यासाठी शाळेचे संचालक केशव गड्डम यांनी आपल्या संपूर्ण तंत्रज्ञ टिमसह तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी भरीव सहकार्य केले आहे.
तंत्रज्ञ म्हणून सुशील माळवतकर, मोईन खान कार्य करणार आहेत. प्रशिक्षणाच्या पूर्व संध्येस प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी तहसीलदार प्रविण पांडे,नितेशकुमार बोलोलु, नायब तहसीलदार, सचिन नरंगले,प्रशिक्षण टिम सदस्य संजय भालके,प्रा.राजेश कुलकर्णी व बालासाहेब कच्छवे यांनी भेट देवून पाहणी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा