लातुर जिल्हा प्रतिनिधी
दिवाळी सणाचा उत्साह सुरू असतानाचा बाजाराच सोयाबीनची आवक वाढली असून दोन दिवसांत पंधरा हजार क्विंटलने वाढ झाली आहे. सोमवारी (ता. ४) बाजारात ४९ हजार ११ क्विंटल आवक झाली होती.
आवक वाढली तरी किमान व कमाल भाव स्थिर आहेत. यात हभीभावाने खरेदीसाठी अजून म्हणावा तेवढा वेग आला नसल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे.
मागील तीन वर्षांचा अनुभव लक्षात घेता यंदा सोयाबीनच्या भाववाढीची आशा शेतकऱ्यांना उरली नाही. यामुळे तातडीच्या आर्थिक गरजांसोबत रब्बीच्या पेरणीच्या खर्चासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. मळणी होताच त्याची साठवणूक न करता ते थेट बाजारात विक्रीसाठी आणले जात आहेत.
बाजारात सोयाबीनला काही दिवसापासून कमाल चार हजार ५६५ तर किमान तीन हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. कमाल व किमान भाव स्थिर असून दुसरीकडे जिल्ह्यात १४ केंद्र सुरू होऊनही एकाही केंद्रावर हमीभावाने सोयाबीन खरेदीचा उत्साह नाही. बारदाना व मॉईश्चरची कारणे पुढे केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा