मुदखेड येथे श्री. कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात भजन कीर्तनाच्या माध्यमातून साजरी

 डॉ.मुंदडा परिवाराची साठ वर्षाची परंपरा कायम

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड / तालुका प्रतिनिधी

 मुदखेड येथे श्री कृष्ण जन्माष्टमी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

दि.३० रोजी रात्री १० वाजता मुदखेड येथील प्रसिद्ध सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बद्रीनारायण मुंदडा यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

रात्री दहा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत श्री. कालीदेवी संस्कृतिक सेवा मंडळाच्या भजनी मंडळाने भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनावर आधारित असलेली गीते सादर केली यावेळी श्रीकालेजी देवी सांस्कृतिक सेवा मंडळाचे प्रमुख राम प्रसाद सोनी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डॉ. सुरेश मेगदे, सदाशिव पुयड, आरविंद पिंगळे, कालीदास चौधरी, गंगाधर डांगे पाटील, रामराव बोधनकर, राम सोनटक्के, रवि शहाणे, आशिष कालानी यांनी भक्तीमय भजन संध्या सादर केली.



या वेळी भजनाची सुरुवात "ओंकार स्वरूपा सदगुरु समर्था " या गिताने करण्यात आली.

रात्री १२ वाजता कृष्ण जन्माचा कार्यक्रम पार पडला या वेळी डॉ. बद्रीनारायण मुंदडा, सौ. संध्याताई मुंदडा, डॉ. गिरीश मुंदडा, डॉ. प्रफुल्ल मुंदडा, सौ.सरस्वतीताई मुंदडा, डॉ.हर्षाताई मुंदडा, जसराज मुंदडा व परीवारा सोबत भजन मंडळाने उत्सव साजरा केला.

डॉ. बद्रीनारायण मुंदडा यांच्या घरी मागिल ५९ वर्षा पासुन जन्मोत्सवाची परंपरा कायम चालत आली असुन या जन्मोत्सवात श्री.कालेजी देवी सांस्कृतीक सेवा मंडळाचे संस्थापक कै.यशवंतराव डांगे, कै.गंगासिहजी लाला ठाकुर, कै.राजाराम मल्लेवार, बाळु मामा टाक व कमलाकरराव देशपांडे ही जुनि मंडळी निरंतर सेवा देत होती आजही त्यांचा वारसा श्री.कालेजी देवी सांस्कृतीक सेवा मंडळाच्या माध्यमातुन अविरत चालु असल्याची महिती डॉ. बद्रीनारायण मुंदडा यांनी या वेळी मनोगत व्यक्त करताना दिली.

कार्यक्रमाची सांगाता "एक राधा एक मिरा" या गिताने करण्यात आली.

कार्यक्रमाचे शेवटी मुंदडा परिवाराच्या वतीने भजनी मंडळाच्या सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला व उपस्थिती लावल्या बद्दल आभार मानले.

महाटी येथे अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मुदखेड  तालुक्यातील महाटी येथे अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पहिल्या प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर लालध्वाजाचे ध्वजारोहण तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर ढगे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.प्रा.शाळेचे मु.अ एच.पी.माळी यांनी केले.अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर बाबुस ढगे  यांनी विचार मांडले. अण्णाभाऊ साठे यांनी दिड दिवस शाळा शिकुन साहित्यिक झाले.आपल्या कांदबरी मध्ये तळागाळातील लोकांच्या व्यथा मांडल्या असे मनोगतात सांगितले.



शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजीराव ढगे यांनी ही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून दुःख दारिद्रय आणि कामगारांची व्यथा मांडल्या ते साहित्य जगभर प्रसिद्ध झाले शोषित पिडीत समाजाला न्याय मिळवून दिला.शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा दुसऱ्या देशात गायला असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,शाहु महाराज, अण्णाभाऊ साठे यांची कास धरावी असे विचार मांडले.

  यावेळी सरपंच प्रतिनिधी बळी ढगे, पाणी पुरवठा चेअरमन माधवराव गाढे,हानमंत ढगे, विठ्ठल ढगे, प्रदिप ढगे,बाबु जाधव, संभाजी जाधव,संघदीप ढवळे, शामराव जाधव आदी उपस्थित होते.

   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कपिल गागलवाड, संजय गागलवाड, मुन्ना गागलवाड, अर्जुन गागलवाड, विनोद गागलवाड आदींनी परिश्रम घेतले.

पालकमंत्री मा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते मुगट जिल्हा परिषद गटा मध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

 मुगट जिल्हा परिषद गटात विकास कामांना प्राधान्य

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट जिल्हा परिषद गटा मध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री मा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.

 त्यामध्ये खुजडा येथील आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण, महाटी ते चिलपिंपरी या पुलाचे लोकार्पण व तसेच पांगरगाव पिंपळकोठा येथील दोन पुलाचे उद् घाटन यांचा समावेश आहे.


याप्रसंगी आमदार अमरनाथ राजूरकर माजी मंत्री डी. पी. सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, चेअरमन गणपतराव तिडके, जिल्हा परिषद सदस्या अरुण कल्याणे संचालक भीमराव कल्याणे ,तालुका अध्यक्ष उद्धवराव पवार, उद्योजक मारोतराव कवळे, मा. जि.प.सदस्य रोहिदास जाधव, उपसभापती आनंदराव गादीलवाड, कृषी सभापती म्हैसाजी भांगे, माधवराव कदम, माजी सभापती रत्नाकर शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख संजय पा. कुरे, डॉ. माणिकराव जाधव, केशव कुरे ,संतोष पांगरगावकर, मारुती जाधव, मारुती किरकन, कंत्राटदार माधव एकलारे सह मुगट सर्कल मधील विविध गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य ,काँग्रेसचे पदाधिकारी, कारखान्याचे संचालक आदींची यावेळी उपस्थिती होती.


रोहिपिंपळगांव येथे मातंग समाजासाठी सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी 

दि.२७ रोजी मुदखेड तालुक्यातील रोहिपिंपळगांव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती साजरी करण्यात आली.यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर नांदेड ओबीसी जिल्हा अध्यक्ष रोहिदास जाधव, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उद्धवराव पवार, मुगट जि.प. सदस्या प्रतिनिधी तथा संचालक भिमराव पाटील कल्याणे,यांची प्रमुख उपस्थिती होती. जयंतीला गावातील मान्यवर मंडळीची या ठिकाणी उपस्थिती होती.

त्या निमित्ताने मुगट जिल्हा परिषद गटा अंतर्गत याच गावात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड मा. ना. अशोकराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर दलित वस्ती अंतर्गत ०७ लक्ष रुपये निधी कामांचे मातंग समाजासाठी सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या हस्ते संपन्न झाला.



     त्याप्रसंगी नांदेड ओबीसी जिल्हा अध्यक्ष रोहिदास जाधव, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उद्धवराव पवार, मुगट जि.प. सदस्या प्रतिनिधी तथा संचालक भिमराव पाटील कल्याणे, माजी सभापती रत्नाकर शिंदे, संचालक माधवराव शिंदे, सरपंच प्रल्हाद शिंदे, उपसरपंच सौ. रानुताई शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य/सदस्या, चेअरमन श्रीरंग शिंदे, गंगाराम शिंदे, संभाजी शिंदे, रामराव शिंदे, जळबाजी शिंदे, बालाजी भालेराव, दता जाधव, शंकर शिंदे, श्याम शिंदे, राजीव शिंदे, माजी सरपंच गोविंदा माने, आनंदराव शिंदे, ग्रामसेवक एकनाथ कदम, कृषी सहायक धुमाळ, मुख्याध्यापक बालाजी तोटे, आवरगे सर, गांवातील प्रमुख कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.




शेतकरी दिन व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंतीच्या निमित्ताने १५ शाखेच्या नामफलक अनावरण व उद् घाटन सोहळा .

 शेतकरी मार्गदर्शन शिबिरात खासदार सुजयदादा विखे पाटील, सत्यपाल महाराज, पंजाबराव डंख पाटील यांची प्रमुख उपस्थिती .

संपादक आशिष मुगटकर



नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी 

         दि.२८रोजी शनिवारी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व शेतकरी दिनाचे औचित्य साधून हदगाव तालुक्यात १५ शाखेच्या नामफलकाचे अनावरण व शाखा उद् घाटन सोहळा खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील प्रख्यात समाजसुधारक सत्यपाल महाराज यांची सत्यपालची सत्यवाणी व प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डंख पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद हदगाव तालुक्याच्या वतीने देण्यात आली आहे.

       दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी दिन व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन तामसा तालुका हदगाव येथे करण्यात आले आहे. कृषी विभाग व विद्यापीठातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित शेतकरी बांधवांना फवारणी सुरक्षेसाठी सुरक्षा किट मोफत देण्यात येणार आहे 

         महाराष्ट्रातील प्रख्यात समाजप्रबोधनकार सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा सत्यपालची वाणी, प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक पाटील यांच्या मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे, 

         हदगाव तालुक्यातील पाथरड, उमरी जहागीर, वायपणा खुर्द, वायपना बुद्रुक येवली आष्टी, लिंगापूर, वाळकी बुद्रुक, वाळकी खुर्द, धानोरा,शिवणी कोळगाव,कंजारा, तळेगाव, धोत्रा या गावात पहिल्या टप्यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या १५ शाखेच्या उद्घाटनाचा सोहळा व नामफलकाचे अनावरण महाराष्ट्रातील लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील व प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती भगवानराव कदम,विलासराव माने,अविनाश कदम,शेख रहीम, गजानन कंठाले, सतिष शिंदे,योगेश पवार,सतीश जाधव,ज्ञानेश्वर सुर्यवंशी, नितीन वानखेडे, सुनील ताकतोडे, अनिल देवसरकर,आकाश कवडे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपातून गोविंदवाड,मोरे यांची निर्दोष मुक्तता

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट पाटी येथील माध्यमिक आश्रम शाळा ही विविध वादग्रस्त विषयांसाठी चर्चेत असते. आता एका नवीनच विषयामुळे ही आश्रम शाळा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 ती अशी या शाळेचे मुख्याध्यापक भगवान विठ्ठलराव ढेपे यांनी दि. ३१ डिसेंबर २००९ रोजी मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये आरोपी अवधूत दौलतराव गोविंदवाड, बाबाराव दौलतराव गोविंदवाड, विठ्ठल उर्फ बाळू बालाजीराव मोरे राहणार ब्राह्मणवाडा ता.जि. नांदेड यांच्या विरोधात शासकीय काम करत असताना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी व शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशी फिर्याद मुदखेड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती.

 त्यानंतर सदरील खटला हा जिल्हा सत्र न्यायालयात नांदेड येथे चालू होता.जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.डी.खोसे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सदरील प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले होते. तरी पण न्यायालयाने आरोपी नाव संशयाचा फायदा घेऊन आरोपीची दि.२६ऑगस्ट२०२१ रोजी या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 सदर प्रकरणात आरोपीची बाजू वकील नंदकिशोर कल्याणे, वकील संतोष मगरे यांनी मांडली होती.

सामुहिक प्रयत्नातून काँग्रेसला गतवैभव मिळेल काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील यांचा विश्‍वास!

नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली जिल्ह्यांची आढावा बैठक संपन्न!

     संपादक आशिष मुगटकर


नांदेड / जिल्हा प्रतिनिधी

 दि. २४ रोजी मंगळवारी नांदेड शहराच्या तरोडा भागातील भक्ती लॉन्स या ठिकाणी नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांतील काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचत पक्ष वाढीसाठी सामुहिक प्रयत्न केल्यास येणाऱ्या काळात काँग्रेसला पुन्हा गत वैभव मिळेल, असा विश्‍वास काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

    व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, पक्षाचे मराठवाडा प्रभारी संपतकुमार, अभय छाजेड, काँग्रेसचे विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, माजीमंत्री डी. पी. सावंत, चंद्रकांत हंडोरे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. मोहन हंबर्डे, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, माजी आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, विनायक देशमुख आदींची उपस्थिती होती.



     एच. के. पाटील म्हणाले, की काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी गेल्या कांही महिन्यात आंदोलने केली आहेत. या समवेतच पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यापुढेही कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे, विविध विषयांबाबतची भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे. यातून आगामी काळात काँग्रेसला गतवैभव मिळेल आणि आगामी निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे येईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

     भारतीय जनता पक्षाने अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्ता मिळविली आहे. मात्र, भाजप सरकारच्या काळात केवळ थापा मारण्याचे काम सुरु आहे. प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख, दरवर्षी दोन कोटी रोजगार तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र, यातील एकाही आश्‍वासनाची मोदी सरकारने पूर्तता केली नाही. कोरोना काळात देशातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यातही सरकारला अपयश आले आहे. तर लसीकरण पाहिजे त्या गतीने राबविले जात नाही. भाजपाचे सरकार असलेल्या राज्यात आरोग्य सुविधा अभावी कोरोना झालेल्या अनेकांचा मृत्यू झाला. मात्र, आपले अपयश झाकण्यासाठी कोरोना बाधितांच्या मृत्यूंची आकडेेवारी चुकीची दाखवण्यात आली आहे. चुकीच्या धोरणामुळे देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक बनली आहे. बेरोजगारी व गरिबीत झपाट्याने वाढ होत आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी देशात पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणे गरजेचे आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांतून पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल असा विश्‍वासही एच. के. पाटील यांनी व्यक्त केला.

     काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. महाविकास आघाडी सरकाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब, दलित, आदिवासी यांच्या हितासाठी ज्या योजना राबविण्यात येत आहेत या योजनांची माहिती शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी सातत्याने आवाज उठवावा. आपल्या परिश्रमातूनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही पक्षाला आपेक्षित यश मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

     देशातील कोरोनाच्या  स्थीितीवरुन क्रेंद्र सरकावर तोफ डागत गुजरात येथील नमस्ते ट्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा देशात शिरकाव झाला. कोरोनाचा प्रश्‍नही हाताळण्यातही केंद्र सरकारला आपयश आले. कोरोनाची रुग्ण संख्या घटत असतानाच पुन्हा देशातील विविध राज्यात विधानसभा निवडणुका झाल्याने पुन्हा कोरोनाचा फैलाव झाला. केंद्र सरकारचे हे अपयश तसेच महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेली कामे जनतेपर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे.

      या वेळी ना. अशोकराव चव्हाण म्हणाले, की कार्यकर्त्यांनी नवीन ऊर्जा व ताकदीने पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न करावेत. संघटनात्मक बांधणीची कामे चांगली झाल्यास निवडणुकीत निश्‍चितच पक्षाचा रिझल्टही चांगला राहिल. यासाठी पक्षाची भूमिका स्पष्टपणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचवावी. जिल्हास्तरीय व महानगरातील पदाधिकाऱ्यांनी बुथ कमिटीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणे गरजेचे असल्याचेही ना. चव्हाण यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. आरक्षण मिळावे हीच सरकारची भूमिका आहे. मात्र आरक्षणातील 50 टक्यांची मर्यादा वाढविल्याशिवाय आरक्षण मिळणे कठीण आहे. यासाठी केंद्र सरकराने 50 टक्के मर्यादा शिथिल करणे आवश्‍यक आहे. मराठा आरक्षणासाठी संसदेत महाविकास आघाडीच्या खासदारांनी आवाज उठविला मात्र मराठवाड्यातील एकाही भाजपच्या खासदारांनी या विषयावर मते मांडली नसल्याचा आरोप ना. अशोकराव चव्हाण यांनी केला.

     या वेळी ना. बाळासाहेब थोरात म्हणाले, की कार्यकर्त्यांनी सोशल नेटवर्कचा वापर प्रभावीपणे करत ज्वलंत विषयावरील काँग्रेसची भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोचवावी. पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बुथ, सेल व शासकीय समितीत संधी देणे गरजेचे आहे. सर्व समान्यांच्या हिताचे प्रश्‍न सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे जनतेचा केंद्र सरकारकडून भ्रमनिराश झाला आहे. यामुळे आगमी काळात पक्षासाठी चांगला आहे. आपल्या सगळ्यांच्या सामुहिक प्रयत्नांनी पक्षाला निश्‍चितच यश मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

  मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की, गत भाजप सरकारच्या काळात जितके काम करण्यात आले त्यापेक्षा अधिक काम या सरकारच्या काळात झाले आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून ना. अशोकराव चव्हाण यांनी सर्वपक्षीय बैठका घेतल्या. तसेच मराठा समाजाचे आरक्षण टिकावे यासाठी तळमळीने काम केले. त्यांच्या या कामाची नोंद इतिहासात होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

   या वेळी माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, शिवाजीराव मोघे आदीनींही विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायकराव देशमुख यांनी केले. 

  सूत्रसंचालन प्रवक्ता संतोष पांडागळे यांनी केले. उपस्थितांचे आभार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी मानले. प्रारंभी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चारही जिल्ह्यातील पक्ष कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमास चारही जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

ईजळी तंटामुक्ती अध्यक्षपदी गोविंदराव पा. मुंगल व उपाध्यक्षपदी परिक्षेत पा.मुंगल यांची निवड

 संपादक आशिष मुगटकर




मुदखेड / तालुका प्रतिनिधी

  मुदखेड तालुक्यातील ईजळी येथील तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली .ईजळी गावाला राजकीय व सामाजिक महत्व आहे. गावात तंटामुक्ती समितीची स्थापन करण्यात आली आहे.

  यावेळी ईजळी ग्राम तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी गोविंदराव बाबाराव पाटील मुंगल तर उपाध्यक्षपदी परिक्षेती ( बाळु) दत्तराम मुंगल यांची निवड करण्यात आली . 



 यावेळी सरपंच नागेश गुळेवाड , उपसरपंच गोपीनाथ पाटील मुंगल, कार्यकर्ते  मुकुंद पाटील मुंगल,  ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक दतराम पा . मुंगल , उद्धव पाटील, आनंदराव पा.मुंगल यांचा सहभाग आहे.  पोलिस निरिक्षक महेश शर्मा यांची ही  उपस्थितीती  होती. ग्रामसेवक, तलाठी यांनी विशेष नियोजन केलं होत.

शिवसेने कडून मुदखेड येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन .



 शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध !

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतिक अहमद

मुदखेड येथील शिवाजी चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करुण शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यामुळे शिवसेने मध्ये असंतोषाची लाट निर्माण झाली होती.त्यामुळे मुदखेड शहरात अनेक शिवसैनीक एकत्रित येऊन आपला रोष प्रतिकात्मक पुतळा जाळून व्यक्त केला व या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील कुरे यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. 



यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील कुरे, जेष्ठ शिवसैनिक विश्वंभर पवार विधानसभा ,पिंटु पाटील वासरीकर, सचिन चंद्रे शहर प्रमुख, सचिन माने शहर प्रमुख, सुरेश दिगाबर लोनवडे बारड, उत्तम आनंदराव पवार धनंज साहेबराव, मारोती चव्हाण मुदखेड, गंगाधर मगरे, रामु मुदखेड, सुरेश शेटे मुदखेड, अंकुश मामीडवार, आनंदा नांगरे, विलास कल्याणे, अविनाश झमकडे, संजीव गाडे पागंरगाव, फालाजी पवार, बाळु चंद्रे, प्ररिक्षित मुंगल, बालाजी सिंगने, तिरुपती कुरे, मारोती चिलंमवाड यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.



मुदखेड काँग्रेस पक्ष कार्यालयात युवक अध्यक्ष तिरुपती पा.कोंढेकर यांचा वाढदिवस साजरा

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

       नांदेड युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तिरुपती पा. कोंढेकर यांच्या उपस्थितीत   मुदखेड येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.तालुक्यातील अनेक युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपली उपस्थिती लावली होती.

 याप्रसंगी आयोजकांकडून त्यांना फेटा व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.नंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.


 यावेळी मुदखेड काँग्रेस कमिटीचे तालूका अध्यक्ष उध्दवराव पा.पवार निवघेकर, शहराध्यक्ष माधव पा.कदम,पंचायत समितीचे उपसभापती आनंदराव गादीलवाड,मार्केट कमिटी उपसभापती तेजाब पा.मुंगल,माजी सभापती प्रतिनिधी शञूघ्न पा.गंड्रस,जनसंपर्क अधिकारी फुलवरे साहेब,तालूका प्रवक्ते प्रा.संदिप पवार निवघेकर,युवक कॉंगेसचे भोकर विधानसभा अध्यक्ष मदन देशमुख,उपाध्यक्ष केशव मुंगल,महासचिव सुभाष धबडगे,सरचिटणीस राम गवंडेवाड,अनघालक्ष्मी कंपनीचे प्रवर्तक सुरेश बेंद्रे साहेब,चक्रधर पवार पार्डीकर,नागोराव पा.खानसोळे,विजय पा.डोंगरगावकर,आनंदराव पा.पवार,प्रशांत कवळे,लखन कारले,बालाजी सुर्यवंशी,सचिन मगरे,ऋषीकेश पारवेकर,रंगराव पवार,बालाजी गुळेवाड,नितीन चौदंते,माधव गाढे,तुकाराम मनुरे,इस्माईल शेख,बाबाराव कोलते,संभाजी भांगे,संभाजी गाढे,गोविंद गाढे,चंदू यगुरले,शाम पा.शिंदे,संजय पवार शुभम कल्याणे, तसेच शहर व तालूक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.




शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 आम्ही शिंदे परिवाराच्या दु:खात सहभागी - पालकमंत्री अशोक चव्हाण

संपादक आशिष मुगटकर



नांदेड / जिल्हा प्रतिनिधी

  दि.२२ रोजी नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सहाय्यक समादेशक शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या बलिदानाने सर्वांवर शोककळा पसरली आहे. त्यांचे वीरमरण हे देशासाठी आहे. अत्यंत मेहनतीने आणि स्वकष्टाने त्यांनी विविध आव्हानांवर मात करुन सहाय्यक समादेशक पदापर्यंत प्रगती साध्य केली. देशाच्या वैभवाचे प्रतिक असणाऱ्या लाल किल्ल्यापासून अनेक ठिकाणी त्यांनी सुरक्षितेची जबाबदारी चोखपणे बजावली. छत्तीसगडमधील नारायणपूर येथे नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात महाराष्ट्र शासन सहभागी असल्याचे सांगून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.


मुखेड तालुक्यातील बामणी गावाच्या शिवारात शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्यावर आज सकाळी १० वा. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार डॉ. तुषार राठोड, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, सरपंच माधवराव जाधव, जिल्हा सैनिक अधिकारी महेश वडदकर, देगलूरचे उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसिलदार काशिनाथ पाटील आदी उपस्थित होते.

शिंदे परिवाराला या दु:खातून सावरण्यासाठी आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शोकभावना शिंदे परिवाराप्रती व्यक्त केल्या असून ह्रदय हेलावून टाकणारा हा क्षण असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. शासनाच्यावतीने त्यांनी शहीद सुधाकर शिंदे यांना पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.


जिल्हा प्रशासनातर्फे बामणी शिवारात शहीद शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तातडीने चबुतरा व शेडची उभारणी केली. शहीद सुधाकर शिंदे यांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव कबीर यांने अग्नीडाग दिला. यावेळी उपस्थितांना गहिवरुन आले. त्यांच्या पत्नी सुधा, वडील रमेश, आई, लहान भाऊ व बहिणीसह सर्व परिवार शोकसागरात बुडाला. अग्नीडागापूर्वी शहीद शिंदे यांना जिल्हा पोलीस तसेच लष्कराच्यावतीने बंदुकीच्या हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. शहीद सुधाकर शिंदे यांच्या पत्नी सुधा व वडील रमेश यांच्याकडे  लष्कराच्यावतीने पार्थिवावरील तिरंगा यथोचित सन्मानाने सुर्पुद करण्यात आला.  


अर्धापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

 संपादक आशिष मुगटकर


 अर्धापूर / तालुका प्रतिनिधी

    अर्धापूर तालुक्यातील अनेक युवकांनी आज नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या शुभहस्ते  व राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्धापूर तालुक्याचे युवा नेते साबेर शेख,व राष्ट्रवादी युवक  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पप्पू पा. टेकाळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

    यावेळी राष्ट्रवादी युवक  काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील, मनपा  माजी विरोधी पक्षनेते जीवन पाटील घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हासरचिटनिस डी. बी. जांभरूणकर, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर,  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस डॉ. परशुराम वरपडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, बालासाहेब मादसवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

   प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.



  अर्धापूर येथील शहेबाज सयद, रियाज फारुखी, मुस्ताकशेख,तारेख चौधरी, इमरान चौधरी, शेख मुजमिल, शेख रहीम,शेख हकीम,आदिल, शेख अक्को, शेख सोहेल, शेख अज्जू, शेख समीर, शेख मुनिर, शेख जुबेर,शेख पाशा, शेख मुनिर, शेख अजीम,गजू कदम,तानाशाहा भाई, तोजिया शेख,मो.मोईन ,सद्यम मणियार यांच्यासह अर्धापूर शहरातील विविध प्रभागातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

अखेर प्रा.संदिप पवार निवघेकर यांची कांग्रेसमध्ये घरवापसी

  

पालकमंत्री मा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देताना.

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड  तालुका / प्रतिनिधी अतीक अहमद

राष्ट्रवादी पदवीधर संघाचे मुदखेड तालूकाअध्यक्ष प्रा.संदिप पवार निवघेकर यांनी आज कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करुन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंञी तथा नांदेडचे पालकमंञी मा.ना.अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते व नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,मुदखेड कॉंग्रेस कमिटीचे तालूकाअध्यक्ष मा.उद्धवराव पवार निवघेकर यांच्या उपस्थितीत प्रा.संदिप पवार यांची तालूका प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली.

प्रा.संदिप पवार यांनी पक्ष प्रवेश करताच त्यांना प्रवक्ता हे पद देण्यात आले.त्यामुळे अनेक वर्षे पक्षात काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्ता यांना पद न देता डावले जात असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडिया दिसून येत आहेत.कांग्रेसचे तालुका अध्यक्ष उद्धव पवार यांचे प्रा.संदिप पवार निकटवर्ती असल्यामुळे त्यांना हे पद देण्यात आले आहे. 

याप्रसंगी युवक कॉंगेसचे जिल्हाअध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर,मुदखेड शहराध्यक्ष माधव कदम,उपसभापती आनंदराव गादीलवाड,मार्केट कमिटीचे संचालक संदिप पाटील गाढे,तालूका सरचिटणिस रामराव खांडरे,लक्ष्मणराव देवदे,जिल्हा सल्लागार उत्तमराव लोमटे बारडकर,भोकर विधानसभा युवकचे अध्यक्ष मदन देशमुख,उपाध्यक्ष केशव मुंगल,बालाजी जाधव,आनंदराव पवार,मारोती पवार आदिंनी अभिनंदन करुन भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बारड नगरीत महारक्तदान शिबीर संपन्न

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी अतीक अहेमद

     महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बारड येथे शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

     शिवसेना नेते बारड ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बारड येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.



     या रक्तदान शिबीरास भोकर मतदारसंघातील युवकांनी रक्तदान करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.


    बारड सर्कल मधील शेतक-यांच्या हितासाठी  फ्रुट कंपनी, तसेच व्यापारी व शेतकरी यांच्या साठी वेगवेगळया मालाचे भाव फलक साठी एल.ई.डी याचे उदघाटन सोहळा हिंगोलीचे खासदार आणि शिवसेना नेते खा. हेमंतभाऊ पाटील, नांदेड उत्तर चे आमदार बालाजीराव कल्याणकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या  प्रमुख उपस्थिती संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद कवळे यांनी केले

        यावेळी जिल्हा प्रमुख नांदेड दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख नांदेड उमेश मुंडे, युवासेना जिल्हाप्रमुख नांदेड महेश खेडकर, उपजिल्हाप्रमुख भोकर दत्ता पाटील पांगरीकर, उपजिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य देगाव बबन बारसे, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, शिवाजीराव किन्हाळकर,  बालाजी कल्याणकर, परमेश्वर पांचाळ, विश्वभर पवार, मुदखेड तालुका प्रमुख संजय पाटील कुरे, पंचायत समिती सदस्य पिंटु पाटील वासरीकर, संतोष कापटे, भोकर चे अमोल पवार, युवराज पाटील, शहरप्रमुख सचिन चंद्रे,सचिन माने, यांच्या सह अदि प्रमुख उपस्थितीत होते.

     मुदखेड तालुक्यातील अनेक खेड्यातील युवकांचा यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश देण्यात आला

      रक्तदान कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब देशमुख बारडकर, सरपंच प्रभाकरराव आठवले, विलासराव देशमुख, माणिक लोमटे, शिवाजीराव देशमुख , गजानन कत्रे, किशन देशमुख, कैलास पुलकुंटवर, प्रदीप देशमुख, विजय देशमुख,,शरद कवळे , गणपत शिंदे, दिपक पाटील , रितेश जैयस्वाल, प्रकाश देशमुख, आशिष देशमुख,  मजहर शेख, आदीने केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद जोंधळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास देशमुख यांनी केले.

मुगट येथील विविध कार्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 मुगट ग्रामपंचायत कडून सेवानिवृत्त सैनिकांचा सपत्नीक सत्कार !!



मुगट ( प्रतिनिधी)

           मुगट येथील ग्रामपंचायत कार्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.कांताबाई धोंडीबा वंजे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले

         मुगट गावचे भुमिपुत्र नंदकुमार नागोराव लिंगायत हे भारतीय सैन्य दलातुन देशसेवा करुन नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने  ग्रामपंचायत व गावकर्‍यांच्या वतीने सपत्नीक त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.तसेच सेवानिवृत्त जवान आंनद जाधव यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.


       नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुगट शाखेत शाखाप्रमुख अनंत देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी चेअरमन माधवराव कल्याणे, कर्मचारी मोरे,धाराजी पवार,दादा पाटील कल्याणे यांची उपस्थिती होती.

      सेवा सहकारी सोसायटी मध्ये चेअरमन माधवराव कल्याणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सर्व स सदस्य उपस्थित होते.



     जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मानव विकास कडून मिळालेल्या  सायकलचे वाटप शाळेतील मुलींना करण्यात आले.यावेळी सर्व शिक्षक, शिक्षीका व कर्मचारी गावातील नागरिक उपस्थित होते.

           यावेळी संचालक भिमराव पा.कल्याणे,सरपंच सौ.कांताबाई धोंडीबा वंजे,ग्रामविकास अधिकारी मा.राजेश्वरजी भुरे साहेब, चेअरमन माधवराव पा.कल्याणे, रमेश पा कल्याणे,तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पा.कल्याणे, गोपिनाथराव पा.मुंगल,पो.पा.भगवान हाटकर, बालाजी पा.कल्याणे, बालाजीराव पा.मुंगल,संभाजीराव तुप्पेकर,धाराजी पा.पवार,एकनाथ पा.कल्याणे,राम कल्याणे, प्रल्हाद कल्याणे, नंदकुमार मठपती, गणेश कल्याणे, आनंदा पांचाळ,शाम मुंगल,प्रकाश हाटकर, तुकाराम हाटकर,देवदत्त हाटकर,विलासराव पा.कल्याणे,वैभव गजेले, ग्रामपंचायत कर्मचारी चंपतराव कल्याणे, विठ्ठल पवार, कैलास कल्याणे, अनिल कुलकर्णी, वामन हाटकर, किशन हातागळे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय विद्यार्थी यांची यावेळी उपस्थिती होती. 


भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... मातृभूमी न्युज नेटवर्क 🙏🙏✍️✍️


महाटी जि.प.प्राथमिक शाळेत ७५ वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा.

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

     मुदखेड तालुक्यातील महाटी येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ७५ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याच प्रांगणात ग्रामपंचायत कार्यालयाचे झेंडावंदन करण्यात आले. गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ.राजश्री मारोती ढगे यांच्या हस्ते पहिल्या प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण सौ.राजश्री ढगे यांच्या हस्ते करण्यात आले.

    जि.प.प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी पा.ढगे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वातंत्र दिनाचे महत्त्व सरपंच सौ.राजश्री ढगे, संभाजी पा.ढगे,बाबुस ढगे,एच पी माळी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

  यावेळी गावातील तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर  ढगे, सरपंच प्रतिनिधी बळी  ढगे म्हैसवाडा पाणी पुरवठा चेअरमन माधवराव गाढे,मा.सरपंच गोविंदराव ढगे, उपसरपंच तुकाराम तोटकुलवार, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी ढगे, बालाजी ढगे,बाबुस ढगे, माधवराव ढगे, आनंदराव ढगे, युवक काँग्रेसचे शाखाअधक्ष मुरली ढगे, संतोष ढगे, बळवंत ढगे,चांदु जाधव, आनंदा गाढे,मुअ एच पी माळी, सहशिक्षक जि एस कदम, व्हि जी सरदेशमुख अंगणवाडी सेविका अन्नपुर्णा जाधव, कल्पना जाधव, ग्रामपंचायत सेवक आनंदा गागलवाड, गुलाब जाधव, आदि उपस्थित होते.

कौटुंबिक कार्याबरोबर बहुजन समाजाने चळवळीसाठी योगदान द्यावे-- मालोपा’चे संस्थापक सचिनभाऊ साठे

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

       वर्तमान परिस्थितीत गावकुसाबाहेरच्या समाज बांधवांनी आपल्या कल्याणासाठी सत्तेत यावे. साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे विचार वाचून आत्मसात करण्यासह कौटुंबिक कार्याबरोबर बहुजन समाजाने राजकीय व सामाजिक चळवळ अधिक प्रभावीपणे गतिमान करण्यासाठी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मानवहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांनी डोणगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोलतांंना केले.

        यावेळी डॉ.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा श्रीमती सावित्रीमाई साठे, गणेश भगत, मानवहित लोकशाही पार्टीचे जिल्हाध्यक्ष मालोजी वाघमारे, तालुकाध्यक्ष आकाश सोनटक्के, नगरसेवक प्रतिनिधी चांदु बोकेफोड, पोलीस पाटील राजेंद्र हामंद, तंटामुक्ती अध्यक्ष रंगराव हामंद, सरपंच सौ.अनुसयाबाई बोबडे, उपसरपंच राजू गंड्रस, सकाहरी बोबडे, राजेश पा.हामंद, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सहसचिव संजय कोलते, पुंडलिक सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्या सौ.ज्योती मस्के, ग्यानोबा सूर्यवंशी, सरस्वतीबाई पांचाळ, व्यंकटी सोनटक्के, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

       प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून जयंती सोहळ्याच्या आयोजनाची सविस्तर भूमिका पत्रकार प्रल्हाद मस्के व जयंती मंडळाचे कार्यकर्ते रमेश सूर्यवंशी यांनी विशद केली.

      शाहीर माधव वाघमारे आणि त्यांच्या कला संचाने गीत गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रल्हाद मस्के यांनी केले.

आमदुरा येथे भारतीय सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

      दि.१५ रोजी मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील गुरूकुल इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून ७५वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.

      स्वातंत्र्यदिवसा निमित्य आज गुरुकुल इंग्लिश स्कूल आमदुरा व शिकारघाट येथे भारतीय सैन्य दलातील सैन्यामध्ये कार्यरत असलेले गणेश पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या संस्थेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात..आज त्यांनी भारतीय सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून एक वेगळा उपक्रम राबविला त्यामुळे यांची सगळीकडे चर्चा आहे.

     शाळेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक प्रा. चंपती पवार, पठाण सर, अँड. गजानन पवार, अँड. नवनाथ पंडित,दत्ता पवार सरपंच शीतल गोरकवाड, उपसरपंच युवराज पवार व मारोती पवार, तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी पवार, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

      गावातील  माजी शंकरराव पवार, माजी सरपंच पांडुरंग पवार व रामदास पवार, बालाजी पंडित, तलाठी प्रवीण होंडे साहेब, बिसंनसिंग आमदुरेकर, दामाजी पवार, संभाजी पवार, माधव पावर, अवधूत पवार, आनंद पवार, सुदाम पवार, अरुण पवार, गंगाधर पवार, अर्जुन पवार, सुरेश पवार, अंगणवाडी सेविका व मदतनीस सर्व प्रतिष्ठीत नागरिक या वेळी ध्वजारोहणासाठी उपस्थीत होते..






काँग्रेस जिल्हा अध्यक्ष गोविंदराव नागेलीकरांच्या हस्ते कामळज येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

  सांस्कृतिक सभागृह लोकार्पण व दलित वस्ती सी. सी. रस्ता भूमिपूजन

      संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

      दि. १२ रोजी मुदखेड तालुक्यातील कामळज येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड मा. ना. अशोकराव चव्हाण साहेब व माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांच्या मार्गदर्शना नुसार नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. गोविंदराव शिंदे नागेलीकरांच्या शुभहस्ते मुगट जिल्हा परिषद गटातील कामळज या गावात भुमी पुजन व लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी  जि.प. सदस्या प्रतिनिधी तथा संचालक मा भिमराव पा. कल्याणे, पंचायत समिती सदस्या प्रतिनिधी मा. पिंटू पा. वासरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 



 सांस्कृतिक सभागृह लोकार्पण ०९ लक्ष , दलीतवस्ती सुधार योजने अंतर्गत सी. सी. रस्ता भूमिपूजन ०८ लक्ष , हाँयमॅक्स लाईट ०३ लक्ष रुपये निधी मिळाला आहे.या निधीतून गावातील विविध विकास कामांना गती मिळाली आहे. 

       काँग्रेस कडून मुगट जिल्हा परिषद गट व बारड जिल्हा परिषद गटातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर विविध विकास कामे प्रगतीपथावर चालू आहेत. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका डोळ्यासमोर येऊन ठेपली आहे.

     त्याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी चक्रधर खानसोळे, उपसरपंच गजानन पांचाळ, माजी सरपंच नागोराव खानसोळे, ग्रामपंचायत सदस्य माधवराव खानसोळे, दिगंबर खानसोळे, शशीकलाबाई खानसोळे,रुस्तुम खानसोळे, सुमनबाई कोकरे, ग्रामविस्तार अधिकारी एकनाथ कदम, गौतम कोकरे, व गांवातील प्रमुख कार्यकर्ते, नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.

मुगट येथे ट्रक - दुचाकीचा अपघात

अपघातात एक जण गंभीर जखमी; जखमीला नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल 

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

        दि.९रोजी मुगट येथील मुख्य रस्त्यावर मुगट रेल्वे स्टेशन मुदखेड या टी पॉईंट वळण रस्त्यावर दुपारी दोन ते तीन च्या सुमारास ट्रक व दुचाकी च्यात झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

           मालवाहू ट्रक मुदखेड कडे जात असताना वळण रस्त्यावर दुचाकी क्रमांक एम एच २० ए वाय ९४ ९८ ही दुचाकी घेऊन उद्धव दत्ता मेकाले हा मुगट बस स्थानका कडे येत होता अचानक या वळणावर ट्रकच्या मागच्या चाकामध्ये दुचाकी आली. ही गोष्ट ट्रक चालकाला कळताच त्याने गाडीचे ब्रेक दाबून गाडी जाग्यावरच थांबवली.त्यामुळे जीवीत हानी टळली. तरीसुद्धा मोटारसायकलची समोरील चाक ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्यामुळे दुचाकीस्वार उद्धव मेकाले हा बाजूला फेकला गेला त्यामुळे त्याचे प्राण वाचले परंतु डोक्याला गंभीर मार लागला आहे.

         पुढिल उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात उध्दव मेकाले यांना  दाखल केले आहे.घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा करून संबंधित ट्रक चालकास व ट्रक ला ताब्यात घेऊन मुदखेड पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.




गुरांच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना कृषी दूता कडून मार्गदर्शन

  संपादक आशिष मुगटकर       

गुरांच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना कृषी दूता कडून मार्गदर्शन


   मुदखेड / तालुका प्रतिनिधी

      पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत गीताई ह्यूमन काईडं ट्रस्ट अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय आमखेड येथील कृषी दूतांनी अनिकेत अंबादासराव इंगोले या विद्यार्थ्यांनी चिकाळा परिसरातील शेतकऱ्यांना गुरांच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याकरता मार्गदर्शन केले.

       यामध्ये त्यांनी चाऱ्यावर युरिया प्रक्रियेचा फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले वाढलेल्या चाऱ्यामध्ये पचनास कठीण असलेले हे घटक तसेच तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात आणि प्रथिने चे प्रमाण खूप कमी असते प्रक्रिया केलेल्या कार्याचे प्रथिनाचे प्रमाण १.१ ते ३/४ टक्केपर्यंत वाढ होते क्षमता २० ते ३० टक्‍क्‍यांनी समतेच्या घटकांमध्ये वाढ होते त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात देखील वाढ होते. त्यांच्या शरीरात वाढ प्रजननक्षमता ही सगळी राखली जाते अगदी कमी खर्चात कमी वेळात जनावराची पौष्टिकता सहज आहार उपलब्ध करून देता येतो शेतकऱ्यांना घेऊन या प्रक्रियेत प्रात्यक्षिक करून दाखविले.

       युरिया प्रक्रियेसाठी  या चार टक्के युरिया वापरात याचा जनावरांच्या आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही हे शेतकऱ्यांना समजावून सांगितले यावेळी तिथे शेतकरी प्रकाशराव देशमुख, सुरेशराव देशमुख ,अशोकराव देशमुख, अनिल देशमुख, शिवाजी देशमुख, चक्रधर माने ,हनुमंत देशमुख ,अमोल देशमुख, संभाजी कोकणे, शंकर कोकणे ,पप्पू देशमुख ,ज्ञानेश्वर कोकणे, किशोर वडजे आदी शेतकरी उपस्थित होते.

      या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अतुल मुराई  कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डी.टी.बोरकर,  मार्गदर्शन प्रा.आर.एस.डाखोरे सर यांचे व इतर प्राध्यापकांचे  मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शेतकरी दिन व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील जयंतीनिमित्त शेतकरी जागर मेळाव्याचे आयोजन- प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर.


शेतकऱ्यांना मोफत फवारणी, सुरक्षा किट व फॉरेमनट्रॅपचे वाटप,प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव,कोरोना योद्धाच्या सन्मान .

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी

           दि. ७ जुलै पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी दिन व पद्मश्री सहकार महर्षी डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने शनिवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता तामसा ता हदगाव येथे जिल्हास्तरीय भव्य शेतकरी जागर मेळावा आयोजित केला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

          सहकार महर्षी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात शेतकरी दिन साजरा केला जातो,मागील आठ वर्षापासून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते, याच अनुषंगाने तामसा ता. हदगाव येथे शेतकरी जागर मेळावा आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना मोफत फवारणी सुरक्षा किट व कापूस बोंड आळी नियंत्रणसाठी फॉरेमनट्रपचे वाटप करण्यात येणार आहे, परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव व सन्मान,कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोरोना योद्धाच्या सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

         शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, कार्यक्रमाचं सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधीना,सर्व विभागाच्या अधिकारी यांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात येणार आहे,तसेच कार्यक्रमाच परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आमंत्रण देनार असल्याची माहिती पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.

        शेतकरी जागर मेळावा यशस्वी करण्यासाठी विविध समितीच्या गठन केले असून जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा गायकवाड तालुकाध्यक्ष भगवान कदम विलास माने अविनाश कदम वायपणकर,पवन सूर्यवंशी, शेख रहीम गजानन कंठाळे विक्रम शिरसागर, सुनील ताकतोडे नंदू पाटील महेश गोरेगावकर,अविनाश देवसरकर आनिल देवसरकर सोनू देशमुख मारोती पवार वडगावकर यांच्यासह परिसरातील पदाधिकारी नियोजन करत आहेत.

माळकौठा येथे विविध कामांचे भूमिपूजन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 जि.प. अंतर्गत विकास कामांसाठी 30 लक्ष रुपये निधी उपलब्ध तसेच जि.प. हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार 




मुदखेड / तालुका प्रतिनिधी

दि.४ रोजी मुगट जिल्हा परिषद गटातील माळकौठा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात विविध विकास कामांसाठी 30 लक्ष रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे.त्या विविध कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या प्रतिनिधी भिमराव पाटील कल्याणे यांच्या हस्ते करण्यात आले.

            माळकौठा येथील जि.प. हायस्कूल शाळेतील गुणवंत विद्यार्थीचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.उपस्थीत मान्यवर मंडळींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या हस्ते करण्यात आलेे. 



     त्याप्रसंगी मुदखेड तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष उध्दव पवार, मुगट जि.प. सदस्या प्रतिनिधी तथा भा.च.स.सा. कारखान्याचे संचालक मा. भिमराव पा. कल्याणे, माजी सभापती मा. रत्नाकर शिंदे, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डॉ. माणिकराव जाधव, माजी सभापती प्रतिनिधी लोकडुजी गोणेवाड, प्रभाकर कोटगिरे, सरपंच केशव तारू, उपसरपंच शहाजी जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी मोळके, मुख्याध्यापक मा. घोडके, मा. देशमुख सर, शिक्षक वर्ग, गांवातील प्रमुख कार्यकर्ते, नागरिक उपस्थित उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या " हात मदतीचा" या अभियानाला मुदखेड मध्ये जोरदार प्रतिसाद

 पूरग्रस्तांसाठी मुदखेड तालुक्याच्या वतीने "हात मदतीचा"अभियानाचे आयोजन.

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड शहर प्रतिनिधि /अतीक अहमद

                 राज्यभर गेल्या कांही दिवसात पावसाने हाहाकार माजवून प्रचंड नुकसान व प्राणहानी केली आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी व महापुरा मध्ये गावात पाणी शिरल्यामुळे घरे जमीनदोस्त झाली आहेत अनेक लोकं वाहून गेली तर अनेक मृत्युमुखी पडले आहेत लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत.

              आपले राज्य सरकार व विविध सामाजिक संस्था योग्य ती मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत,राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने कायम सामाजिक वृत्त जोपासले आहे,पक्षाचे राष्ट्रीय नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांनी अतिवृष्टी भागातील पूरग्रस्त जनतेसाठी मदतीचा एक हात पुढे करुन राज्यातील दानशूर व्यक्तींनी आपल्या स्तरावरून मदत करण्याचे आवाहन केले आहे.

        त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात "एक हात मदतीचा" या अभियानाद्वारे पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सर्व छोटे-मोठे किराणा दुकान,आडत व्यापारी, कापड दुकानदार, जनरल स्टोअर्स, हातगाडी वाली, पानटपरी वाले,मेकॉनिकल, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, मेडिकलचालक, सर्व सामान्य नागरिक या सर्व दानशूर व्यक्तींनी या अभियानाला मोठा प्रतिसाद देत सढळ हाताने समोर येऊन मदत केली आहे.



                 


     यावेळी विद्यार्थी आघाडीचे प्रशांत कल्याणे, तालुका सरचिटणीस संदीप पवार, मोहम्मद बुराण, आशिष कल्याणे, पांडुरंग पाटील उपासे,मोहम्मद अली, शेख अहेमद सौदागर, पद्माकर बोकेफोडे, मोहम्मद मुस्ताक, जळबाजी हाटकर, माधव व्यवहारे,रामा गुंजकर, सोनु निखाते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकप्रिय बातम्या