शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध !
मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतिक अहमद
मुदखेड येथील शिवाजी चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करुण शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यामुळे शिवसेने मध्ये असंतोषाची लाट निर्माण झाली होती.त्यामुळे मुदखेड शहरात अनेक शिवसैनीक एकत्रित येऊन आपला रोष प्रतिकात्मक पुतळा जाळून व्यक्त केला व या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील कुरे यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील कुरे, जेष्ठ शिवसैनिक विश्वंभर पवार विधानसभा ,पिंटु पाटील वासरीकर, सचिन चंद्रे शहर प्रमुख, सचिन माने शहर प्रमुख, सुरेश दिगाबर लोनवडे बारड, उत्तम आनंदराव पवार धनंज साहेबराव, मारोती चव्हाण मुदखेड, गंगाधर मगरे, रामु मुदखेड, सुरेश शेटे मुदखेड, अंकुश मामीडवार, आनंदा नांगरे, विलास कल्याणे, अविनाश झमकडे, संजीव गाडे पागंरगाव, फालाजी पवार, बाळु चंद्रे, प्ररिक्षित मुंगल, बालाजी सिंगने, तिरुपती कुरे, मारोती चिलंमवाड यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा