मराठा आरक्षण जनजागृती संदर्भात मुगट सर्कलमध्ये मोटरसायकल रॅली

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड प्रतिनिधी / कैलाश पाटील 

दि.२३ रोजी मुदखेड तालुक्यातील मुगट सर्कल मधील सर्व मराठा बांधवांनी आज मराठा आरक्षण संदर्भात दि.२९ऑगस्ट २०२५ रोजी जरांगे पाटील यांचे मुंबई येथे बेधडक मोर्चा निघणार असून मराठा आरक्षण मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्व लोकात जनजागृती करण्यासाठी मुगट सर्कलमधील सर्वपक्षीय मराठा बांधव एकत्र येऊन मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

यावेळी मोटर सायकल रॅली ची सुरुवात मुगट पासून आमदुरा, शिखाचीवाडी, रोहीपिंपळगाव,वसंतवाडी, दरेगाव, खुजडा, टाकळी, चिलपिंपरी, महाटी, माळकौठा, कामळज, देवापुर, शंखतीर्थ, वासरी,या गावात प्रत्यक्ष भेटी देऊन मुंबई येथे निघण्यास सर्वांनी तयारी करावी,  

आपल्या हक्काच्या लढ्यात सहभागी व्हावे असे रॅलीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले.सर्व गावातील लोकांनी 'एक मराठा लाख मराठा',' जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' 'आता कुठे जायचं मुंबईला जायचं!, 'सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे' 'राज्यकर्ते झाले बहिरे, आमची मागणी सगे सोयरे' अशा घोषणा देत रॅलीला स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.  शेवटी आमदुरा येथे राष्ट्रगीताने मोटरसायकल रॅलीची सांगता  करण्यात आली.

   यासाठी मुगट सर्कल मधील सर्व मराठा बांधवांनी परिश्रम घेतले.

मुदखेड माजी सैनिक संघटने कडून तहसीलदार देऊळगावकर यांचा सत्कार

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

मुदखेड  कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री आनंद देऊळगावकर यांची नुकतीच  नांदेड जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसीलदार  पुरस्कार देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.त्याबद्दल  मुदखेड माजी सैनिक टीमच्या वतीने तहसीलदार साहेबांचा सत्कार करण्यात आला.

        यावेळी नायब तहसीलदार श्री कामठेकर सर,सैनिक फेडरेशन चे मराठवाडा अध्यक्ष तथा मा उपनगराध्यक्ष श्री लक्ष्मण देवदे, ज्येष्ठ माजी सैनिक व मार्गदर्शक श्री प्रभू घोंगडे, संघटक, श्री राजाराम हळदे, मुदखेड तालुका अध्यक्ष, श्री,सुनील चौदंते, कार्यकारीनी सदस्य, श्री,मारुती गुंठे, कार्यकारनी सदस्य, श्री,शशिकांत मोडवान उपस्थीत होते,सत्कार समारंभानंतर तहसीलदार श्री आनंद देऊळगावकर सर यांना मुदखेड शहरात माजी सैनिका मार्फत मोफत आर्मी,प्यारा मिलिटरी फोर्स,पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चालू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली असता तहसीलदार साहेबांनी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबद माजी सैनिक टीम मुदखेड यांना सांगितले आहे.

मुगटच्या युवकांनी ग्रामसभेत ग्रामपंचायतचा आर्थिक भ्रष्टाचार आनला चव्हाट्यावर.

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

दि.१५ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.गेल्या अनेक वर्षापासून गावात ग्रामसभा घेण्यात आली नाही.त्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित यावेळी होती. गावच्या सरपंच कांताबाई वंजे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरुवात करण्यात आली. 

      ग्रामविकास अधिकारी श्रीमनवार यांनी विषय सुची इतिवृत्त वाचून दाखवली. त्यात एका वर्षाचा जमा,खर्च सांगण्यात आला. महत्त्वाचे विषय सुचीतील मांडण्यात आले. अध्यक्षाच्या अनुमतीने ऐनवेळी आलेले विषय व निवेदनावर चर्चा करण्यात आली. शासनाच्या एका ॲप वरून गावातील विकासाची माहिती युवकांनी काढली तर त्यात गावात अनेक लाखोंची कामे दिसून आली पण प्रत्यक्षात काही कामे ही झालीच नाही. 

         त्यामुळे गावातील युवकांनी बस स्थानक, अभ्यासिका या मुद्द्यावर ग्रामसभेत जोर धरला. जिल्हा अधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची यापूर्वीच भेट गावातील युवकांनी भेट घेतली व चौकशीचे निवेदन देण्यात आले. 

       ग्रामसभा न घेतल्याची चौकशी संथगतीने सुरू आहे. पण निकाल राजकीय दबावामुळे लांबत चालला. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व काही सदस्य यांनी संगनमताने प्रत्यक्षात ग्रामसभा न घेता मोठा भ्रष्टाचार झाल्याचे प्रथम दर्शनी शासनाच्या ॲपवरून गावातील युवकांनी दाखवून दिले आहे. केवळ कागदोपत्री ग्रामसभा दाखवून त्यात लाखोंची कामे,लाखो रुपयाचा निधी खर्च दाखवून उचलन्यात आला तरी सरपंच म्हणतो मी सहीच केली नाही. पण गावातील निधी कुठे खर्च केला,काम दाखवा असे लोकांनी विचारले असता उडवाउडवीची उत्तरे सरपंच व उपसरपंच प्रतिनिधी यांनी दिली. 

                प्रत्यक्षात गावचा सरपंच हा नामधारी असुन संपूर्ण कारभार हा उपसरपंच प्रतिनिधी हाच पाहत आहे. शेवटी सरपंच प्रतिनिधी यांनी मी राजीनामा देतो असे म्हणुन झालेल्या भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांनी ते मान्य केले नाही. गावात तुम्ही विकासाची कामे केली आहेत तर ते दाखवा आणि नंतरच राजीनामा द्या असे म्हणाले. त्यातवर ही ग्रामस्थांचे समाधान झाले नाही.                         नवीनच आलेल्या ग्रामविकास अधिकारी श्रीमनवार यांनी ग्रामस्था सांगितले की सद्या माझ्याकडं माहिती नाही. दि. १७ सप्टेंबरला२०२५ ला पुन्हा ग्रामसभा घेऊ व मागील पाच वर्षांत केलेली कामे, खर्च, याचा तपशील देऊ यावर ग्रामस्थांनी होकार दिला व पुन्हा एकदा ग्रामसभा घेण्यांचे ठरले.

        गावातील ग्रामसभा मोठी होणार आहे असल्यामुळे काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला होता.



मुगट तंटामुक्ती अध्यक्षपदी दादा पाटील कल्याणे यांची निवड.

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनिधी  

दि.१५ रोजी मुगट ग्रामपंचायत येथे आयोजित ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड यावेळी करण्यात आली.

ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थांच्या बहुमताने मुगट येथील सामाजिक कार्यकर्ते दादा पाटील कल्याणे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील मुंगल यांची निवड करण्यात आली.




गावात  ग्रामसभा असल्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. गावच्या सरपंच कांताबाई वंजे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली व तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड सुद्धा करण्यात आली.

              यावेळी सरपंच कांताबाई वंजे चेअरमन रमेश पाटील कल्याणे, गोपीनाथ पाटील मुंगल, बालाजी पाटील कल्याणे, अनिल कल्याणे, रामराव मुंगल, शंकर मुंगल, गणपत कल्याणे, नागोराव मुंगल, राम कल्याणे, विलास कल्याणे, प्रवीण कल्याणे, वसंत कल्याणे, राहुल कल्याणे, बालाजी कल्याणे, माधव कल्याणे, राजेश कल्याणे, भास्कर कल्याणे, फुलारी मुंगल, दादाराव मुंगल, साईनाथ पांचाळ निर्गुण मुंगल, दिगंबर मुंगल, चक्रधर मंगल श्यामराव मुंगल, संजय मुंगल, देवराव हाटकर, श्याम जाधव, गोविंद कोल्हे, बाबाराव मुंगल, प्रशांत कल्याणे, मठपती गुरु, शामराव मुंगल, नागोराव मुंगल, गोविंद पवार, नागोराव गिरे, बालाजी पिन्नलवार ग्रामविकास अधिकारी श्रीमनवार,पोलीस पाटील सारंग मठपती, पोलीस बीट जमादार कवठेकर सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

मराठा आरक्षण संदर्भात मुदखेड तालुका नियोजन व जनजागृती बैठक संपन्न

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड प्रतिनिधी / कैलास खानसोळे

मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ , मुंबईवर धडक मोर्चा लढा आरक्षणाचा, लढा गरजवंतांचा या अनुषंगाने तालुक्यातील लढ्यात सहभागी होण्यासाठी लोकसंख्या वाढवणे व लोकजागृती करणे आणि नियोजन यासाठी आज मुदखेड तालुका नियोजन बैठक दि.१० ऑगस्ट २०२५ रविवार रोजी सकाळी ११:०० वाजता शासकीय विश्रामगृह मुदखेड येथे मराठा सेवक शाम पाटील वडजे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. 

             प्रथमतः मुदखेड शहरातील मराठा सेवक कै. अमोल आबादार यांचे दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहून कार्यक्रमास सुरुवात झाली.मनोज जरांगे पाटील दि.२७ ऑगस्ट २०२५ सराटी अंतरवाली येथून दि २९ऑगस्ट २०२५ पर्यंत मुंबई येथे लाखो मराठ्यांसह पोहोचणार आहेत या लढ्यात सहभागी होण्यासाठी मुदखेड तालुक्यात बारड व मुगट सर्कल निहाय मराठा सेवक गावोगावी जाऊन जनजागृती करणार येणार आहे. यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्ती मुंबई येथे कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करतील आणि स्वतः स्वतःच्या हक्कासाठी लेकरा, मुलाबाळांच्या भवितव्यासाठी ,आरक्षण मिळण्यासाठी, सरकारने दिलेला शब्द पाळण्यास भाग पाडण्यासाठी मुंबईला निघतील असा ठराव सर्वानुमते उपस्थित सकळ मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला.

 यावेळी तालुक्यातील गाव,वाडी, वस्तीतील शेकडो मराठा बांधव उपस्थित बांधवाने 'मनोज जरांगे पाटील हम तुम्हारे साथ है'

'आरक्षण आमच्या हक्काच !' अशा घोषना देवून बैठकि चा समारोप झाला.

मुगट जिल्हा परिषद शाळेमध्ये वानराचा धुमाकूळ

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि.८रोजी मुगट येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वानराणे धुमाकूळ घातला त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी प्रार्थना सुरू असताना अचानकच शाळेच्या प्रणांगणामध्ये वानराने  उडी मारल्याने शालेय विद्यार्थी घाबरून गेली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तात्काळ वर्गात पाठवून दिले. शालेय शिक्षकांनी वनराचा बराच पळवण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही गेला नाही.तरीसुद्धा हा वानर शाळेमध्येच फिरत होता. दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा त्यांनी शाळेतील मुलींच्या व कर्मचाऱ्यांवर मागे लागला होता. त्यामुळे शालेय विद्यार्थी घाबरून गेली. दि.७ रोजी सकाळी ९:१५ मिनिटाला शाळेच्या गेटवर अभी असलेल्या पहिलीच्या मुलीच्या मागे लागल्याची घटना घडली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून मुगट गावात  वानराणी धुमाकूळ घातला आहे. त्यामध्ये एक बालिका गंभीर जखमी झाली होती तर गावात अनेक ठिकाणी या वानराच्या मुलांच्या, स्त्रियांच्या मागे लागण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत परंतु या वानराचा कायमचा बंदोबस्त करण्यात वन विभाग कमी कर्मचाऱ्याअभावी या कमी पडत आहे. 

शाळेतील मुख्याध्यापक मुंगरे यांनी वानरांचा शाळेतील धुमाकूळ पाहुन वनरक्षक यांना फोन करून घटना सांगितले काही वेळातच वनरक्षक कवळे यांनी घटने गांभीर्याने घेऊन आपल्या टिमसह सापळा घेऊन शाळेच्या परिसरात दाखल झाले होते.तो पर्यंत वानराने शाळेतुन पळ काढला. शाळेत विद्यार्थ्यांना त्यांनी काही सुचना दिल्या.

वन विभागाने तात्काळ या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

मुगट येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा उत्साहात संपन्न.

 संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहार 

दि.३१ रोजी येथील स्वर्गीय  महाजन जीवनाजी पाटील कल्याणे यांच्या नवव्या पुण्यस्मरणार्थ मुगट येथील संत श्री आत्माराम महाराज बोधिमठ येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या कथेची सुरुवात दि. २५जुलै रोजी करण्यात आली होती तर सांगता दि.३१ रोजी संपन्न झाली. भागवतकार ,कीर्तनकार श्री दत्तरामजी महाराज पांचाळ मुगटकर यांच्या सुमधुर वाणीतून ही भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळ्या संपन्न झाला.

 ही भागवत कथा श्रावण मासात सुरू झाल्यामुळे भक्तमंडळीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन बळीराम पाटील कल्याणे व किशनराव पाटील कल्याणे यांनी केले होते.

मुगट येथे अखंड हरिनाम टाळ सप्ताहाला सुरुवात.

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

मुगट येथील जागृत श्री हनुमान मंदिर येथे महा काकड आरतीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम टाळ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाला दि. 30 पासून सुरुवात झाली आहे.

या सप्ताह निमित्ताने सात दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात रामायणाचार्य, कीर्तनकार, धर्माचार्य, विनोदाचार्य, युवा कीर्तनकार यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या सात दिवसात सकाळी ४ ते ५ भाव मुक्तावली, ५ ते ६ काकडा भजन, सकाळी १० ते १२ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ८ विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, रामरक्षा, आरती, रात्री ९ते११ हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अखंड हरिनाम टाळ सप्ताहाची सांगता दि.६ रोजी होणार आहे. त्या दिवशी सकाळी ६:१५ मिनिटाला महाकाकडा दुपारी १२ ते २ काल्याचे किर्तन, नगर प्रदक्षिणा,दहीहंडी व नंतर महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. परिसरातील सर्व भक्तमंडळींनी या महाकाकड आरती मध्ये सहभागी होण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी मुगट यांनी केली आहे.



जत्थेदार बाबा गुरुबक्ष सिंग निहंगसिंगजी यांची सालान बरशी उत्साहात संपन्न.

 संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहर 

दि.३० रोजी मुदखेड तालुक्यातील मुगट येथील स्थित गुरुद्वारा माता साहेब देवांजी येथील सचखंडवासी जत्थेदार बाबा गुरुबक्ष सिंग निहंग सिंग यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विशेष कार्यक्रमाचे आयोजन दि.३० रोजी माता साहेब देवाजी गुरुद्वारा मुगट येथे करण्यात आले होते.

सकाळी ९ वाजता श्री अखंड पाठ साहेबजी, ९ ते ११ कीर्तन,कथा गुरुमत विचार, विशेष अखंड गुरु का लंगर चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संत बाबा बलविंदर सिंग जी, संत बाबा नरिदंर सिंगजी, संत बाबा गुरुदेव सिंगजी,जत्थेदार बाबा तेजासिंग निहानसिंगजी अकाली बुढादल मातासाहेब देवांजी,बाबा जग्गासिंग, सरदार गुलाबसिंघ पुरणसिंघ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या वार्षिक पुण्यतिथी स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमांमध्ये परिसरातील व देशातील अनेक भाविक भक्त सहभागी झाले होते.



लोकप्रिय बातम्या