नांदेड जिल्हा प्रतिनिधी
दि.१५ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.गेल्या अनेक वर्षापासून गावात ग्रामसभा घेण्यात आली नाही.त्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित यावेळी होती. गावच्या सरपंच कांताबाई वंजे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरुवात करण्यात आली.
ग्रामविकास अधिकारी श्रीमनवार यांनी विषय सुची इतिवृत्त वाचून दाखवली. त्यात एका वर्षाचा जमा,खर्च सांगण्यात आला. महत्त्वाचे विषय सुचीतील मांडण्यात आले. अध्यक्षाच्या अनुमतीने ऐनवेळी आलेले विषय व निवेदनावर चर्चा करण्यात आली. शासनाच्या एका ॲप वरून गावातील विकासाची माहिती युवकांनी काढली तर त्यात गावात अनेक लाखोंची कामे दिसून आली पण प्रत्यक्षात काही कामे ही झालीच नाही.
त्यामुळे गावातील युवकांनी बस स्थानक, अभ्यासिका या मुद्द्यावर ग्रामसभेत जोर धरला. जिल्हा अधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची यापूर्वीच भेट गावातील युवकांनी भेट घेतली व चौकशीचे निवेदन देण्यात आले.
ग्रामसभा न घेतल्याची चौकशी संथगतीने सुरू आहे. पण निकाल राजकीय दबावामुळे लांबत चालला. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व काही सदस्य यांनी संगनमताने प्रत्यक्षात ग्रामसभा न घेता मोठा भ्रष्टाचार झाल्याचे प्रथम दर्शनी शासनाच्या ॲपवरून गावातील युवकांनी दाखवून दिले आहे. केवळ कागदोपत्री ग्रामसभा दाखवून त्यात लाखोंची कामे,लाखो रुपयाचा निधी खर्च दाखवून उचलन्यात आला तरी सरपंच म्हणतो मी सहीच केली नाही. पण गावातील निधी कुठे खर्च केला,काम दाखवा असे लोकांनी विचारले असता उडवाउडवीची उत्तरे सरपंच व उपसरपंच प्रतिनिधी यांनी दिली.
प्रत्यक्षात गावचा सरपंच हा नामधारी असुन संपूर्ण कारभार हा उपसरपंच प्रतिनिधी हाच पाहत आहे. शेवटी सरपंच प्रतिनिधी यांनी मी राजीनामा देतो असे म्हणुन झालेल्या भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांनी ते मान्य केले नाही. गावात तुम्ही विकासाची कामे केली आहेत तर ते दाखवा आणि नंतरच राजीनामा द्या असे म्हणाले. त्यातवर ही ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. नवीनच आलेल्या ग्रामविकास अधिकारी श्रीमनवार यांनी ग्रामस्था सांगितले की सद्या माझ्याकडं माहिती नाही. दि. १७ सप्टेंबरला२०२५ ला पुन्हा ग्रामसभा घेऊ व मागील पाच वर्षांत केलेली कामे, खर्च, याचा तपशील देऊ यावर ग्रामस्थांनी होकार दिला व पुन्हा एकदा ग्रामसभा घेण्यांचे ठरले.
गावातील ग्रामसभा मोठी होणार आहे असल्यामुळे काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा