बारड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून वृक्षारोपण.

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनिधी (कैलास पाटील )

          स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड संचलित श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना स्तर २ विभागाकडून आज  भारतीय संविधान निर्मिती ला ७५ वर्ष निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

   श्री शिवाजी कनिष्ठ   महाविद्यालय बारड २६नोव्हेंबर  संविधान दिनानिमित्य संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन हा कार्यक्रम उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे संविधानाला  ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या उद्देशाने आज दि.२८ नोव्हेंबर रोजी कॉलेजच्या प्रांगणात नारळ वृक्षारोपण करण्यात आले.

               यावेळी स्वा.से राजाराम बापू माध्यमिक शाळा बारड चे मुख्याध्यापक रामकिशन चुब्बेवार,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.परशुराम बळीराम माने,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मनोहर ओसावार,परीक्षा विभाग प्रमुख प्रा. कैलाश कपाटे, प्रा.कैलाश खानसोळे प्रा सौ ज्योत्स्ना बोरिवाले,प्रयोगशाळा सहाय्यक संतोष पवार , शिल्पाबाई आठवले  सर्व उपस्थित शिक्षकासह विद्यार्थ्यांनी वृक्षरोपण केले.

 या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



माळकौठा पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी ह.भ.प. व्यंकट महाराज जाधव इच्छुक

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनिधी / कैलास पाटील

 मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील वारकरी परंपरा असलेल्या शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित ह.भ.प. व्यंकट महाराज जाधव हे माळकौठा पंचायत समिती गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे.

ह. भ. प .व्यंकट महाराज हे भजन, कीर्तन ,प्रवचन व पारायण सोहळ्याच्या माध्यमातून आध्यात्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असून परिसरासह संपूर्ण जिल्हाभर  समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासताना लोकांच्या मनोरंजनासोबत सामाजिक सलोखा निर्माण करून तरुणांना व्यसनापासून दूर ठेवून व्यसनमुक्तीचे महत्वाचे काम महाराजांच्या हातून होत असून तरुण पिढी वारकरी सांप्रदायाची जवळीक करत आहे. 

         व्यंकट महाराज यांनी राजकीय क्षेत्रात सुद्धा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार माननीय अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नेहमीच त्यांच्या बाजूने कर्तव्यदक्ष पणाने एकनिष्ठ पणाने काम केले आहे. गेली पंचवीस वर्षापासून साहेबांशी एकनिष्ठ राहून खा.अशोकराव चव्हाण यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची तालुक्यामध्ये ओळख आहे. राजकीय क्षेत्रात काम करत असताना ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, वृद्ध कलावंत मानधन समिती जिल्हा परिषद नांदेड उपाध्यक्ष, परमार्थिक क्षेत्रात काम करत असताना श्री रोकडेश्वर भजनी मंडळ माळकौठा अध्यक्ष ,राष्ट्रीय वारकरी परिषद मुदखेड तालुका उपाध्यक्ष, आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था संस्थापक सचिव म्हणून महाराजांची उल्लेखनीय कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे. 

        खा.अशोकराव चव्हाण  यांनी पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीची मागणी सुद्धा केली आहे.

माळकौठा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील काकड आरतीचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी ( कैलास पाटील)

मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे पवित्र अशा कार्तिक मासात एक महिना चालणाऱ्या काकडा आरतीचा आज दि.०६-११-२०२५ रोजी गुरुवारी सांगता सोहळा उत्साहात संपन्न झाला.

  अनेक वर्षापासून चालू असलेल्या परंपरेला अनुसरून मोठ्या भावभक्तीने गावातील भाविक भक्त मंडळी नित्य नेमाने संपूर्ण महिनाभर दररोज रात्रीला मंदिराची सजावट करून पहाटे ०५ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे श्री रोकडेश्वर भजनी मंडळ हे काकडा भजनाला सुरुवात करतात व गावातील दररोज एका सदभक्ताच्या यजमानाच्या शुभ हस्ते विश्वचालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा व आईसाहेब देवी रुक्मिणी माता यांचा महाभिषेक संपन्न करून. 

     भगवंताची महाआरती केली जाते व जमलेले भाविक भक्त माता भगिनी लहान थोर अतिशय शिस्तीत रांगेत श्रींचे दर्शन घेतात. जमलेल्या भाविक भक्तांच्या सेवेकरता यजमानाच्या वतीने  महाप्रसाद भंडाऱ्याचे सकाळी साडेसहा वाजता आयोजन करण्यात येते. उपस्थित सर्व भाविक भक्त मंडळी उद्याने भगवंताचा महाप्रसाद सेवन करतात.

    अशा ह्या संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या काकड आरतीची सांगता आज कार्तिक कृ.प्रतिपदेला हर्ष उल्हासात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.त्यात आज पहाटे पाच वाजता आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिव ह.भ.प.व्यंकट महाराज जाधव माळकौठेकर व श्री रोकडेश्वर भजनी मंडळ यांनी भजनाला सुरुवात केली आणि श्री रोकडेश्वराचे पुजारी गुरुवर्य महारुद्र महाराज जोशी यांच्या वेदमंत्र घोषामध्ये  सौभाग्यवती सरोजनी मुत्तेपवार व श्रीमान दत्तात्रय सावकार मुत्तेपवार यांच्या शुभहस्ते भगवान श्री पांडुरंग परमात्मा व आईसाहेब रुक्मिणी माता यांचा महाभिषेक संपन्न झाला.

  भगवान परमात्म्याची महाआरती करण्यात आली. व श्रीमान दत्तात्रय शंकरराव  मुत्तेपवार यांच्या वतीने महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते ,जमलेल्या सर्व भाविक भक्त माता-भगिनीं महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घेतला.



गजानन भोसले वाघीकर यांना महाराष्ट्र भूषण आदर्श समाज रत्न पुरस्कार जाहीर

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनिधी/ कैलास पाटील 

                                  स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड संचलित स्वा. से. राजाराम बापू माध्यमिक शाळेचे शिक्षक श्री गजानन बालाजीराव भोसले वाघीकर यांना डी एस पी न्यूज लाइव्ह चैनल च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र भूषण सोहळा २०२५ ,आदर्श समाज रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला .

           गजानन भोसले हे वाघी ता. जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे गावातील सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यात मोठे योगदान असून सतत या सुधारण्यासाठी धडपडणारा युवक, स्वा से राजाराम बापू माध्यमिक शाळा बारड येथील विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक म्हणून नावलौकिक आहेत त्यांच्या या अष्टपैलू कार्याची दखल घेऊन डीएसपी न्यूज लाइव चैनल च्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिले जाणारे पुरस्कार त्यापैकी एक आदर्श समाज रत्न पुरस्कार गजानन भोसले यांना जाहीर झाला असून तो दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोज रविवारी सकाळी ११:०० वाजता मौजे वडूज ता. खटाव, जिल्हा सातारा येथे छत्रपती मा. श्री उदयनराजे भोसले (खासदार सातारा लोकसभा महाराष्ट्र),मा ना जयकुमार मोरे (भाऊ)(पालकमंत्री सोलापूर जिल्हा),मा ना दत्तात्रेय (मामा) भरणे (पालकमंत्री वाशिम जिल्हा) आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे

    गजानन भोसले यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड चे अध्यक्ष श्री संजयराव शंकररावजी देशमुख बारडकर,उपाध्यक्ष रमेशचंद्र आदिनाथ महाजन,श्री शितलादेवी सेवाभावी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. छायाबाई संजयराव देशमुख,शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत इंगळे,स्वा. से.राजारामबापू माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रामकिसन चुब्बेवार, शंकरराव देशमुख, इंग्लीश ॲन्ड स्कुल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सचिन गव्हाणे व दोन्ही संस्थेचे कार्यकारी मंडळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन व पुढील यशस्वी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.



लोकप्रिय बातम्या