माळकौठा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील काकड आरतीचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी ( कैलास पाटील)

मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे पवित्र अशा कार्तिक मासात एक महिना चालणाऱ्या काकडा आरतीचा आज दि.०६-११-२०२५ रोजी गुरुवारी सांगता सोहळा उत्साहात संपन्न झाला.

  अनेक वर्षापासून चालू असलेल्या परंपरेला अनुसरून मोठ्या भावभक्तीने गावातील भाविक भक्त मंडळी नित्य नेमाने संपूर्ण महिनाभर दररोज रात्रीला मंदिराची सजावट करून पहाटे ०५ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे श्री रोकडेश्वर भजनी मंडळ हे काकडा भजनाला सुरुवात करतात व गावातील दररोज एका सदभक्ताच्या यजमानाच्या शुभ हस्ते विश्वचालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा व आईसाहेब देवी रुक्मिणी माता यांचा महाभिषेक संपन्न करून. 

     भगवंताची महाआरती केली जाते व जमलेले भाविक भक्त माता भगिनी लहान थोर अतिशय शिस्तीत रांगेत श्रींचे दर्शन घेतात. जमलेल्या भाविक भक्तांच्या सेवेकरता यजमानाच्या वतीने  महाप्रसाद भंडाऱ्याचे सकाळी साडेसहा वाजता आयोजन करण्यात येते. उपस्थित सर्व भाविक भक्त मंडळी उद्याने भगवंताचा महाप्रसाद सेवन करतात.

    अशा ह्या संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या काकड आरतीची सांगता आज कार्तिक कृ.प्रतिपदेला हर्ष उल्हासात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.त्यात आज पहाटे पाच वाजता आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिव ह.भ.प.व्यंकट महाराज जाधव माळकौठेकर व श्री रोकडेश्वर भजनी मंडळ यांनी भजनाला सुरुवात केली आणि श्री रोकडेश्वराचे पुजारी गुरुवर्य महारुद्र महाराज जोशी यांच्या वेदमंत्र घोषामध्ये  सौभाग्यवती सरोजनी मुत्तेपवार व श्रीमान दत्तात्रय सावकार मुत्तेपवार यांच्या शुभहस्ते भगवान श्री पांडुरंग परमात्मा व आईसाहेब रुक्मिणी माता यांचा महाभिषेक संपन्न झाला.

  भगवान परमात्म्याची महाआरती करण्यात आली. व श्रीमान दत्तात्रय शंकरराव  मुत्तेपवार यांच्या वतीने महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते ,जमलेल्या सर्व भाविक भक्त माता-भगिनीं महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घेतला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या