मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील वारकरी परंपरा असलेल्या शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित ह.भ.प. व्यंकट महाराज जाधव हे माळकौठा पंचायत समिती गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे.
ह. भ. प .व्यंकट महाराज हे भजन, कीर्तन ,प्रवचन व पारायण सोहळ्याच्या माध्यमातून आध्यात्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असून परिसरासह संपूर्ण जिल्हाभर समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासताना लोकांच्या मनोरंजनासोबत सामाजिक सलोखा निर्माण करून तरुणांना व्यसनापासून दूर ठेवून व्यसनमुक्तीचे महत्वाचे काम महाराजांच्या हातून होत असून तरुण पिढी वारकरी सांप्रदायाची जवळीक करत आहे.
व्यंकट महाराज यांनी राजकीय क्षेत्रात सुद्धा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार माननीय अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नेहमीच त्यांच्या बाजूने कर्तव्यदक्ष पणाने एकनिष्ठ पणाने काम केले आहे. गेली पंचवीस वर्षापासून साहेबांशी एकनिष्ठ राहून खा.अशोकराव चव्हाण यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची तालुक्यामध्ये ओळख आहे. राजकीय क्षेत्रात काम करत असताना ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, वृद्ध कलावंत मानधन समिती जिल्हा परिषद नांदेड उपाध्यक्ष, परमार्थिक क्षेत्रात काम करत असताना श्री रोकडेश्वर भजनी मंडळ माळकौठा अध्यक्ष ,राष्ट्रीय वारकरी परिषद मुदखेड तालुका उपाध्यक्ष, आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था संस्थापक सचिव म्हणून महाराजांची उल्लेखनीय कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे.
खा.अशोकराव चव्हाण यांनी पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीची मागणी सुद्धा केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा