PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्र जमा होणार!

संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

शेतकऱ्यांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. शेतकरी खूप दिवसांपासून या पैशांची वाट पाहत होते. आता सरकारने निर्णय घेतला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आराम मिळणार आहे.

या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना एकूण ४,००० रुपये मिळणार आहेत. त्यात पीएम किसान योजनेचे २,००० रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे २,००० रुपये आहेत. हे पैसे थेट बँकेत पाठवले जातील. सरकार हे पैसे दोन भागांमध्ये देणार आहे.

सुरुवातीला काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे दुपारी ३ वाजेपर्यंत जमा होतील. नांदेड, संभाजीनगर, जालना, लातूर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर आणि चंद्रपूर या १८ जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. उरलेल्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पुढील ४ ते ५ दिवसांत पैसे मिळतील. पैसे खात्यात जमा झाले की, त्याबाबत माहिती SMS वर पाठवली जाईल.

पण हे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. काही अटी आहेत. ज्या शेतकऱ्यांनी eKYC केले आहे, त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहे, त्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही, त्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांच्याकडे १० एकरांपेक्षा कमी जमीन आहे – अशा शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. जर या अटी पूर्ण नसतील, तर पैसे मिळणार नाहीत.

शेतकऱ्याचे बँक खाते खास काही बँकांमध्ये असणे आवश्यक आहे. स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, HDFC, ICICI, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि पोस्ट ऑफिस बँक – या बँकांमध्ये जर खाते असेल, तरच पैसे जमा होतील.

सरकारचा उद्देश शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत देण्याचा आहे. कारण पेरणीसाठी खत, बियाणे आणि औषधं खरेदी करायला पैसे लागतात. गेले चार महिने शेतकरी या पैशांची वाट पाहत होते. त्यामुळे ही बातमी त्यांच्यासाठी खूपच आनंदाची आहे.

उपऱ्यांची निष्ठा व्यक्तीगत स्वार्था पुरती मर्यादित ; माजी भाजपा तालुकाध्यक्ष मुदखेड

 संपादक आशिष मुगटकर

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

२५ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री तथा भाजपा प्रणीत राज्यसभा खासदार मा. अशोकराव चव्हाण यांचां बालेकिल्ला भोकर विधान सभा मतदार संघातील मुदखेड तालुक्या मधील चिकाळा तांडा (मोठा) येथे आयुष्म मान आरोग्य केंद्राचे जि प आरोग्य विभाग व माजी जि.प.सदस्य यांचे गांव असलेल्या चिकाळा तांडा (मोठा ) येथील टिम ने संयुक्त पणे या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी केले.

या आरोग्य केंद्रा साठी माजी जि.प. सदस्य रोहीदास जाधव यांनी यशदायी पुढाकार घेतला होता....

येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पघडम वाजणार मुगट जि.प चे  ओबीसी साठी जाहीर झाले तर यावर प्रबळ दावेदारी ठोकणारे  मुगट जि.प. चे माजी सदस्य तथा प्रसिद्ध ओबीसी चेहरा रोहीदास जाधव यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर हा कार्यक्रम यशस्वी केला...

यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या संकल्पनेतून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडले गेलले महंत आ.बाबु सिंह महाराज आणि भाजपा च्या आ. श्रीजया चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थीतीत हा उद्घाटन सोहळा साजरा झाला  ...

या कार्यक्रमा साठी जाधव यांच्या टिमने प्रकाशीत केलेली वरील उद्घाटन, स्वागत जाहिरातीतून जुन्या निष्ठावंत भाजपा आजी-माजी पदाधिकाऱ्यानी अनेक प्रश्न उपस्थीत करत नाराजी सह रोष व्यक्त करत नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भावना व्यक्त करतां ना " या उपऱ्यांची निष्ठा वैयक्तीक स्वार्थ केंद्रीत असून      भाजपा तत्वा प्रमाणे नेतृत्वावार निष्ठा जमवणे अजूनही जमले नाही " याचे प्रकाशन सदरील जाहीरातीतून केल्याचा रोष त्यांनी व्यक्त केला    .....

चिकाळा ग्रा प सरपंच, पंचायत समीती सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य अशा अनुभवातून राजकीय प्रवास करणाऱ्या " जाधवांच्या टिम" ने भाजपा च्या शिर्ष नेतृत्वाला डावलून काय सिद्ध

यांच्या पुढाकाराने प्रयत्न झाले पुढे जिप ओबीस साठी प्रबळ दावेदारी ठेवत हा कार्यक्रम घेतला   ...  परंतु लोकल  ( कमी खर्चात जाहीरात देणाऱ्या ) वर्तमान पत्रात दिलेल्या उद्घघाटन जाहीरातीत स्वपक्षाच्याच (भाजपा) पंतप्रधान मंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांचा फोटो न घेतल्याने  निष्ठावान भाजपा पदाधि कारा -यांनी नाराजी सह रोष व्यक्त केला  ..

मुगट येथे श्रीमद् भागवत कथेला सुरुवात.

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनिधी 

मुदखेड तालुक्यातील मुगट येथे स्वर्गीय महाजन जीवनाजी पाटील कल्याणे यांच्या नवव्या पुण्यस्मरणार्थ व श्रावण मासा निमित्ताने गावातील संत श्री आत्माराम महाराज बोधी मठांत श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.या श्रीमद् भागवत कथेला दि.२५जुलै २०२५ या सोहळ्याला सुरुवात झाली असून, याची सांगता दि.३१ जुलै २०२५ रोजी होणार आहे. 

या श्रीमद् भागवत कथेस कथेसाठी प्रसिद्ध भागवतकार, कीर्तनकार, ह.भ.प.श्री. दत्तरामजी महाराज पांचाळ मुगटकर यांच्या सुमधुरवाणीतून संपन्न होत आहे.

 गावातील व परिसरातील भाविक भक्तांनी या श्रीमद् भागवत कथेचा लाभ घ्यावा असे,आवाहन आयोजक बळीराम पा. कल्याणे व किशनराव पा. कल्याणे यांनी केले आहे.

अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाचे १ ऑगस्ट पासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यभरात विविध उपक्रम

 संपादक आशिष मुगटकर




नांदेड जिल्हा प्रतिनिधी 
                  दि.२७ ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने संघटनेचे केंद्रीय,महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्यातील, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने राज्यभरात १ ऑगस्ट ऑगस्ट पासून १५ पर्यंत ऑगस्ट पर्यंत  (पधंरवाडा) विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. 

    याच उपक्रमाचे नियोजनातून संघटनेने १ ला टप्पा मध्ये जुन , जुलै मध्ये केंद्रीय संपर्कप्रमुख- प्रा. रवींद्र मेंढे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष - कैलासबापू देशमुख , केंद्रीय कार्यालय प्रमुख -बाबाराव खडसे केंद्रीय ह्यांच्या सह प्रदेशातील पदाधिकार्याचे वाढदिवसानिमित्त राज्यभरात वृक्षारोपण व विविध उपक्रम राबविलेले आहे.

             पत्रकारांनी जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी  सामाजिक उपक्रम राबवावे असे पत्रकार संघाने धोरण ठरविल्यामुळे महाराष्ट्रतील सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांनी जिल्हा,तालुका  बैठक घेऊन आपल्या जिल्ह्यांतील कार्यकारिणी, नुतनीकरण, व  जिल्हा,तालुका स्तरावर वृक्षारोपण, रोगनिदान शिबिर, पत्रकार मेळावा, शालेय साहित्य वाटप आपल्या जिल्हा, तालुका स्तरावर करावे असे ठरविण्यात आलेले आहे.

३ ऑगस्टला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांचा वाढदिवस असल्यामुळे या दिवशी पत्रकार सहकारी पतसंस्था शिरजगांव कसबा येथे दुपारी २ वाजता पत्रकार संवाद मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे.

वरील कार्यक्रमात ,उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांचा कार्य गौरव सत्कार करण्यात येणार आहे.  कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील पत्रकार व केंद्रीय , प्रदेश तथा महिला मंच प्रदेश कार्यकारिणी , हजर राहाणे अनिवार्य आहे.

१५ ऑगस्टला संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफखान यासीनखान पठाण यांचा वाढदिवस असल्यामुळे पंधरवडा उपक्रमाचा समारोप यानंतर होणार आहे. 

                     त्यामध्ये उत्कृष्ट कार्य , जिल्हा बांधणी केलेल्या जिल्हा अध्यक्ष व पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. संघटनेच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात वरील प्रमाणे कार्यक्रम राबवावे. व तसा अहवाल केंद्रीय कार्यकारणीला पाठवावा. 

     असे संघटनेने राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना आवाहन केले असल्याचे संघटनेचे सुरेश सवळे - केंद्रीय महासचिव ,अशोक पवार केंद्रीय सचिव - राजेंद्र भुरे, केंद्रीय उपाध्यक्ष ,प्रदिप जोशी -केंद्रीय उपाध्यक्ष , माणिकराव ठाकरे - केंद्रीय सदस्य,अंबादास सिनकर, अभिमन्यू भगत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे , गोपाल सरनाईक प्रदेश - सचिव,सुरेशराव ढवळे - प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संघटक मनोज कमटे,

सुरज यादव विदर्भ आरोग्य समिती अध्यक्ष, अरूणभाऊ कुलथे - प्रदेश सल्लागार, जगदीश बुलबुल - मराठवाडा विभागीय अध्यक्ष,  प्रियंका केदार - महिला मंच विदर्भ 

कार्याध्यक्ष, मंजुषा सागर - महिला मंच प्रदेश अध्यक्षा, कांचन मुरके - महिला मंच - प्रदेश सरचिटणीस , पायल बुलबुल - संभाजी नगर- महिला मंच जिल्हा अध्यक्षा 

प्रसिद्ध प्रमुख -सागर सवळे, शहजाद खान , नितीन पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.



कै डॉ.शंकररावजी चव्हाण जयंती निमित्य विद्यार्थी गुणगौरव व वृक्षारोपण

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड संचलित, स्वातंत्र्य सेनानी राजाराम बापू माध्यमिक शाळा व श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठवाड्याचे जलप्रणेते,भाग्यविधाते, भारताचे माजी गृहमंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त गुणांनुक्रमे प्रथम व द्वितीय आलेल्या इयत्ता ५ वी ते १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा  पालकासमित गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

   याप्रसंगी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री संजय शंकररावजी देशमुख बारडकर ,उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन ,सचिव रामेश्वर कोरबनवाड, सहसचिव अशोक पाटील गव्हाणे ,भगवान पाटील कांजाळे ,दिलीप मुलंगे, गौतम आठवले ,प्रभाकर आठवले व सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक, प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



   कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठवाड्याचे भाग्यविधाते कै.डॉ शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

    प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना  संस्थेचे उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन यांनी 'विद्यार्थ्यांनी केवळ शाळेत पहिला किंवा दुसरा येण्यासाठी अभ्यास नकरता जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास करावा असे विचार व्यक्त केले' असा मार्गदर्शन पर सल्ला दिला

      कार्यक्रमाचा शेवट अध्यक्षाच्या हस्ते शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.विना कदम मॅडम यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रीती नादरे, श्रुति देवठाणकर, आदिती कल्याणकर या विद्यार्थीनी तर कार्यक्रमाची सांगता प्रा ओसावार यांच्या आभार प्रदर्शनानी झाली.

डोंगरगाव येथे विनाअनुदानित शेती शाळेत सोयाबीन पिकावर मार्गदर्शन

 संपादक आशिष मुगटकर


खोडमाशी व चक्रीभुंगा नियंत्रणासाठी जैविक उपायांचा अंगीकार

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

मौजे डोंगरगाव (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील विनाअनुदानित शेती शाळेअंतर्गत सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन आणि 'महाविस्तार ॲप' चा उपयोग या विषयांवर माहितीपूर्ण प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.

या शेती शाळेत खोडमाशी व चक्रीभुंगा या सोयाबीन पिकाच्या मुख्य कीड समस्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या किडीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येत असून, त्यावर योग्य वेळी उपाय योजना न केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे या कीडींची ओळख, जीवनचक्र, होणारे नुकसान आणि नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

त्याचबरोबर 'महाविस्तार AI ॲप' विषयी माहिती देण्यात आली. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, आणि विविध कृषी योजनांची माहिती सहजपणे मिळवू शकतात. ॲपचा प्रभावी उपयोग करून शेतकरी अधिक शास्त्रीय पद्धतीने शेती करू शकतील, असे मार्गदर्शकांनी सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला आणि पहिली फवारणी जैविक कीटकनाशकाची करण्याचा निर्णय घेतला. पर्यावरणपूरक आणि आरोग्यास सुरक्षित अशा जैविक पद्धतींचा अवलंब करण्याची तयारी शेतकऱ्यांमध्ये दिसून आली, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

या कार्यक्रमास गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

मार्गदर्शक म्हणून श्री आर. के. कपाटे (उप कृषी अधिकारी) व श्री. व्यंकटेश पाकलवार (सहाय्यक कृषी अधिकारी) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी कीड नियंत्रणासाठी शिफारसी, जैविक व रासायनिक उपाय, योग्य फवारणीचे वेळापत्रक याबद्दल माहिती दिली.

हा उपक्रम शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणारा आणि शाश्वत शेतीच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.

देगावच्या विश्वप्रयाग हॉटेल मधील कलाकंद मध्ये आढळा चक्क मुंगळा.

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

दि.१० रोजी सायंकाळी नांदेड येथील आसना नदीच्या जवळ असलेल्या देगाव पाटी जवळील विश्वप्रयाग हॉटेल मधील कलाकंद मध्ये चक्क मृत मुंगळा आढळला.

मुगट येथील सरदार गुलाबसिंग हे आपल्या चालका सोबत सायंकाळी देगाव पाटी जवळील विश्वप्रयाग हॉटेल मध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते.चालकांनी नाश्ता घेतला व त्यांनी गोड म्हणून कलाकंद मागवला.एक घास खाऊन दुसरा घास खाताच चक्क त्यात मृत मुंगळा आढळला.त्यांनी लगेच हॉटेल चालकाकडे तक्रार केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आजार पसरतात.अनेक हाँटेलमध्ये साफसफाई व्यवस्थीत केली जात नाही.त्यामुळे असे हाँटेल आजारांचे माहेरघर बनत आहेत.त्यातुनच असे प्रकार घडुन येत आहेत.

त्यामुळे ग्राहकांनी हाँटेलची  स्वच्छता पाहुनच त्यातील पदार्थ खावेत. घाण दिसलेल्या हाँटेल वर संबंधित विभागाने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

माळकौठ्याचे ह.भ.प.व्यंकटराव जाधव यांची चार पिढ्यांची वारी परंपरा

 संपादक आशिष मुगटकर

    पांडुरंगाच्या भक्तीतून जोपासला लोकसेवेचा वसा 

          कोरोना काळात गावातच पंढरीची वारी 

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

 मुदखेड तालुक्यातील माळकौठा  येथील ह.भ.प.व्यंकटराव जाधव यांनी "माझ्या वडिलांचा मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा"या संत वचनाप्रमाणे चार पिढ्या पासून चालत असलेली पंढरीच्या वारीची परंपरा कायम चालू ठेवत वयाच्या १९ व्या वर्षापासून पांडुरंगाच्या भक्तीतून लोकसेवेचा वसा जोपासला आहे ."दोन वर्षाच्या कोरोना काळात गावातच पंढरीची वारी काढून खंड पडू न देता गावकऱ्यांनाही भक्तीचा मार्ग दाखविला आहे .

          गेल्या चार पिढ्यांपासून जाधव यांची कुटुंबीय वारकरी संप्रदायास जुडलेले  आहे. प्रपितामह कै.गणपती पाटील जाधव यांनी  सन १९७० पासून पंढरपूरच्या पायी वारीत सहभागी झाले होते. सुरुवातीस दळणवळण सुविधा नसल्याने माळकौठा गावातून पायी मुदखेड रेल्वे स्टेशन यावे लागत होते. यानंतर रेल्वेने  पुण्याला जाऊन आळंदी वारीत सहभाग घ्यावा लागत असे. आजोबा कै. व्यंकटराव पाटील जाधव यांचा अल्पशा सहवास लाभला असून यांनीही पंढरीची वारी  केली आहे. यानंतर वडील तातेराव पाटील जाधव यांनी नित्य नेम दरवर्षी वारिस सहभाग घेतला आहे. कुटुंबाचा वारसा जोपासत व्यंकट पाटील जाधव यांनी सन २००२ पासून पायी पंढरपूर वारी सुरू केली आहे. वारकरी संप्रदायातील बाळकडू धडे मिळाल्याने भक्ती मार्गातून लोकसेवा जोपासली आहे. "देह जावो अथवा राहो ,पांडुरंगीं द्रड भावो"या संत वचनाप्रमाणे पांडुरंगाच्या दिशेने वारकरी मार्गक्रमण केले आहे. सातत्याने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या संतवाणीने प्रेरित होऊन पंधरवाडा भागवत एकादशीचा  नित्यनेम करत गावात हरीपाठ काकड आरतीच्या  माध्यमातून भक्तिमय ज्योत कायम तेवत ठेवली आहे .

        कोरोना काळातील कडक शासन निर्बंधामुळे  पंढरीच्या वारीची परवानगी नाकारण्यात आली होती. या काळात पांडुरंग भेटीची असलेली ओढ मनाला ओढ लावत   होती. पंढरपूरची वारी खंड पडू नये यासाठी गावात प्रति पंढरपूर वारी करण्याचा निर्णय घेतला. गावातील भजनी संच तसेच वारकरी संप्रदायातील ५० वारकऱ्यांना सोबत घेऊन आषाढ  शुद्ध दशमीला पंढरपूर वारी काढली वारकऱ्यांच्या वेशभूषेत फडशी बांधून गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तळ ठोकला. एकादशीच्या दिवशी गावाजवळ असलेल्या दक्षिण गंगा गोदावरी पात्रास चंद्रभागा समजून टाळ म मृदंग विना विठ्ठल नामाच्या गजरात स्नान दिंडी काढली . यानंतर गावात नगर प्रदर्शना घातली . यानंतर आषाढी एकादशीनिमित्त मंदिरावर उपवास फराळ करून रात्रभर पांडुरंगाचा नाम गजर केला. द्वादशीला  सकाळी लाह्याचा प्रसाद वाटप करून उपवास सोडत घरी वारकरी परतले." माझ्या जीवीची आवडी, पंढरपूर नेईन गुढी" माऊली ज्ञानेश्वरांच्या वचनाप्रमाणे आज पर्यंत पंढरीची वारी सुरूच ठेवली आहे.

          ह.भ.प.व्यंकटराव जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गावातील अनेक लोकांना वारकरी संप्रदायात आणून पंढरी वारीचा मार्ग दाखविला . वारीचे महत्त्व पटवून देताना सर्व जाती पंथांची मंडळी गरीब ,श्रीमंत  ,स्त्री,पुरुष, उच्च ,निच असला कोणताही भेदभाव अंतकरणांमध्ये होऊ न देता सकारात्मक भावनेतून पांडुरंगाची वारी एकात्मतेची व समतेची असल्याचे दाखवून दिले. गावात माणुसकी जोपासत व्यसनाच्या विळ्याख्यात अडकलेल्या अनेक नव तरुणांना बाहेर काढले आहे. व्यंकटराव जाधव गावात  नित्यनेम हरिपाठ व काकडा, अखंड हरिनाम सप्ताह, श्रीकृष्ण भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, शिवनाम सप्ताह, महाशिवरात्रीचा शिव जागर अशा माध्यमातून सर्व पंथीय भक्तीचा मळा फुलवला आहे. समाज प्रबोधनातून  वाट चुकलेल्या अनेक माणसांना चांगला रस्ता दाखवला आहे. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून संत साहित्य घराघरात पोहोचून घर ते ज्ञानेश्वरी चा उपक्रम प्रभावी ठरले आहे .

   संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी साडेनऊ हजार मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटप केले आहे. वारकऱ्याच्या सोयीसाठी पांडुरंगाच्या दारी निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी पंढरपूर या ठिकाणी प्लॉट खरेदी केला आहे. आजपर्यंत जाधव कुटुंबीयांनी वारकरी संप्रदायात केलेली कार्य खरोखरच उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे.

मुगटगावचे सरपंच, उपसरपंच होणार अपात्र ?

 संपादक आशिष मुगटकर


             जिल्हाअधिकाऱ्यांनी मागविला चौकशी अहवाल 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

मुदखेड तालुक्यातील मुगट  ग्रामपंचायतीने  गेल्या दोन वर्षापासून ग्रामसभा मासिक सभा घेतल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला असून यासंदर्भात जिल्हा अधिकारी कार्यालयातील न्यायालयात सुनावणी करण्यात आली असून. जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल मागितल्या असल्याने सरपंच उपसरपंच यांच्या वर आता कार्यवाहीची टांगती तलवार असून  याबाबत कोणता निर्णय होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

   ग्रामपंचायत अंतर्गत  सरपंच उपसरपंच यांनी  ता 23 नोव्हेंबर 2022 ,ता 1 मे 2022 ,ता 25 नोव्हेंबर 2022 ,ता 1 मे 2023 ता.15 ऑगस्ट 2023 ता 2ऑक्टोंबर 2023 ता 15 ऑगस्ट 2024 ता 26 जानेवारी 2024  या वर्षात ग्रामसभा व मासिक सभा घेतल्या नसल्या संदर्भात  ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. परंतु प्रशासनाने याबाबत कुठलीही चौकशी केली नाही यानंतर ग्रामस्थांच्या वतीने गोपीनाथ राजाराम मुंगल , बालाजी तुकाराम कल्याणे यांनी जिल्हाधिकारी अंतर्गत न्यायालयात  याचिका दाखल केली होती . या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1998 चे कलम 07 नुसार सरपंच कांताबाई धोंडीबा वंजे उपसरपंच जिजाबाई हिरामण कल्याने यांनी ग्रामसभा व मासिक सभा  घेतली नसल्याने कसूर केल्या बद्दल  यांना अपात्र ठरविण्यात यावे. अशी याचिका दाखल करण्यात आली होती. 


जिल्हा अधिकारी  न्यायालयात याप्रकरणी सुनावणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत पत्र काढून तहसीलदार मुदखेड यांना यासंदर्भात पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी चौकशी लेखी अहवाल घेऊन ता ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता स्वतः किंवा विधीज्ञामार्फत हजर राहून लेखी म्हणणे  सादर करण्याच्या सूचना दिली आहे. सुनावणीच्या दिवशी अहवाल सादर न केल्यास काहीही म्हणणे नाही असे ग्रहीत धरून नियमानुसार निर्णय घेण्यात येईल असे  पत्रात नमूद केले आहे.

 यामुळे मुगटच्या सरपंच उपसरपंच यांच्या पदावर सध्या तरी कार्यवाहीची टांगती तलवार असुन अपात्र होण्याची क्षक्यता नाकारता येत नाही. याबाबत आता कोणता  निर्णय लागणार हेच पहावे लागणार आहे.

                   -:  प्रतिक्रिया :-

            सरपंच उपसरपंच यांनी पदावर निवड झाल्यापासून नियमानुसार ग्रामसभा व मासिक सभा घेतल्या नसून खोटे व बनावट ग्रामसभा हजेरी रजिस्टर व इतर दस्तऐवज तयार करून शासकीय निधीच्या अपहर केला असून उर्वरित कालावधीसाठी अपात्र करणे लोकशाहीच्या हिताचे राहील .  गोपीनाथ राजाराम मुंगल (मुगट) 

                         सरपंच उपसरपंच यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत राजकीय बळाचा वापर करून खोटे बनावट कागदपत्राच्या आधारे ग्रामस्थांची फसवणूक केली आहे याकरिता यांना अपात्र ठरविणे महत्त्वाचे आहे. बालाजी तुकाराम कल्याने याचिकर्ते मुगट  




दिः ८व ९ जुलै रोजी शाळा बंद करणार ; जिल्हा शिक्षक समन्वय संघाचे आव्हान

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

  महाराष्ट्र राज्यात ६५ हजार शिक्षक आपल्या हक्काची १००% टक्क पगार मिळावा म्हणून दरवर्षी हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशनात शेकडो आंदोलन करूनही हक्काची १००% पगार मिळत नाही काही शिक्षकांनी विनावेतनाला कंटाळून आत्महत्या केली तर बरेच शिक्षकांना विना वेतन,२०-४० टक्के पगारावार निवृत व्हावे लागले तरी शासनाला जाग येत नाही .

शिक्षकांचे आंदोलन थांबवण्यासाठी १४ आक्टोबर २०२४ चा वाढीव टप्पा अनुदान देणाचा शासन निर्णय निर्गमित केला तरी संतांतरानंतर तेच सरकार केराची टोपली दाखवून पावसाळी अधिवेशनाच्या आर्थिक बजेट मध्ये कसलीच निधीची तरतूद केली नसल्याने बऱ्याच दिवसापासुन आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे चालू असलेल्या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेत दि. ८ व ९ जुलै रोजी राज्यभर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला 

त्याच प्रमाणे नांदेड जिल्हा शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग यांना निवेदन देवून शाळा बंद करण्याचा इशारा देण्यात आला.

 यावेळी मराठवाडा शिक्षक परिषदेचे विश्वासराव सुर्यकांत, कैलास खानसोळे, आनंद कर्ने, संजय आणेराये, दिगंबर माने, अनिल सर्पे, गणेश तरटे, सोनकांबळे मॅडम, निकोले ए एस, सुर्यवंशी एस एम, शेख शेकील, जाकिर अहेमद यासह जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते

प्रदेश अध्यक्ष कैलाश बापू देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रम घेऊन साजरा.

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

              दि.30 रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे लोकप्रिय प्रदेश अध्यक्ष श्री कैलाश बापू देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा नांदेड च्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मुदखेड तालुक्यातील मुगट येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना यावेळी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच शाळेतील परिसरात वृक्षारोपण सुध्दा उपस्थित मान्य वरांच्या हस्ते करून आले. 

यावेळी प्रदेश संघटक मनोज कमटे, जिल्हा अध्यक्ष आशिष पाटील कल्याणे, जिल्हा संघटक सरदार गुलाबसिंग, मुदखेड तालुका अध्यक्ष शिवाजी एडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे,शिक्षक गोरडवार, लोखंडे, खलिक, शिक्षीका कांबळे, सोनाळे, सूर्यवंशी आदी शिक्षक उपस्थित होते.

   जी.के इंग्लिश स्कूल मुगट येथील शालेय विद्यार्थ्यांना प्रदेश अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रदेश संघटक मनोज कमटे, जिल्हा अध्यक्ष आशिष कल्याणे पाटील, तालुका अध्यक्ष शिवाजी एडके संस्थाचालक किशनराव कल्याणे, यांच्या हस्ते वतीने करण्यात आले. यावेळी  मुख्याध्यापिका यशोमती लंगोटे, शिक्षीका शिवनंदा कल्याणे,रिना पडोळे,मुक्ता पांचाळ,सह आदी उपस्थित होते.




मातासाहेब देवांजी गुरुद्वारा परिसरात यावेळी जिल्हा संघटक सरदार गुलाब सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बाबा जग्गासिंग, बाबा खडक सिंग, सरदार गुलाबसिंघ, प्रदेश संघटक मनोज कमटे, जिल्हा अध्यक्ष आशिष कल्याणे पाटील, मुदखेड तालुका अध्यक्ष शिवाजी एडके सह अनेक पत्रकार तसेच सेवादार यावेळी उपस्थित होते.

प्रदेश अध्यक्ष यांचा वाढदिवस मुदखेड तालुक्यात विविध उपक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रमाचे आयोजन मुदखेड तालुका अध्यक्ष शिवाजी एडके,सौरभ चौदंते ,नांदेड तालुकाध्यक्ष शुभम हाटकर यांनी केले होते.




मुगटला हरित क्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी.

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

मुगट येथील ग्रामपंचायत कार्यालयात व जिल्हा परिषद शाळेत हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. जयंतीचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.जि.प.सदस्य भिमराव पा. कल्याणे यांच्या कडून शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे आयोजन करण्यात आले होते .

                यावेळी मुदखेड गटविकास अधिकारी देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तराव देशमुख,जि.प.सदस्य भिमराव पा. कल्याणे, प्रवीण गायकवाड, मारोती किरकण, मारोती जाधव, रामदास पवार,चंपती पवार,खंडु पवार, गणेशराव येळमकर, सरपंच धोंडीबा वंजे, संचालक माधवराव पा. कल्याणे, विलास कल्याणे, गोविंद पवार, फुलाजी मुंगल, बालाजी मुंगल, दिंगबर कल्याणे, शिवानंद कल्याणे,प्रताप मुंगल,ग्रामविकास अधिकारी श्रीमनवार, तुकाराम हातागळे, देवदत्त हाटकर, तुकाराम हाटकर,पत्रकार संजय कोलते, सिध्दार्थ कांबळे, साहेबराव गागलवाड, जब्बार पटेल, पोलीस पाटील सारंग मठपती, तालुक्यातील भाजपचे अनेक कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील मंडळी आदी यावेळी उपस्थित होते.









लोकप्रिय बातम्या