माळकौठ्याचे ह.भ.प.व्यंकटराव जाधव यांची चार पिढ्यांची वारी परंपरा

 संपादक आशिष मुगटकर

    पांडुरंगाच्या भक्तीतून जोपासला लोकसेवेचा वसा 

          कोरोना काळात गावातच पंढरीची वारी 

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

 मुदखेड तालुक्यातील माळकौठा  येथील ह.भ.प.व्यंकटराव जाधव यांनी "माझ्या वडिलांचा मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा"या संत वचनाप्रमाणे चार पिढ्या पासून चालत असलेली पंढरीच्या वारीची परंपरा कायम चालू ठेवत वयाच्या १९ व्या वर्षापासून पांडुरंगाच्या भक्तीतून लोकसेवेचा वसा जोपासला आहे ."दोन वर्षाच्या कोरोना काळात गावातच पंढरीची वारी काढून खंड पडू न देता गावकऱ्यांनाही भक्तीचा मार्ग दाखविला आहे .

          गेल्या चार पिढ्यांपासून जाधव यांची कुटुंबीय वारकरी संप्रदायास जुडलेले  आहे. प्रपितामह कै.गणपती पाटील जाधव यांनी  सन १९७० पासून पंढरपूरच्या पायी वारीत सहभागी झाले होते. सुरुवातीस दळणवळण सुविधा नसल्याने माळकौठा गावातून पायी मुदखेड रेल्वे स्टेशन यावे लागत होते. यानंतर रेल्वेने  पुण्याला जाऊन आळंदी वारीत सहभाग घ्यावा लागत असे. आजोबा कै. व्यंकटराव पाटील जाधव यांचा अल्पशा सहवास लाभला असून यांनीही पंढरीची वारी  केली आहे. यानंतर वडील तातेराव पाटील जाधव यांनी नित्य नेम दरवर्षी वारिस सहभाग घेतला आहे. कुटुंबाचा वारसा जोपासत व्यंकट पाटील जाधव यांनी सन २००२ पासून पायी पंढरपूर वारी सुरू केली आहे. वारकरी संप्रदायातील बाळकडू धडे मिळाल्याने भक्ती मार्गातून लोकसेवा जोपासली आहे. "देह जावो अथवा राहो ,पांडुरंगीं द्रड भावो"या संत वचनाप्रमाणे पांडुरंगाच्या दिशेने वारकरी मार्गक्रमण केले आहे. सातत्याने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या संतवाणीने प्रेरित होऊन पंधरवाडा भागवत एकादशीचा  नित्यनेम करत गावात हरीपाठ काकड आरतीच्या  माध्यमातून भक्तिमय ज्योत कायम तेवत ठेवली आहे .

        कोरोना काळातील कडक शासन निर्बंधामुळे  पंढरीच्या वारीची परवानगी नाकारण्यात आली होती. या काळात पांडुरंग भेटीची असलेली ओढ मनाला ओढ लावत   होती. पंढरपूरची वारी खंड पडू नये यासाठी गावात प्रति पंढरपूर वारी करण्याचा निर्णय घेतला. गावातील भजनी संच तसेच वारकरी संप्रदायातील ५० वारकऱ्यांना सोबत घेऊन आषाढ  शुद्ध दशमीला पंढरपूर वारी काढली वारकऱ्यांच्या वेशभूषेत फडशी बांधून गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तळ ठोकला. एकादशीच्या दिवशी गावाजवळ असलेल्या दक्षिण गंगा गोदावरी पात्रास चंद्रभागा समजून टाळ म मृदंग विना विठ्ठल नामाच्या गजरात स्नान दिंडी काढली . यानंतर गावात नगर प्रदर्शना घातली . यानंतर आषाढी एकादशीनिमित्त मंदिरावर उपवास फराळ करून रात्रभर पांडुरंगाचा नाम गजर केला. द्वादशीला  सकाळी लाह्याचा प्रसाद वाटप करून उपवास सोडत घरी वारकरी परतले." माझ्या जीवीची आवडी, पंढरपूर नेईन गुढी" माऊली ज्ञानेश्वरांच्या वचनाप्रमाणे आज पर्यंत पंढरीची वारी सुरूच ठेवली आहे.

          ह.भ.प.व्यंकटराव जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गावातील अनेक लोकांना वारकरी संप्रदायात आणून पंढरी वारीचा मार्ग दाखविला . वारीचे महत्त्व पटवून देताना सर्व जाती पंथांची मंडळी गरीब ,श्रीमंत  ,स्त्री,पुरुष, उच्च ,निच असला कोणताही भेदभाव अंतकरणांमध्ये होऊ न देता सकारात्मक भावनेतून पांडुरंगाची वारी एकात्मतेची व समतेची असल्याचे दाखवून दिले. गावात माणुसकी जोपासत व्यसनाच्या विळ्याख्यात अडकलेल्या अनेक नव तरुणांना बाहेर काढले आहे. व्यंकटराव जाधव गावात  नित्यनेम हरिपाठ व काकडा, अखंड हरिनाम सप्ताह, श्रीकृष्ण भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, शिवनाम सप्ताह, महाशिवरात्रीचा शिव जागर अशा माध्यमातून सर्व पंथीय भक्तीचा मळा फुलवला आहे. समाज प्रबोधनातून  वाट चुकलेल्या अनेक माणसांना चांगला रस्ता दाखवला आहे. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून संत साहित्य घराघरात पोहोचून घर ते ज्ञानेश्वरी चा उपक्रम प्रभावी ठरले आहे .

   संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी साडेनऊ हजार मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटप केले आहे. वारकऱ्याच्या सोयीसाठी पांडुरंगाच्या दारी निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी पंढरपूर या ठिकाणी प्लॉट खरेदी केला आहे. आजपर्यंत जाधव कुटुंबीयांनी वारकरी संप्रदायात केलेली कार्य खरोखरच उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या