जिल्हाअधिकाऱ्यांनी मागविला चौकशी अहवाल
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील मुगट ग्रामपंचायतीने गेल्या दोन वर्षापासून ग्रामसभा मासिक सभा घेतल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला असून यासंदर्भात जिल्हा अधिकारी कार्यालयातील न्यायालयात सुनावणी करण्यात आली असून. जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल मागितल्या असल्याने सरपंच उपसरपंच यांच्या वर आता कार्यवाहीची टांगती तलवार असून याबाबत कोणता निर्णय होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच उपसरपंच यांनी ता 23 नोव्हेंबर 2022 ,ता 1 मे 2022 ,ता 25 नोव्हेंबर 2022 ,ता 1 मे 2023 ता.15 ऑगस्ट 2023 ता 2ऑक्टोंबर 2023 ता 15 ऑगस्ट 2024 ता 26 जानेवारी 2024 या वर्षात ग्रामसभा व मासिक सभा घेतल्या नसल्या संदर्भात ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. परंतु प्रशासनाने याबाबत कुठलीही चौकशी केली नाही यानंतर ग्रामस्थांच्या वतीने गोपीनाथ राजाराम मुंगल , बालाजी तुकाराम कल्याणे यांनी जिल्हाधिकारी अंतर्गत न्यायालयात याचिका दाखल केली होती . या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1998 चे कलम 07 नुसार सरपंच कांताबाई धोंडीबा वंजे उपसरपंच जिजाबाई हिरामण कल्याने यांनी ग्रामसभा व मासिक सभा घेतली नसल्याने कसूर केल्या बद्दल यांना अपात्र ठरविण्यात यावे. अशी याचिका दाखल करण्यात आली होती.
जिल्हा अधिकारी न्यायालयात याप्रकरणी सुनावणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत पत्र काढून तहसीलदार मुदखेड यांना यासंदर्भात पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी चौकशी लेखी अहवाल घेऊन ता ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता स्वतः किंवा विधीज्ञामार्फत हजर राहून लेखी म्हणणे सादर करण्याच्या सूचना दिली आहे. सुनावणीच्या दिवशी अहवाल सादर न केल्यास काहीही म्हणणे नाही असे ग्रहीत धरून नियमानुसार निर्णय घेण्यात येईल असे पत्रात नमूद केले आहे.
यामुळे मुगटच्या सरपंच उपसरपंच यांच्या पदावर सध्या तरी कार्यवाहीची टांगती तलवार असुन अपात्र होण्याची क्षक्यता नाकारता येत नाही. याबाबत आता कोणता निर्णय लागणार हेच पहावे लागणार आहे.
-: प्रतिक्रिया :-
सरपंच उपसरपंच यांनी पदावर निवड झाल्यापासून नियमानुसार ग्रामसभा व मासिक सभा घेतल्या नसून खोटे व बनावट ग्रामसभा हजेरी रजिस्टर व इतर दस्तऐवज तयार करून शासकीय निधीच्या अपहर केला असून उर्वरित कालावधीसाठी अपात्र करणे लोकशाहीच्या हिताचे राहील . गोपीनाथ राजाराम मुंगल (मुगट)
सरपंच उपसरपंच यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत राजकीय बळाचा वापर करून खोटे बनावट कागदपत्राच्या आधारे ग्रामस्थांची फसवणूक केली आहे याकरिता यांना अपात्र ठरविणे महत्त्वाचे आहे. बालाजी तुकाराम कल्याने याचिकर्ते मुगट



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा