पोलीसांना तपासात मयताचे प्रेत ईजळी शिवारात आढळले
![]() |
बारड / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील निवघा येथील शिवाजी पुतळा चौकात अज्ञात व्यक्तीकडून पिस्तूलाने गोळ्या झाडून युवकाचा खून झाला असल्याची घटना घडली आहे.
मयत देविदास माधवराव पवार वय ३५ वर्ष रा.निवघा ता.मुदखेड धंदा शेती या युवकाचे प्रेत पोलीस तपासात ईजळी शिवारात मिळाल्याची माहिती पोलीसांन कडून मिळाली आहे.
अज्ञात व्यक्तीकडून देविदास पवार यांच्या सोबत शिवाजी चौकाच्या बाजूवरील रस्त्यावर बाचाबाची झाली असल्याची माहिती ग्रामस्थान कडून मिळाली असून नेमके घटनेमागचे कारण काय ते अद्याप कळाले नसून तपासात पुढे येणार आहे.
अज्ञात व्यक्तीने गोळीचा फायर करत देविदास पवार यांना गाडीवरून पळूवन नेत असताना तिघेजण असल्याचे कळाले या सदरिल घटना गोळीबार झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच बारड पोलीसानी घटना स्थळावर धाव घेत घटनेची माहिती घेतली आहे याप्रकरणी एडिशनल एसपी विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी बाळासाहेब देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज तुगावे पोलीस उपनिरीक्षक वानोळे यांच्या पोलीस पथकाने तपास चक्र गतीने चालवत तपासाअंती अवघ्या दोन तासात तपासात पोलीसांना मयत देविदास पवार यांच्या वर गोळीबार झाला प्रेत ईजळी शिवारात मिळून आले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज तुगावे यांनी यावेळी सांगितले पढील तपास चालू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
निवघा येथे देविदास पवार नावाच्या व्यक्ती वर गोळीबार झाला ईजळी शिवारात तो मय्यत मिळाला पुढील तपास चालू आहे.शिवराज तुगावे सहाय्यक पोलीस निरीक्षक बारड, ता.मुदखेड हे करत आहेत

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा